Загрузка страницы

भारतातील रहस्यमयी मंदिरे | mysterious Temples of india

उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील गंगोली-हाट भागातील पाताळ भुवनेश्वर गुहेविषयी स्कंद पुराणात सांगण्यात आले आहे की, येथे महादेवाचा निवास आहे. स्थानिक मान्यतेनुसार या गुहेतून गूढ आवाज येतात. या गुहेत चार खांब असून यांना सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग म्हटले जाते. यामधील पहिल्या तीन खांबांच्या आकारामध्ये हजारो वर्षांपासून कोणताच बदल झालेला नाही. परंतु कलियुगाच्या खांबाविषयी येथील पुजारी सांगतात की, सात कोटी वर्षांपासून हे पिंड एक इंचाने वाढत आहे.
येथे जाणून घ्या, या रहस्यमयी गुहेविषयी...
- या खांबांच्या पलीकडे गुहेमध्ये असे ठिकाण आहे, जेथे महादेवाने श्रीगणेशाचे कापलेले शीर ठेवले आहे. संपूर्ण जगात हे एकमेव असे ठिकाण आहे, जेथे श्रीगणेशाची शीर नसलेली मूर्ती आहे. गणेश मूर्तीच्या ठीक वर 108 पाकळ्यांचे ब्रह्मकमळ असून यातून पाणी टपकत राहते.
- गुहेमध्ये नागाच्या आकृतीची एक मोठी शिळा आहे. असे मानले जाते की, राजा परीक्षितला मिळालेल्या शापातून मुक्ती देण्यासाठी त्यांचा मुलगा जन्मेजयने याच कुंडात सर्व नागांना जाळून भस्म केले होते. परंतु तक्षक नाग यातून वाचला आणि या नागाने परीक्षित राजाला यमसदनी पाठवले.
जैसलमेरपासून 130 किमी दूर भारत-पाक सीमेवर 1200 वर्षाचे जुने तनोट माता मंदिर तेथे घडलेल्या चमत्कारांमुळे आज देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. आवड माता मंदिर या नावानेही ते ओळखले जाते. अश्विन व चैत्र नवरात्रीला येथे प्रचंड मोठी यात्रा भरते. बलुचिस्तानातील हिंगलाज मातेचेच हे रूप असल्याचे सांगितले जाते. हिंगलाज माता मंदिर हे देवी सतीच्या 52 शक्तिपीठातील एक स्थान आहे.
या मंदिराचे वैशिष्टय़ व महत्त्व जगापुढे आले ते 1965 सालच्या भारत-पाक युद्धानंतर. या मंदिर परिसरात पाकिस्तानने 3000 बाँबचा वर्षाव केला होता मात्र या मंदिराला त्यांचा कोणताही उपसर्ग पोहोचला नाही. इतकेच नव्हे तर मंदिर परिसरात पडलेले 450 हून अधिक बाँब फुटलेच नाहीत. हे बाँब आज मंदिरातील संग्रहालयात जतन करण्यात आले आहेत. या मंदिराची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे आहे व तेथे त्यांची चौकी पण आहे.
#mysterious_mandir #mysterious_temple #nidhivan #patal_bhuvneshwar #tanot_mata_mandir #mundeshwarmandr
Music Credit: Floating Cities - Kevin Mcleod (http://incompetech.com/)

Видео भारतातील रहस्यमयी मंदिरे | mysterious Temples of india канала mysterious facts marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 июня 2021 г. 19:23:01
00:06:39
Яндекс.Метрика