Загрузка...

अतनूर येथे सद्गुरु घाळेप्पा स्वामी महाराजांच्या १५० व्या पुण्यतिथी सोहळ्याची उत्साहात सांगता#varkari

लातूर: महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा ही, भक्ती समता आणि समाज प्रबोधनाचा एक संपन्न वारसा आहे.. ज्ञानेश्वरांनी रचलेला पाया ! नामदेवांनी केलेला विस्तार ! एकनाथांनी दिलेला आधार आणि तुकोबाच्या कळसाने सजलेला वारकरी संप्रदाय ! हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मुख्य कणा आहे.. म्हणूनच संत परंपरेचं वर्ण करताना कावित्री बहिणाबाई म्हणतात.. ज्ञानदेव रचीला पाया" तुका झालासे कळस" या संत परंपरेचा वारसा लाभलेले आतनूर येथील सद्गुरू श्री घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या 150 व्या पुण्यतिथी सोहळ्याची २४ एप्रिल रोजी हजारों भाविकांच्या उपस्थिती उत्साहात सांगता करण्यात आलीय.प्रति वर्षीप्रमाणे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या अतनूर येथे सदगुरू श्री घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या 150 व्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने अखंडहरिनामसप्ताह ,महाशिवपुरा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या सह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात 16 एप्रिल रोजी पासून झाली होती. दरम्यान गेली सात दिवस दररोज पहाटे काकड आरती, सकाळी हरिपाठ, त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महाशिवपुराण कथा, सायंकाळी हरिपाठ रात्री हरिकीर्तन,व भज यासह विविध कार्यक्रम पार पडले आहेत. 23 एप्रिल रोजी रात्री महिलांनी मंदिरात हजारो दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.. तर..24 एप्रिल रोजी सकाळी पारंपरिक वाद्यसह टाळ मृदंगाच्या गजरात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची अतनूर गावातून शोभा यात्रा काढण्यात आली..या शोभा यात्रेत डोक्यावर कळस आणि तुळस घेऊन शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.. तर..हजरो भाविक हरिनामाचा गजर करत या शोभा यात्रेत तल्लीन होऊन नाचत होते..दरम्यान गावातील मुख्य चौकात ठीक ठिकाणी आश्वाचे रिंगण पार पाडले..त्यानंतर दुपारी पालखी मंदिरात दाखल झाली..पालखी मंदिरात येताच हारीभक्त पारायण पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने श्री घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या 150 व्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झालीय. या सात चाललेल्या सोहळ्याचे आयोजन अतनूर येथील सर्व जनतेकडून करण्यात आले होते. #varkarisanpraday #maharashtra #mharathvda #latur #jalkot #

Видео अतनूर येथे सद्गुरु घाळेप्पा स्वामी महाराजांच्या १५० व्या पुण्यतिथी सोहळ्याची उत्साहात सांगता#varkari канала RRD NEWS मराठी
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять