Загрузка...

#रोज एक श्लोक #इंद्रादिकृत नारायणी स्तुती ३१ #indradikrut Narayani Stuti 31 #मराठी अर्थासह

नमस्कार 🙏!
सध्या सुरू आहे इंद्रादी कृत नारायणी स्तुती! देवीने शुंभ नावाच्या असुराचा म्हणजे राक्षसाचा वध केल्यानंतर इंद्र आदि देव अग्नीला पुढे करून त्या कात्यायनी देवीची स्तुती करू लागले. श्री दुर्गा सप्तशतीच्या अकराव्या अध्यायातील ही स्तुती पर स्तोत्रे  आहेत. हे देवी कात्यायनी च्या सन्मानार्थ गायलेले  स्तोत्र आहे.
हा देवी माहात्म्य किंवा दुर्गा सप्तशतीचा अकरावा  अध्याय आहे, जो मार्कंडेय पुराणाचा एक भाग आहे. देवी महात्म्यात मार्कंडेय पुराणातील ८१-९३ अध्यायात आहेत. यात दुर्गेच्या राक्षसांविरुद्धच्या लढाईतील कथा आणि शोषणाचे वर्णन केले आहे. देवीचे आशीर्वाद आणि संरक्षण मिळावे म्हणून दुर्गापूजेदरम्यान भक्त या श्लोकांचा जप करतात.
आजचा श्लोक:
विश्वेश्वरि त्वं परिपासि विश्वं विश्वात्मिका धारयसीति विश्वम् ।
विश्वेशवन्द्या भवती भवन्ति विश्वाश्रया ये त्वयि भक्तिनम्राः ॥३१॥
मराठी अर्थ:
हे विश्वेश्वरी ! तू संपूर्ण सृष्टीचे पालन करतेस ! तू विश्वरूपा आहेस म्हणून संपूर्ण विश्व धारण करतेस. तू भगवान विश्वनाथाला शंकराला ही वंद्य आहेस ! जे लोक भक्तिपूर्वक तुझ्यापुढे नतमस्तक होतात ते संपूर्ण विश्वाला आश्रय देणारेही होतात. ।। ३१।।

Видео #रोज एक श्लोक #इंद्रादिकृत नारायणी स्तुती ३१ #indradikrut Narayani Stuti 31 #मराठी अर्थासह канала #Roj ek shlok #Vasundhara Rasal #रोज एक श्लोक
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки