ओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणार
मुंबई - राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी टास्क फोर्स सदस्यांची बैठक पार पडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात आली.
याबाबत आजपासून २४ डिसेंबर रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरविण्यात आले आहे.
ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने चिंता व्यक्त केली आहे.
देशात ओमायक्रॉनचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार पाऊलं उचलणार आहे. राज्यात पुन्हा रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच, ३१ डिसेंबरला रात्री केले जाणारे नववर्षाचे सेलिब्रेशन यावर निर्बंध आणण्यासंदर्भातही या बैठकीत विचार करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
मात्र, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी विधानसभेत चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळाले.
सभागृहात काही सदस्य विनामास्क असल्याचे दिसताच अजित पवारांनी खडसावून सांगितले की, काही जणांचा अपवाद सोडला तर अधिवेशन सुरू झाल्यापासून मी पाहतोय कोणीही मास्क लावत नाही. देशाचे पंतप्रधान हे कोरोनासंदर्भात गंभीर असून त्याबाबत बैठका घेत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. विषाणूमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. परदेशात दीड दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
गुरुवारी देशात ओमायक्रॉनचे तब्बल ६४ रुग्ण आढळले असून त्यात तामिळनाडूत ३३, तेलंगणात १४, कर्नाटकात १२, केरळमध्ये ५ असे नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात २३ नवे रुग्ण आढळल्याने ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ८८ वर पोहचली आहे. राज्यात पुण्यात १३, मुंबई ५, उस्मानाबाद २, ठाणे, नागपूर, मीरा भाईंदर येथे गुरुवारी प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
Видео ओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणार канала जन संघर्ष

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
ठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशसर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्गआघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तरशिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणामुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टीकळंबच्या चिंतामणी मंदिरात अवतरली गंगाविधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्थापरदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणारपवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवारप्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्तीदादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवरराज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेटराज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणारकल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीसविशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्तअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजरशिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेगकोरोनाच्या एकाच वेळी दोन लाटा ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरीयंटशिवसेना भाजप एकत्र येईल दिल्लीवरून शिवसेनेच्या मंत्र्याचे व्यकतव्यकल्याण डोंबिवली नव्या प्रभागरचनेवरून शिवसेना विरुद्ध मनसे