Загрузка страницы

रानभाजी गुळवेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक। रानभाजी गावाकडची चव ।Tinospora Cordifolia

19|05|2021

बातमी सविस्तर वाचण्यासाठी लिंक
गुळवेल विषयी बातमी
https://twitter.com/gavakadchi/status/1397205770509430793?s=19

ओळख रानभाज्यांची - गुळवेल
ओळख
औषधी गुणधर्म
गुळवेलीच्या भाजीचे औषधी गुणधर्म
पाककृती - गुळवेलीची भाजी

शास्त्रीय नाव - Tinospora Cordifolia (टिनोस्पोरा कॉरडीफोलिया)
कूळ - Menispermaceae (मिनीर्स्पमेसी)
संस्कृत नाव - गुडूची, ज्वरनाशिनी
हिंदी नाव - गिलोय
गुजराती नाव - गुलो
इंग्रजी नाव - हार्ट लिव्हड मूनसीड
स्थानिक नावे - वारुडवेल, अमृतवेल, अमृतवल्ली

गुळवेलीचे बहुवर्षायू वेल महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. ही वनस्पती प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार या देशांत आढळतो.
ओळख
गुळवेलीच्या मोठ्या वेली मांसल असून, मोठ्या झाडांवर व कुंपणांवर पसरलेल्या असतात.
खोड - वेलीच्या खोडास लांब धाग्यांसारखी, हिरवी मुळे फुटून ती खाली लोंबत असतात. खोड बोटांएवढे जाड असून, त्यावरील साल पातळ, त्वचेसारखी असते, नंतर तिचे पापुद्रे निघतात. खोडांवर लहान-लहान छिंद्रे असतात. खोड आडवे कापल्यास आतील भाग चक्राकार दिसतो.
पाने - साधी, एक आड एक, हृदयाकृती. गडद हिरवी व गुळगुळीत असतात. पानांचे देठ लांब. पानांवर 7 ते 9 शिरा दिसतात व पानांची रुंदी 5 ते 10 सें.मी असते.
फुले - लहान पिवळसर-हिरवी नियमित व एकलिंगी असतात. पानांच्या बेचक्‍यातून आलेल्या लांब, नाजूक, खाली लोंबणाऱ्या पुष्पमंजिरीत येतात. नर व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात. पुष्पमंजिरीत नरफुले गुच्छात तर मादी फुले एकांडी येतात. पाकळ्या सहा, पुंकेसर सहा, बीजांडकोश तीन कप्पी, पराग धारिणी तीन विभागी.
फळे - गोलाकार, मोठ्या वाटाण्याएवढी, कठीण कवची. पिकल्यावर लाल, गुच्छाने येतात. बी एक, खडबडीत कवच असणारी.
गुळवेलीला नोव्हेंबर ते जून या कालावधीत फुले, फळे येतात.
औषधी गुणधर्म
गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात.

गुळवेल कुटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे.
ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे.
ती रक्तसुधारक असून, पित्तवृद्धीच्या काविळीत गुणकारी व त्वचारोगात उपयोगी आहे.
मधुमेह, वारंवार मूत्रवेग तसेच प्लिहावृद्धीत उपयुक्त आहे.
गुळवेल कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे.
गुळवेलीचे सत्त्व व काढा वापरतात. गुळवेलीचा पाण्यातील अर्क ज्वरनाशक म्हणून वापरतात. गुळवेलीचा काढा शक्तिवर्धक असून, दुर्बल करणारे रोग, खंडित ताप आणि अपचनात वापरतात. गुळवेल सत्त्व दीर्घकालीन आम्लअतिसारात वापरतात. आतड्यांचा प्रक्षोम आणि शक्ती क्षीण झालेली असताना तसेच संधिवाताची लक्षणे दूर करण्यासाठी ही औषधी वनस्पती महत्त्वाची मानली जाते.
सौम्य विषमज्वरात आणि जीर्णज्वरात गुळवेलीचा चांगला उपयोग होतो.
गुळवेलीने भूक लागते, अन्नपचन चांगले होते, रोग्याचा फिक्कटपणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते. कुपचन, पोटदुखी व काविळीत गुळवेल गुणकारी आहे.
ही वनस्पती त्वचारोगातही उपयुक्त आहे, यामुळे अशाची खाज व दाह कमी होतो.
गुळवेलीच्या भाजीचे औषधी गुणधर्म
गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून भाजी करतात. या भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन होते, त्यामुळे शरीरातील पचनाचे कार्य अधिक चांगले होते.
कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ताप येऊन गेल्यानंतर गुळवेळीची भाजी खाणे फायद्याचे ठरते. कावीळ कमी होण्यास मदत होते.
मधुमेहामध्ये ही भाजी पथ्यकर आहे. साखरेचा इष्टानिष्ट परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे थकवा येतो, अशा अवस्थेत ही भाजी वरचेवर खावी.
वरचेवर येणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी गुळवेळीची भाजी हितावह ठरते.
त्वचेच्या विकारांचे मूळ कारण अनेक वेळा रक्तात असते. रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे.
कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो. तो दूर करण्यासाठी गुळवेलीची भाजी उपयोगी पडते.
पाककृती - गुळवेलीची भाजी
साहित्य - गुळवेलीची कोवळी पाने, चिरलेला कांदा व लसूण, तेल, तिखट. मीठ इ.
कृती - गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन, चिरून घ्यावीत. तेलात कांदा व लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यावी. नंतर त्यामध्ये चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यावे. वाफ देऊन भाजी शिजवून घ्यावी.


स्त्रोत: अग्रोवन



गुळवेलची रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.

माझी इतर रानभाजीची विडीओ :-

रानभाजी अबईच्या शेंगा
https://youtu.be/svdBPco6MRk

रानभाजी माठ/चोपडा माठ
https://youtu.be/7GzySyThgTY

रानभाजी काकोत /चाकवत
https://youtu.be/hiwA2rRPKXU

रानभाजी चिल / चंदन बटवा
https://youtu.be/-73NHybytBo

रानभाजी तिवस /तिळीस फुल
https://youtu.be/-PO3P6ux0JM

रानभाजी कुणेरी/ कुंजरा
https://youtu.be/egZ8I5eNNN4

रानभाजी गाभोळी
https://youtu.be/gm3LdHspIy0

रानभाजी गोखरु :-
https://youtu.be/fnudteohNJQ

रानभाजी चुच
https://youtu.be/0sT11MfB4G8

रानभाजी कुर्डू
https://youtu.be/6_lahEhev20

रानभाजी चाईचा मोहर
https://youtu.be/jlJzoTvI6xg

रानभाजी खुरासणी
https://youtu.be/kEtGq1SrSUA

गावठी अळुची भाजी
https://youtu.be/9FoH1UXBQ1Q

रानभाजी करटुले
https://youtu.be/qgXZHlnv4Ac

रानभाजी आघाडा
https://youtu.be/DfeFyqkesBg

रानभाजी चिचूरडा
https://youtu.be/8FjUFYVBj54

रानभाजी तांदूळजा
https://youtu.be/DvONvAGoLck

राजगिरा भाजी
https://youtu.be/vlB3K3nHtkg

Credit For background music

all credit for background music is goes to YouTube audio music library
please visit to YouTube audio library
Below Link:-https://studio.youtube.com/channel/UCfZrvGgeQHCgYAdJ7lRRS3A/music?utm_campaign=upgrade&utm_medium=redirect&utm_source=%2Faudiolibrary%2Fmusic

#गुळवेल
#रानभाजीगुळवेल
#अमृतवेलमाहिती
#गुळवेलआयुर्वेदिकमहत्त्व

Видео रानभाजी गुळवेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक। रानभाजी गावाकडची चव ।Tinospora Cordifolia канала Gavakadchi Chav
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 мая 2021 г. 0:59:36
00:12:11
Другие видео канала
गावाकडील गावठी हरभरा भाजीचा ठेचा। चटणी।एक अस्सल #रानमेवा।हिवाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चवगावाकडील गावठी हरभरा भाजीचा ठेचा। चटणी।एक अस्सल #रानमेवा।हिवाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चवसह्याद्रीतील दुर्मिळ रानभाज्या व रानमेवा रानमेवा चहु पावसाळ्यातील आरोग्यदायी  रानभाज्या गावाकडची चवसह्याद्रीतील दुर्मिळ रानभाज्या व रानमेवा रानमेवा चहु पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या गावाकडची चवरानभाज्यांचा शोध। माझी #भ्रमंती। पावसाळी आरोग्यदायी रानभाज्या व त्यांचा शोध  ओळख। Gavakadchi Chavरानभाज्यांचा शोध। माझी #भ्रमंती। पावसाळी आरोग्यदायी रानभाज्या व त्यांचा शोध ओळख। Gavakadchi Chavजुन्या काळातील लग्नातील व साखरपुड्यातील गाणे।आदिवासी लोकगिते।जात्यावरील ओव्या। गावाकडील आठवणी। गाणेजुन्या काळातील लग्नातील व साखरपुड्यातील गाणे।आदिवासी लोकगिते।जात्यावरील ओव्या। गावाकडील आठवणी। गाणेरानभाजी कांचन। मंदार। कंचनार। हिवाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चव। ranbhaji recipeरानभाजी कांचन। मंदार। कंचनार। हिवाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चव। ranbhaji recipeरानभाजी चौधरी। चार धारी। गावाकडील दुर्मिळ रानमेवा। हिवाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चवरानभाजी चौधरी। चार धारी। गावाकडील दुर्मिळ रानमेवा। हिवाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चवभारतीय देशी वृक्ष पळस |पालाश |काळा पळस|पळसाचे आयुर्वेदिक महत्व उपयोग|Flame of The Forest|Monospermaभारतीय देशी वृक्ष पळस |पालाश |काळा पळस|पळसाचे आयुर्वेदिक महत्व उपयोग|Flame of The Forest|Monospermaरानमेवा हुरडा।गावाकडील हुरडा पार्टी। अस्सल देशी खाद्य पदार्थ ज्वारी हुरडा।गावाकडची चव। hurada partyरानमेवा हुरडा।गावाकडील हुरडा पार्टी। अस्सल देशी खाद्य पदार्थ ज्वारी हुरडा।गावाकडची चव। hurada partyगावाकडील झणझणीत चुलीवरची मटण भाकरी। पाट्यावरची मटण। गावाकडची चव। Matan Bhakri recipe in Villageगावाकडील झणझणीत चुलीवरची मटण भाकरी। पाट्यावरची मटण। गावाकडची चव। Matan Bhakri recipe in Villageआपट्याची ओळख। खरा सोना। #आपटा #दसराचासोना। #ओळख। #सोना #trendingvideoआपट्याची ओळख। खरा सोना। #आपटा #दसराचासोना। #ओळख। #सोना #trendingvideoरानभाज्यांची ओळख। रानभाजी शिंदळ माकड। शिंदळ। माकुडा। #रानभाज्या व #रानमेवा #trendingvideoरानभाज्यांची ओळख। रानभाजी शिंदळ माकड। शिंदळ। माकुडा। #रानभाज्या व #रानमेवा #trendingvideoरानभाजी बाफळी। तोंडाची चव वाढवणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्यारानभाजी बाफळी। तोंडाची चव वाढवणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्याशेवगाच्या पानांची औषधी रानभाजी। रानभाजी शेवगा। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवा।#ranbhajirecipesशेवगाच्या पानांची औषधी रानभाजी। रानभाजी शेवगा। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवा।#ranbhajirecipesIndian Wild vs Man with child girl।Real village life with child girl।Gavakadchi Chav। forest foodIndian Wild vs Man with child girl।Real village life with child girl।Gavakadchi Chav। forest foodरानभाजी मायाळू। एक आरोग्यदायी रानभाजी। रानभाज्या ओळख। रानभाजी महोत्सव। गावाकडची चव।#ranbhajirecipeरानभाजी मायाळू। एक आरोग्यदायी रानभाजी। रानभाज्या ओळख। रानभाजी महोत्सव। गावाकडची चव।#ranbhajirecipeरानभाजी आंबाडी।अंबाडा। पावसाळ्यातील पचनशक्ती वाढवणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाजीरानभाजी आंबाडी।अंबाडा। पावसाळ्यातील पचनशक्ती वाढवणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाजीगावरान चवळीचा आगळावेगळा । ठेचा । चटणी । गावाकडची चव । Gavakadchi Chavगावरान चवळीचा आगळावेगळा । ठेचा । चटणी । गावाकडची चव । Gavakadchi Chavरानभाजी वासद्या। बांबू कोंब। महिलांसाठी आरोग्यवर्धक रानभाजी। गावाकडची चव। Ranbhaji recipe in marathiरानभाजी वासद्या। बांबू कोंब। महिलांसाठी आरोग्यवर्धक रानभाजी। गावाकडची चव। Ranbhaji recipe in marathiरानभाजी महोत्सव बारीपाडा ता. साक्री जि. धुळे।नाविन्यपूर्ण उपक्रम। दुर्मिळ रानभाज्यांची ओळख व माहितीरानभाजी महोत्सव बारीपाडा ता. साक्री जि. धुळे।नाविन्यपूर्ण उपक्रम। दुर्मिळ रानभाज्यांची ओळख व माहितीगावठी।देसी। वालच्या शेंगांची भाजी। गावाकडची आगळीवेगळी पध्दतीने बनवलेली ।गावाकडची चव।Gavakadchi Chavगावठी।देसी। वालच्या शेंगांची भाजी। गावाकडची आगळीवेगळी पध्दतीने बनवलेली ।गावाकडची चव।Gavakadchi Chavरानभाजी जंगली टमाटे।चेरी टोमॅटो।गावठी टोमॅटो।रानभाजी रेसिपी।गावाकडची चव।रानमेवा व रानभाज्या महोत्सवरानभाजी जंगली टमाटे।चेरी टोमॅटो।गावठी टोमॅटो।रानभाजी रेसिपी।गावाकडची चव।रानमेवा व रानभाज्या महोत्सव
Яндекс.Метрика