Загрузка...

जुना आंबेनळी, दाभीळ आणि बावली घाट | Old Ambenali Ghat, Dabhil Ghat & Bavli Ghat | Pratapgad Region

जुना आंबेनळी घाट आणि दाभिळ घाट - सफर प्रतापगड प्रभावळीतील घाटवाटांची...

प्रतापगड या सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील किल्ल्यावर जायला पूर्वी रायगड जिल्ह्यातून जावळीच्या जंगलातून विविध घाटवाटा होत्या. कालांतराने पोलादपूरहून महाबळेश्वरला जोडणारा डांबरी रस्त्याचा आंबेनळी घाट झाला आणि त्यामुळे प्रतापगड हा किल्ला आता डांबरी रस्त्याने जोडला गेल्याने, येथील घाटवाटांचा वापर कमी किंवा बंद झाला.

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले वाडा कुंभरोशी या गावाला जाण्यासाठी कोकणातील रायगड जिल्ह्यातील आणि सावित्री नदी काठी वसलेल्या हलदुळे, दाभिळ, लहूळसे वगैरे गावांमधून बऱ्याच घाटवाटा आहेत. यांचा वापर आता कमी झाला असला तरी काही स्थानिक गावकरी अजूनही या वाटांचा वापर करतात.

आपण कुंभारोशीहून उतरणाऱ्या दोन घाटवाटांचा ट्रेक करणार आहोत. एका घाटाचे नाव आहे "जुना आंबेनळी घाट" (यालाच दारचा दांड असेदेखील म्हणतात) आणि दुसरी वाट आहे "दाभिळ घाट/दाभिळ टोक". या दोन्ही वाटा देशावरील (जि. सातारा) कुंभरोशी गावाला कोकणातील (जि. रायगड) दाभिळ व लहूळसे गावाबरोबर जोडतात.

*याच बरोबर आपण "बावली टोक / बावली घाट" हा घाट सुद्धा explore केला जो आपल्या प्लॅन मधे नव्हता.

मार्ग: पुणे - वाई - पाचगणी - महाबळेश्वर - कुंभरोशी.

विनायक सपकाळ कुंभरोशी - ‎9356715837 | धोंढीराम शेलार (दाभीळ) - 9405356182

#adventure #adventuretravel #Trekking #Ghat-Vata #offbeat #mahabaleshwar #pratapgad

Видео जुना आंबेनळी, दाभीळ आणि बावली घाट | Old Ambenali Ghat, Dabhil Ghat & Bavli Ghat | Pratapgad Region канала Offbeat Kulkarni
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять