Загрузка страницы

१५ मिनिटातच जमीन मोजायला शिका | जमीन मोजणी कशी करावी |शेत जमीन कशी मोजावी,जमीन,How to measure land,

Tital:
१५ मिनिटातच जमीन मोजायला शिका | जमीन मोजणी कशी करावी |शेत जमीन कशी मोजावी,जमीन,How to measure land
व्हिडिओ संदर्भात थोडक्यात माहिती:
गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी ?
-How to measure land in guntha?
-एक गुंठा म्हणजे किती जमीन ?
-एकर मध्ये जमीन कशी मोजावी ?
-हेक्टर म्हणजे किती जमीन ?
-हे  प्रश्न बऱ्याच जणांना पडले  असतील  कारण आपल्याला हे माहित आहे कि जमीन गुंठ्यामध्ये मोजतो. पण गुंठा म्हणजे नेमकी किती जमीन,गुंठ्यामध्ये जमीन मोजणी कशी करायची असते हे फक्त त्या क्षेत्रात काम करणार्यांनाच माहित असते . 
-जमिनीचा व्यवहार करताना किंवा जमिनीच्या कामासाठी आपल्याला जमिनीचे क्षेत्र ( area ) माहित असणे महत्वाचे असते.महाराष्ट्रात गुंठा हे एकक जमीन मोजणीसाठी जास्त वापरले जाते. गुंठ्यामध्ये जमीन मोजणी करणे हे काही अवघड काम नाही.कोणीही सातवी - आठवी शिक्षण झालेला माणूस जमीन मोजणी करू शकतो. पण सध्याची परिस्थिती पाहता ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना सुध्या ही माहिती नाही. आपण फक्त ७/१२ वर किती गुंठे आहे किंवा इतरांच्या सांगण्यावरून आपल्या जमिनीचे  मोजमाप ठरवतो
आता गुंठ्यामध्ये जमीन मोजायची कशी हे पाहू 
-A) जर आपली जमीन आयताकार किंवा चौरसाकार असेल म्हणजेच जमिनीच्या सर्व बाजू किंवा समोरासमोरील बाजूचे अंतर सामान असतील तर ... 
1 गुंठा म्हणजे  1089 चौरस फूट 
1 एकर म्हणजे 40 गुंठे 
1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे 
-1 . सर्वात पहिल्यांदा आपल्या जमिनीच्या बाजूंचे अंतर फुटामध्ये  मोजून घ्यावे. 
-2. यामध्ये जमिनीची लांबी व रुंदी या दोन बाजू असतील त्यांचा  गुणाकार करावा. 
-3 . येणारे उत्तर हे जमिनीचे क्षेत्रफळ असेल. त्या क्षेत्रफळास 1089 सोबत भागाकार करावा म्हणजे आपली जमीन किती गुंठे आहे हे उत्तर मिळेल . 
-क्षेत्रफळ = लांबी  x रुंदी 
गुंठे = जमिनीचे क्षेत्रफळ ( चौरस फूट ) / 1089 
एकर = गुंठे  /  40 
-B) जर जमिनीचा आकार आयात किंवा चौरस नसेल तर यासाठी जास्त गणिती पद्धत वापरण्याची आवश्यकता नाही आपण मोबाइल चा वापर करून कोणत्याही प्रकारच्या जमिनीच मोजमाप गुंठा व एकर मध्ये करू शकतो. त्यासाठी खालील व्हिडिओ मध्ये त्याची संपूर्ण माहिती उदाहरणासह दिलेली आहे ती पहावी जेणेकरून ती सहजपणे समजून जाईल. 
  सध्याच्या काळात शिक्षणापेक्षा जास्त महत्व हे  व्यावहारिक ज्ञानाला  व माणसामध्ये असलेल्या स्किलला आहे. आपण काय शिक्षण घेतले यापेक्षा आपण काय करू शकतो हे जास्त महत्वाचे आहे. 
-नोकरी किंवा व्यवसाय या दोन्हीसाठी हे महत्वाचे आहे. यासाठी  लागणारी  माहिती  आपल्याला इंटरनेटवर  मिळते पण आपल्या मराठी भाषेत कमी प्रमाणात आहे . या वेबसाईटद्वारे नोकरी , व्यवसाय तसेच इतर व्यावहारिक कामांसाठी लागणारी माहिती आपल्यापर्यंत मराठी भाषेत पोहचवण्यासाठी केलेला एक छोटासा उपक्रम  आहे. 
1 हेक्टर म्हणजे किती जमीन ? हेक्टर 
चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं?
पहा व्हिडिओ
यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात. 
जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला           
फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे एकक जास्त वापरले जात होते. 
आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप एककाचा  वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला  हेक्टर:आर:चौ मीटर यामध्ये पाहायला मिळते .
७2 वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे हेक्टर म्हणजे काय ?  हेक्टर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात
आपला पहिला प्रश्न आहे 
हेक्टर म्हणजे काय ?
हेक्टर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजमापाचे एकक  आहे . 
मीटर मध्ये मोजमाप घेतल्यास आपल्याया हेक्टर मध्ये क्षेत्रफळ काढता येते .
1 हेक्टर म्हणजे किती ?
1  म्हणजे 10000 चौ मी 
1 मी x 1 मी = 1 चौ मी 
जेव्हा असे 10000 चौ मी होतात त्यावेळी 1 हेक्टर तयार होतो 
उदा -  100 मी x 100 मी ची जमीन 
यामध्ये जमिनीचे मोजमाप हे मीटरमध्ये घेतले जाते आणि 
त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर 
मध्ये काढून त्यास 10000 ने भागले जाते. 
पुढील सूत्रांचा वापर करून हेक्टर चे गुंठा,एकर ,चौरस फुट ,चौरस मीटर मध्ये रुपांतर करता येते.
अधिक माहितीसाठी VIDEO पहा.
चौरस मीटर = हेक्टर  x 10000 
चौरस फुट = हेक्टर  x 107639
गुंठा =  हेक्टर  x 98.84
एकर = हेक्टर  x 2.471
1 गुंठा = 1089 चौ फुट 
1 आर =1076.39  चौ फुट 
1 एकर  = 40 गुंठे
-आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिदिदिदिलेजाषंगाने विविध प्रकारचे अभिलेख तयार करुन त्यामध्ये मोजणीचे नकाशे तयार केले जातात त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडे त्यांचे संधारण केले जाते. जमिनीच्या मालकी हक्काबाबत.....
-जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधितधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते. ठरलेल्या दिवशी भूमापक जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराच्या मोजणी अर्जदार, लगत कब्जेदार व पंचमंडळी यांच्या समक्ष मोजणी कामास सुरुवात केली जाते. वहिवाटीच्या खुणांवर निशाण लावून त्याआधारे प्लेन टेबलवर ठेवलेल्या नकाशा शीटवर वहिवाटीची आकृती नगरभूमापन मोजणीत 1.500 या परिमाणात तर शेतजमिनीची मोजणी 1.1000 या परिमाणात तयार होते
#जमीनमोजणीकशीकरावी
#जमीनमोजणीकरणे
#जमीनमोजणी
#जमीनमोजणीकशीकरावी
#जमीनमोजणीसूत्र
#जमीनसूत्र
#मोजणीजमीन
#jaminmojnikashikaravi

Видео १५ मिनिटातच जमीन मोजायला शिका | जमीन मोजणी कशी करावी |शेत जमीन कशी मोजावी,जमीन,How to measure land, канала Bramhachaitanya Digital
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 марта 2021 г. 18:37:23
00:23:19
Другие видео канала
Яндекс.Метрика