Загрузка страницы

तलाठ्याने लिहलेला सातबारा समजून घेऊयात | Understand Satbara Utara | 7/12 Utara

#SatbaraUtara #farmar #agriculture

तलाठ्याचा सातबारा समजून घेऊयात !!! Understand Satbara Utara
7/12 Utara

मित्रानो या व्हिडियोच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सातबारा उतारा कसा वाचायचा.

ऑनलाईन सातबारा बघण्यासाठी - https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/

७/१२ चा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. या सर्वाची माहिती (७/१२)सातबारा उताऱ्यामध्ये असते.

७/१२ उतारा काय दर्शवितो?
प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे ७ /१२ (सातबारा) उतार्‍यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.

अ) गाव नमुना ७ च्या उतार्‍याच्या डाव्या बाजूस भूमापन्/सर्व्हे/गट नं व हिस्सा नं. दाखविलेला असतो. सरकारने प्रत्येक जमिनीच्या गटाला एक नंबर दिलेला असतो, त्याला भूमापन किंवा सर्व्हे नंबर किंवा गट नंबर म्हणतात. आणि या प्रकारातील जमिनीचा हिस्सा कितवा आहे हे हिस्सा नंबर मध्ये दाखविलेले असते. त्याजवळच जमीन ज्या प्रकाराने धारण केलेली असते ती भूधारण पद्धती दाखविलेली असते. सदरची जमीन त्या व्यक्तीकडे कशी आली हे त्यावरून कळते.

भोगवटादार वर्ग१ म्हणजे ही जमीन वंशपरंपरेने चालत आलेली, मालकीहक्क असलेली असते.यालाच खालसा असेही म्हणतात.
भोगवटादार वर्ग२ म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेल्या जमिनी. जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री, भाडेपट्टा, गहाण, दान्, हस्तांतरण करता येते. सरकारने विशिष्ट शर्ती किंवा विशिष्ट कामांसाठी किंवा मुदतीसाठी किंवा भाडेपट्ट्याने दिलेली जमिन भूधारणमध्ये मोडते. अशा अटींचा भंग केल्यास सरकार ती काढून घेते.या इनाम्,वतन वर्गातल्या जमिनी असतात.
भूमापन क्रमांकाचे स्थानिक नाव या रकान्यात शेतकर्‍याने आपल्या जमिनीला नाव दिलेले असल्यास(खाचर/वाळूखाच) उल्लेख असतो.

त्याखाली जमिनीचे 'लागवडीचे योग्य क्षेत्र' यात जिरायत्,बागायत,भातशेतीचे क्षेत्र याची एकूण नोंद असते.हे क्षेत्र एकर/हेक्टर व गुंठे/आर मध्ये दाखविलेले असते.

त्याखाली पो.ख. म्हणजे 'पोट खराबा' म्हणजे लागवडीस पूर्णतः अयोग्य असे क्षेत्र दाखविलेले असते.यात पुन्हा वर्ग्(अ) म्हणजे शेतातील बांध/नाले/खाणी यांचा समावेश होतो, तर वर्ग(ब) मध्ये रस्ते,कालवे,तलाव व विशिष्ठ कामांसाठी राखून ठेवलेल्या जमिनीची नोंद असते. त्याखाली 'आकार',जमिनीवर लावण्यात येणारा कर रु./पैसे मध्ये दिलेला असतो.

गाव नमुना ७च्या मध्यभागी मालकाचे किंवा कब्जेदाराचे नाव दिलेले असते.प्रत्यक्ष व्यवहाराच्यावेळी सातबारा उतारा पाहिला असता जर जमीन विकत देणार्‍याच्या नावास कंस केला असेल तर ती त्या जमिनीची मालक नाही असे समजावे.जमीन विकल्यावर अगोदरच्या नावास कंस करून नवीन मालकाचे नाव त्याखाली लिहिले जाते.मालकाचे नावाशेजारी,वर्तुळात काही क्रमांक दिलेले असतात, त्याला फेरफार असे म्हणतात.

ब) गावनमुना ७च्या उजव्या बाजूला भूधारकाच्या जमिनीचा खातेक्रमांक व त्याखाली कोणाची कुळवहिवाट असेल तर त्या कुळाचे नाव लिहिलेले असते व खंडाची रक्कम दाखविलेली असते.

'इतर हक्क' मध्ये मालमत्तेमध्ये इतर अधिकार धारण करणाऱ्याच्या नावाची नोंद असते.या सदरात जमिनीसंदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे की नाही हे पाहायला मिळते.

काही वेळेला संपूर्ण जमीन न घेता त्यातील काही भागच विकत घेतला जातो. अशा भागाला तुकडा असे म्हणतात. इतर हक्क मध्ये 'तुकडेबंदी' असे नमूद केलेले असेल आणि जर ती शेतजमीन असेल तर ती शेतजमीन तुकडे पाडून विकता किंवा विकत घेता येत नाही.

'पुनर्वसनासाठी संपादित' असा शेरा असल्यास आणि सरकारला रस्ते, धरण यासाठी जी जमीन संपादित करायची असेल त्यातील शेतकऱ्याचे पुनर्वसनासाठी सरकार इतर जमिनी संपादित करू शकते. तेव्हा अशी जमीन सरकारचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय विकता येत नाही.

कुळकायदा कलम ४३ च्या बंधनास पात्र राहून असा शेरा असल्यास अशी जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही.

कुळकायदा कलम ८४ च्या बंधनास पात्र असा शेरा असल्यास आणि शेतीवापरासाठी असलेली जमीन विकत घ्यायची असल्यास विकत घेणारी व्यक्ती ही शेतकरी असलीच पाहिजे. ती व्यक्ती शेतकरी नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून तशी परवानगी घ्यावी लागते

#satbara #सात_बाराचा_उतारा #सातबारा #talathi #8A #Utara #bhumiabhilekh #agriculture #land #शेती #farmer #शेतकरी

Follow me on:-
facebook : https://www.facebook.com/umeshmahadik57
Instagram : https://www.instagram.com/umeshmahadik7
Amazon : https://www.amazon.in/shop/umeshmahadik
YouTube : https://www.youtube.com/UmeshMahadik
Blogger : https://umeshmahadik.blogspot.com
Twitter : https://twitter.com/mahadik14

If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

Видео तलाठ्याने लिहलेला सातबारा समजून घेऊयात | Understand Satbara Utara | 7/12 Utara канала Umesh Mahadik
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
21 марта 2017 г. 22:58:23
00:07:58
Другие видео канала
सातबारा उताऱ्यातील आपला हिस्सा आणि आनेवारी कशी काढायची ?आणे,आनेवारी,,aanewari,aanevari MO.9730607617सातबारा उताऱ्यातील आपला हिस्सा आणि आनेवारी कशी काढायची ?आणे,आनेवारी,,aanewari,aanevari MO.9730607617फेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती #ferfar #eferfar #PrabhuDevaफेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती #ferfar #eferfar #PrabhuDevaEP 268 इंदिरा गांधी हत्याकांड / काय घडले त्या दिवशी by dsdEP 268 इंदिरा गांधी हत्याकांड / काय घडले त्या दिवशी by dsdरामायण घडल पण रावणाच वय किती | इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन | indurikar maharaj comedy kirtanरामायण घडल पण रावणाच वय किती | इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन | indurikar maharaj comedy kirtan7/12 वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी | अशी 7/12 नावात, इतर हक्कात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती!!7/12 वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी | अशी 7/12 नावात, इतर हक्कात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती!!कोर्ट केस न करता जमिनीवरील ताबा कसा मिळवायचा | land possessionकोर्ट केस न करता जमिनीवरील ताबा कसा मिळवायचा | land possessionवडीलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदारांची वाटप नोंद कशी करतात lPartition & Seperation of land lवडीलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदारांची वाटप नोंद कशी करतात lPartition & Seperation of land l😅लेटेस्ट भांडण माझ्या नवऱ्यावर लाईन मारीती-🙊जावा जावा भांडण🙈bhandan💕भांडकुदळ जावा जावा😂😅लेटेस्ट भांडण माझ्या नवऱ्यावर लाईन मारीती-🙊जावा जावा भांडण🙈bhandan💕भांडकुदळ जावा जावा😂ऑनलाईनचा  सातबारा समजून घेऊया | UNDERSTAND ONLINE SATBARA | 7/12 Utaraऑनलाईनचा सातबारा समजून घेऊया | UNDERSTAND ONLINE SATBARA | 7/12 Utaraबोरवेल ची मोटर गाळात फसली या प्रकारे काढा Borewell Motor Jam How to Remove a stuck Borewell Motor?बोरवेल ची मोटर गाळात फसली या प्रकारे काढा Borewell Motor Jam How to Remove a stuck Borewell Motor?कूळ म्हणजे काय? कूळ कसा तयार होतो? कूळाचे कोणते हक्क असतात? II Kul Kayda Understand!!!कूळ म्हणजे काय? कूळ कसा तयार होतो? कूळाचे कोणते हक्क असतात? II Kul Kayda Understand!!!जमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी II CARE BEFORE BUYING A LANDजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी II CARE BEFORE BUYING A LANDजमीन मोजणी करा मोबाईलवर 2 च मिनिटात II Land measurement in 2 minutes!!!जमीन मोजणी करा मोबाईलवर 2 च मिनिटात II Land measurement in 2 minutes!!!वडीलाच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क, कायदे संपूर्ण माहिती!!!वडीलाच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क, कायदे संपूर्ण माहिती!!!गुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी | How to measure land in guntha In Marthi | skill in Marthiगुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी | How to measure land in guntha In Marthi | skill in Marthiडिजिटल सातबारा उतारा समजून घेऊया !!! UNDERSTAND DIGITAL SATBARA !!! 712 Utaraडिजिटल सातबारा उतारा समजून घेऊया !!! UNDERSTAND DIGITAL SATBARA !!! 712 Utaraजमीन खरेदी विक्रीचे फसवणुकीचे प्रकार | land buying & selling fraud typesजमीन खरेदी विक्रीचे फसवणुकीचे प्रकार | land buying & selling fraud typesजमिनीच्या मालकी हक्कांत बदल कोणत्या गोष्टींमुळे होऊ शकतो ?फसवणूक,धोक्याने,गुपचुप जमीन नावे करून घेणेजमिनीच्या मालकी हक्कांत बदल कोणत्या गोष्टींमुळे होऊ शकतो ?फसवणूक,धोक्याने,गुपचुप जमीन नावे करून घेणेवर्ग 2 जमीनी वर्ग 1 कशा कराव्यात ? - तन्मय केतकरवर्ग 2 जमीनी वर्ग 1 कशा कराव्यात ? - तन्मय केतकर
Яндекс.Метрика