ओल्या काजूची भाजी | झटपट आणि चविष्ट रेसिपी Tender Cashew Masala
ओल्या काजूची भाजी बनवताना, सर्वप्रथम एका स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवले. पाणी चांगले उकळल्यावर त्यामध्ये काजूच्या बिया टाकल्या. काजूच्या बिया टाकल्यानंतर गॅस बंद करून त्या झाकून दहा ते पंधरा मिनिटे ठेवल्या. त्यानंतर त्या सोलून घेतल्या.
यानंतर, एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात खडा मसाला टाकला—पाच काळ्या मिरी, दोन लवंगा , एक छोटा दालचिनीचा तुकडा , एक वेलची आणि जिरे. खडा मसाला परतल्यावर त्यात बारीक चिरलेले दोन मध्यम आकाराचे कांदे टाकले. कांदा लालसर झाला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घातला. टोमॅटो मऊ झाल्यावर, पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि दीड इंच आले यांची आले-लसूण पेस्ट तयार करून घातली. त्यासोबत दोन चमचे तूप घालून मिश्रण छान परतले. नंतर हळद, तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला घालून परतले.
यानंतर, मी आधीच तयार करून ठेवलेले वाटण टाकले (ही वाटणाची रेसिपी मी कारल्याच्या भाजीच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे). वाटण तेल सुटेपर्यंत परतले, मग त्यात अर्धा बटाटा आणि सोललेले ओल्या काजूचे बिया घालून सर्व मिश्रण छान मिक्स केले. त्यात थोडे पाणी घातले. बीट बारीक किसून त्यात अर्धा ग्लास पाणी घालून, तो पाणी गाळून तो पाणी भाजीमध्ये घातला. यामुळे भाजीला छान लालसर रंग येतो.
झाकण ठेवून त्यावर थोडे पाणी टाकले आणि मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिटे शिजवले. शेवटी, झाकण काढून काजूच्या बिया शिजल्या आहेत का ते तपासले. नंतर गॅस बंद करून त्यावर कोथिंबीर घालून. गरमागरम भाजी भाकरीसोबत सर्व्ह करा.
Видео ओल्या काजूची भाजी | झटपट आणि चविष्ट रेसिपी Tender Cashew Masala канала Tasty Bites with Amruta

Комментарии отсутствуют
Информация о видео
25 марта 2025 г. 16:16:01
00:02:53
Другие видео канала