Загрузка страницы

कूळ म्हणजे काय? कूळ कसा तयार होतो? कूळाचे कोणते हक्क असतात? II Kul Kayda Understand!!!

कूळ हक्क :
आजरोजी जमीन कसणार्‍या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्याखेरीज कूळ हक्काबाबत स्पष्ट जाणीव शेतकर्‍यांमध्ये होणार नाही. हे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
(1) सन 1939 च्या कूळ कायद्यात दिनांक 1.1.1938 पूर्वी सतत 6 वर्षे कूळ म्हणून जमीन करणार्‍या व्यक्तीला किंवा दिनांक 1.1.1945 पूर्वी सतत 6 वर्षे जमीन कसणारा आणि दिनांक 1.11.47 रोजी जमीन कसणारा कूळ या सर्वांची नोंद नोंदणीपत्रकात संरक्षीत कूळ म्हणून केली गेली.
(2) सन 1955 साली कूळ कायद्यात काही सुधारणा करण्यांत आली. ही सुधारणा करण्यापूर्वी वहिवाटीमुळे किंवा रुढीमुळे किंवा कोर्टाच्या निकालामुळे ज्या व्यक्तींना कायम कूळ म्हणून संबोधण्यांत आले व ज्यांची नोंदणी हक्कनोंदणी पत्रकात कायम कूळ म्हणून नोंद केली गेली त्या सर्वांना कायम कूळ असे म्हटले जाते.
(3) आजरोजी दुसर्‍याच्या मालकीची कोणतीही जमीन कायदेशीररित्या जर एखादा माणूस कसत असेल व अशी जमीन, जमीनमालकाकडून जातीने कसण्यांत येत नसेल तर त्याला कूळ असे संबोधले जाते. याचाच अर्थ तो माणूस जमीन मालकाच्या कुटूंबातील नसला पाहिजे किंवा जमीन गहाण घेणारा नसला पाहिजे किंवा पगारावर ठेवलेला नोकर नसेल किंवा मालकाच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखीखाली जमीन कसत नसेलतर त्याला कूळ असे म्हणतात.
(4) कूळ होण्याच्या नियमाला काही महत्वाचे अपवाद करण्यांत आले आहेत. विधवा किंवा अवयस्क व्यक्ती किंवा शरीराने किंवा मनाने दुर्बल झालेला माणूस किंवा सैन्यदलात काम करणारा माणूस, यांची जमीन दुसरी व्यक्ती जर कसत असेल तरी, त्या व्यक्ती स्वत:च जमीन कसतात असे मानले जाते.
(5) कूळ हक्काच्या संदर्भातील दुसरी बाजू म्हणजे जमीन मालकाने स्वत:हून जमीन कसणे होय. याची व्याख्यासुध्दा कूळ कायद्यात करण्यांत आली आहे. एखादा इसम स्वत: जमीन कसतो काय, हे ठरविण्यासाठी खालील नियम लावले जातात.
(अ) स्वत: अंगमेहनतीने तो जमीन कसत असेल तर,
(ब) स्वत:च्या कुटूंबातील कोणत्याही इसमाच्या अंगमेहनतीने जमीन कसत असेल तर,
(क) स्वत:च्या देखरेखीखाली मजूरीने लावलेल्या मजूरांकडून जमीन करुन घेत असेल तर, असे मजूर कि ज्याला पैसे दिले जात असोत किंवा मालाच्या रुपाने वेतन दिले जात असो. परंतू पिकाच्या हिश्श्याच्या रुपाने जर मजूरी दिली गेली तर तो कूळ ठरु शकतो.
(6) कूळ ही संकल्पना समजण्यास थोडी अवघड आहे, परंतु कूळ होण्यासाठी खालील महत्वाचे घटक मानले जातात.
(अ) दुसर्‍याच्या मालकीची जमीन अन्य इसम वैध किंवा कायदेशीररित्या कसत असला पाहिजे.
(ब) जमीन मालक व कूळ यांच्यात तोंडी का होईना करार झाला असला पाहिजे व तोंडी करार कोर्टात सिध्दा झाला पाहिजे.
(क) असा इसम प्रत्यक्ष जमीन कसत असला पाहिजे व त्या बदल्यात तो मालकाला खंड देत असला पाहिजे.
(ड) जमीन मालक व कूळ यांच्यात पारंपारिकरित्या जपलेले मालक व कूळ असे विशिष्ठ सामाजिक नाते असले पाहिजे.
कूळ कायदा कलम-43 च्या अटी :
जी कूळे, यापूर्वी जमीनीचे मालक झाले आहेत, त्यांच्याञ्ृष्टीने कूळ कायदा कलम 43 नुसार जमीन विकायला बंदी केली जाते व तसा शेरा त्याच्या 7/12 वर इतर हक्कात लिहिला असतो. "कूळ कायदा कलम-43 ला पात्र", अशाप्रकारचा हा शेरा 7/12 वर लिहिला जातो. शहरीकरणामुळे किंवा स्वत:च्या गरजेनुसार जमीन विकण्याची आवश्यकता असल्यास, कूळांना अशी जमीन विकण्यापूर्वी प्रांत अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. जमीन विक्रीची परवानगी कोणाला द्यावी याबाबतचे नियमदेखील शासनाने बनविले आहे. त्यानुसार कूळ कायदा कलम-43 ला पात्र असलेली जमीन खालील अटींवर विकता येते.
(1) बिगर शेती प्रयोजनासाठी.
(2) धर्मादाय संस्थांसाठी किंवा शैक्षणिक संस्थेसाठी किंवा सहकारी संस्थेसाठी.
(3) दुसर्‍या शेतकर्‍याला परंतू जर असे कूळ कायमचा शेती व्यवसाय सोडून देत असेल तर किंवा जमीन कसायला असमर्थ ठरला असेल तर.
(4) अशी जमीन विकण्यापूर्वी शासकीय खजिन्यात अतिशय नाममात्र म्हणजे जमीनीच्या आकाराच्या 40 पट एवढी नजराण्याची रक्कम भरावी लागते. याचा अर्थ अशी जमीन सार्वजनिक कामासाठी किंवा संस्थांना विकतांना फारशा जाचक अटी नाहीत. परंतू सर्रास दुसर्‍या जमीन मालकास अतिशय किरकोळ पैसे भरुन मालकीच्या झालेल्या जमीनी, कूळांनी परस्पर विकू नयेत म्हणून वरील क्र.3 ची महत्वाची अट ठेवण्यांत आली आहे. व त्यांना शेवटचा उपाय म्हणून शेती व्यवसाय सोडतानाच अशी कूळ हक्काची जमीन विकली पाहिजे असा याचा अर्थ आहे.
नव्याने कुळहक्क निर्माण होतो का?
आज एखादा इसम कूळ होऊ शकतो का? कूळ कायदा कलम-32 (ग) नुसार दिनांक 1.4.57 रोजी जमीन कसणार्‍या माणसाला मालक म्हणून जाहिर केले आहे, परंतु आजरोजी जमीनीत नव्याने #कूळ निर्माण होऊ शकतो काय? व असल्यास क शा पध्दतीने कूळ निर्माण होतो याबाबत शेतकर्‍यांमध्ये कुतूहल आहे. याबाबतची तरतूद कूळ कायद्याच्या कलम-32 (ओ) मध्ये नमूद करण्यांत आली आहे.
कूळ कायदा कलम-32 (ओ) नुसार आजही दुसर्‍याची जमीन कायदेशीररित्या एक वर्ष जरी दुसरा इसम कसत असेलतर तो कूळ असल्याचा दावा करु शकतो. तथापी त्यासाठी खालील महत्वाच्या अटी कायम आहेत.
(अ) वहिवाटदार व मालक यांच्यात करार झाला असला पाहिजे.
(ब) तो मालकाकडून जमीन कसत असला पाहिजे.
(क) तो खंड देत असला पाहिजे.
(ड) जमीन मालक व कूळ असे विशिष्ठ नातेसंबंध असले पाहिजेत.
आजकाल जमीन मालक स्वत:हून कोणतेही करार वहिवाटदाराशी करीत नसल्यामुळे, कलम-32(ओ) च्या दाव्यांची संख्या अतिशय अल्प आहे. जमीन मालकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे अशा पध्दतीचे कोणतेही करार तो वहिवाटदाराबरोबर करीत नाही. तथापी आधी पिक पाहणीला नांव लावून घ्यावयाचे व एक वर्षाच्या पिक पाहणीचा 7/12 जोडून दिवाणी न्यायालयातून जमीन मालकाला जमीनीत यायला मनाई आदेश आणावयाचे व त्यानंतर काही दिवसांनी कलम-32 (ओ) नुसार कूळ असल्याचा दावा करावयाचा अशाप्रकारे वहिवाटदार व्यक्ती कूळ असल्याचा दावा सर्वसाधारणपणे करतात.
#kulkayda
#कुळकलम

Видео कूळ म्हणजे काय? कूळ कसा तयार होतो? कूळाचे कोणते हक्क असतात? II Kul Kayda Understand!!! канала ham shikenge
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
30 марта 2019 г. 20:05:48
00:08:37
Другие видео канала
विचारा LIVE : सात बारा उतारा (अॅड महेश कुंटे)विचारा LIVE : सात बारा उतारा (अॅड महेश कुंटे)आपल्या जमिनीवर,जागेवर,भाडेच्या घरावर अतिक्रमण?encroachment,encroachment on farm land,,Mo-9730607617आपल्या जमिनीवर,जागेवर,भाडेच्या घरावर अतिक्रमण?encroachment,encroachment on farm land,,Mo-9730607617सातबार्‍यावर लिहलेले भोगवाटदार १, भोगवाटदार २, भोगवाटदार ३ म्हणजे काय पूर्ण माहिती II Sathbaraसातबार्‍यावर लिहलेले भोगवाटदार १, भोगवाटदार २, भोगवाटदार ३ म्हणजे काय पूर्ण माहिती II Sathbaraगुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी | How to measure land in guntha In Marthi | skill in Marthiगुंठ्यामध्ये जमीन कशी मोजावी | How to measure land in guntha In Marthi | skill in Marthiवडिलोपार्जित  संपत्तीवर मुलींचा वारसा हक्क संपूर्ण माहिती lHindu Varasa Hakka Kayda Sudharana 2005 lवडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा वारसा हक्क संपूर्ण माहिती lHindu Varasa Hakka Kayda Sudharana 2005 lमहत्वाची जमीनीचे कागदपत्रे (रेकॉर्ड) बाबत माहिती.महत्वाची जमीनीचे कागदपत्रे (रेकॉर्ड) बाबत माहिती.Register heirs now in just 15 days I करुन घ्या वारस नोंद आता फक्त १५ दिवसात.Register heirs now in just 15 days I करुन घ्या वारस नोंद आता फक्त १५ दिवसात.हिंदू वारसाहक्क कायद्याने 16 खरे कायदेशीर वारस ?कायदेशीर वारस कोण कोण असतात ?वारस नोंद l वारसा हक्कlहिंदू वारसाहक्क कायद्याने 16 खरे कायदेशीर वारस ?कायदेशीर वारस कोण कोण असतात ?वारस नोंद l वारसा हक्कlAdverse Possession Property Law | अब संपत्ति उसकी जिसका उस पर कब्जा होगा | Latest Judgement 2019Adverse Possession Property Law | अब संपत्ति उसकी जिसका उस पर कब्जा होगा | Latest Judgement 2019जमीन खरेदी विक्रीचे फसवणुकीचे प्रकार | land buying & selling fraud typesजमीन खरेदी विक्रीचे फसवणुकीचे प्रकार | land buying & selling fraud typesवडीलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदारांची वाटप नोंद कशी करतात lPartition & Seperation of land lवडीलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदारांची वाटप नोंद कशी करतात lPartition & Seperation of land lतलाठ्याने लिहलेला सातबारा समजून घेऊयात | Understand Satbara Utara | 7/12 Utaraतलाठ्याने लिहलेला सातबारा समजून घेऊयात | Understand Satbara Utara | 7/12 Utaraजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी II CARE BEFORE BUYING A LANDजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी II CARE BEFORE BUYING A LANDफेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती #ferfar #eferfar #PrabhuDevaफेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती #ferfar #eferfar #PrabhuDevaसावधान हे माहीत नसेल तर घर जमिन संपत्ती तुमची राहणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय Adverse Possessionसावधान हे माहीत नसेल तर घर जमिन संपत्ती तुमची राहणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय Adverse Possessionकूळ कायदा कलम-४३ च्या अटी | कूळ कायदा कलम-३२ (ग) च्या अटी | कूळ कायदा कलम-३२ (ओ) च्या अटी | कुळ हक्ककूळ कायदा कलम-४३ च्या अटी | कूळ कायदा कलम-३२ (ग) च्या अटी | कूळ कायदा कलम-३२ (ओ) च्या अटी | कुळ हक्क7/12 वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी | अशी 7/12 नावात, इतर हक्कात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती!!7/12 वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी | अशी 7/12 नावात, इतर हक्कात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती!!माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज कसा करावा आणि माहिती कशी मिळवावी  कमलाकर शेणॉयमाहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज कसा करावा आणि माहिती कशी मिळवावी कमलाकर शेणॉयशेतजमीनीच्या शासकीय मोजणीबाबत संपुर्ण माहिती.शेतजमीनीच्या शासकीय मोजणीबाबत संपुर्ण माहिती.
Яндекс.Метрика