सम्राट पृथ्वीराज चव्हाण जयंती उत्साहात साजरी | महाराणा प्रताप उद्यानात भव्य कार्यक्रम संपन्न !
छत्रपती संभाजीनगर (पब्लिकराज ब्यूरो) : स्वाभिमानी राष्ट्रपुरुष सम्राट पृथ्वीराजसिंह चौहान यांच्या ८५९ व्या जयंतीनिमित्त, महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक जिल्हा जयंती उत्सव समितीच्या वतीने महाराणा प्रताप स्मारक उद्यान, कॅनोट प्लेस, सिडको येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम आज सायंकाळी ५:३० वाजता पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विशालसिंह चौहान यांनी पृथ्वीराजसिंह चौहान यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि ऐतिहासिक कार्यावर सखोल प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रतापसिंह राजपूत होते. कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष सुभाष महेर, उपाध्यक्ष एल. डी. ताटू, सहसचिव वासुदेव राजपूत, भावसिंग बैनाडे, नारायण महेर, जगतसिंग परिहार, सुहास बोर्ड, विजय त्रिभुवन, अशिष राजपूत, हरिश्चंद्र राजपूत, भाऊसाहेब वाघमोडे यांच्यासह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सम्राट पृथ्वीराजसिंह चौहान यांच्या राष्ट्रसेवेच्या योगदानाचा गौरव करण्यात आला आणि त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
Видео सम्राट पृथ्वीराज चव्हाण जयंती उत्साहात साजरी | महाराणा प्रताप उद्यानात भव्य कार्यक्रम संपन्न ! канала Publicraj News
Видео सम्राट पृथ्वीराज चव्हाण जयंती उत्साहात साजरी | महाराणा प्रताप उद्यानात भव्य कार्यक्रम संपन्न ! канала Publicraj News
Комментарии отсутствуют
Информация о видео
16 мая 2025 г. 20:46:18
00:08:42
Другие видео канала