Загрузка страницы

शिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणा

अमरावती : सध्या भोंग्याचा वाद राज्यभर पेटल्याचे दिसत आहे. यात राणा दाम्पत्याने उडी टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर शिवसैनिक जमले असून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
तर, राणा दाम्पत्यानेही शिवसैनिकांना आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा सल्ला दिला आहे .
यामुळे, राज्याला लागलेली साडेसाती आणि संकट दूर होईल, असे आमदार रवी राणा म्हणाले आहेत.
आज अमरावती येथील हनुमान मंदिरात खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांनी हनुमान चालिसा पठण केले.
पूजा, अर्चना केली.
यावेळी राणा दाम्पत्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे .
रवी राणा म्हणाले, माझ्यासोबत श्रीराम आणि हनुमानाचा आशीर्वाद आहे. त्
यामुळे मी मातोश्रीवर आल्यास आपल्याला कोणीही अडवू शकत नाही.
महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.
आज हनुमान जयंती आहे, बाळासाहेबांचे विचार जर तुमच्यात असतील तर, मातोश्रीच्या आत जाऊन मुख्यमंत्र्यांबरोबर हनुमान चालिसा पठण करावे.
हिंदूंना नर्वस करू नका.
जर त्यांच्यात खरच हिंदूत्व असेल तर मुख्यमंत्री हनुमान चालिसाचं पठण करतील, असेही राणा म्हणाले.
आज हनुमान चालिसा पठण करून आम्ही मुख्यमंत्री ठाकरेंना सद्बुद्धी मिळो आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याची ताकद मिळो अशी प्रार्थना केल्याचे रवी राणा म्हणाले.
यावेळी नवनीत राणा यांनीही शिवसैनिकांवर टीकास्त्र सोडले, संकटमोचक हनुमान आपल्या पाठीशी आहेत.
शिवसैनिकांनी तारीख आणि वेळ सांगावी, त्यादिवशी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करेन, अशा शब्दात नवनीत राणा यांनी शिवसैनिकांवर टीकास्त्र सोडले आहे.
मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. त्यामुळे या दोघांची ताकद आपल्या पाठीशी असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
अपक्ष आमदार रवी राणा यांनी काल शुक्रवारी मुख्यमंत्र उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालिसाचे पठण करावे, असे म्हटले होते.
ते करीत नसतील तर आपण स्वत: खासदार नवनीत राणा यांच्यासह ‘मातोश्री’पुढे हनुमान चालिसाचे वाचन करू, असेही ते म्हणाले होते.
यानंतर वातावरण चांगलच तापलं आहे. काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा हे रवीनगरमधील एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या हजारो महिलांसोबत बसून हनुमान चालीसा पठण केले होते.
या प्रकरणावरून रवी राणा आणि शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांच्यात शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली होती.
असल्या आवाहनांना आम्ही विचारत नाही. उद्धव ठाकरेंनी काय वाचावं, काय करावं हे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. तुम्ही आमदार आहात, तुम्ही तुमचं काम करा, असं म्हणत पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.
अमरावतीच्या युवासेनेने शुक्रवारी रात्री १०.४५ दरम्यान राणा दाम्पत्याच्या घरासमोर युवासेनेने आक्रमक आंदोलन करत राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या तसेच लाऊड स्पीकर हनुमान चालिसा वाजवत आंदोलन केले.
३० मिनिटे युवासेनेने राणा यांच्या घरासमोर आंदोलन केले.
तर मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न बघू नका व हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सागर देशमुख यांनी यावेळी दिली आहे.

Видео शिवसैनिकांनी आक्रमक होण्याऐवजी मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालीसा पठण करावा : राणा канала जन संघर्ष
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 апреля 2022 г. 13:53:46
00:00:05
Другие видео канала
ठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशठाणे जिल्ह्यातील शाळा ५ वी ते १२ पर्यंत ४ ऑक्टोंबर पासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशसर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्गसर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका परमवीर सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्गआघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तरआघाडीत आलेच पाहिजे असे काही नाही शिवसेनेचे आव्हाडांना प्रत्युत्तरमुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टीमुंबई गोवा क्रूझ मध्ये ड्रग्स पार्टीओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणारओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणारकळंबच्या चिंतामणी मंदिरात अवतरली गंगाकळंबच्या चिंतामणी मंदिरात अवतरली गंगाविधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्थाविधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी तात्पुरती व्यवस्थापरदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणारपरदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका व इतर ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणारपवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवारपवारांच्या नावाने भौ करून रोज भोंगा वाजतो , मनसेचा राऊतावर पलटवारप्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्तीप्रीतीश देशमुख यांनी बनविला राजवाडा कोट्यवधीची संपत्तीदादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवरदादरा नगर हवेलीच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर मातोश्रीवरराज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेटराज ठाकरेंनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेटराज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणारराज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणारकल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीसकल्याण पूर्व मध्ये आनंदवाडी,मिलिंद नगर गणेश वाडी मधील रहिवाश्यांना रेल्वेची नोटीसविशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्तविशाखपट्टणम एक्स्प्रेस मधील ८ किलो गांजा जप्तअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजरअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात केले हजरशिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेगशिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा हालचालींना वेगकोरोनाच्या एकाच वेळी दोन लाटा ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरीयंटकोरोनाच्या एकाच वेळी दोन लाटा ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरीयंटशिवसेना भाजप एकत्र येईल दिल्लीवरून शिवसेनेच्या मंत्र्याचे व्यकतव्यशिवसेना भाजप एकत्र येईल दिल्लीवरून शिवसेनेच्या मंत्र्याचे व्यकतव्यकल्याण डोंबिवली नव्या प्रभागरचनेवरून शिवसेना विरुद्ध मनसेकल्याण डोंबिवली नव्या प्रभागरचनेवरून शिवसेना विरुद्ध मनसे
Яндекс.Метрика