Загрузка...

#रोज एक श्लोक #दत्त भाव सुधारस स्तोत्र १११ #Datta bhava sudharas stotra 111 #मराठी अर्थासह

नमस्कार! 🙏
सध्या सुरू आहे *श्री दत्त भाव सुधारस स्तोत्र!*
दत्तसंप्रदायातील सनातन धर्मीयांमध्ये महात्म्यांच्या परंपरेत प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामींचा आदरपूर्वक उल्लेख होतो. श्री स्वामी मुर्तीमंत परमवैराग्यमुर्ती होते, संन्यास धर्माचा आदर्श होते. मंत्रसिद्धी, यंत्र-तंत्रज्ञ, असल्याकारणाने त्यांनी अनेक सिध्द मंत्राची रचना केली. त्यांच्या अद्वितीय भक्तीतून त्यांनी अनेक सिध्द ग्रंथाची मंत्राची निर्मिती केली. त्यातीलच एक सिध्द प्रासादिक स्तोत्र म्हणजे "श्री दत्त भाव सुधारस स्तोत्र." या स्तोत्रातील आर्तता, करुणा अगतिकता हृदयंगम आहे. या स्तोत्रात श्री गुरुचरित्र आणि श्री दत्त माहात्म्य या दोन्ही प्रासादिक दिव्य ग्रंथातील कथांचा सुरेख संगम आहे.
*आजचा श्लोक:*
दत्तान्नास्ति परायणं श्रुतिमतं दत्तस्य दासोस्म्यहम् श्रीदत्ते परभक्तिरस्तु मम भो दत्त प्रसीदेश्वर ।। ११०॥
।। इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीदत्तभावसुधारसस्तोत्रं ।।
*श्लोकाचा अर्थ:*
वेदांना मान्य असलेले श्रीदत्तांहून अन्य कोणतेही स्थान श्रेष्ठ नाही. श्रीदत्तांचा मी दासी आहे. श्रीदत्तांच्या ठायी माझी परम भक्ती नेहमीच असो. हे श्रीदत्तप्रभो; माझ्यावर प्रसन्न व्हा !
||१११||
अशा प्रकारे हे होते श्रीदत्तभावसुधारस स्तोत्र.

Видео #रोज एक श्लोक #दत्त भाव सुधारस स्तोत्र १११ #Datta bhava sudharas stotra 111 #मराठी अर्थासह канала #Roj ek shlok #Vasundhara Rasal #रोज एक श्लोक
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки