Загрузка страницы

Datta Guru Bavani | दत्त बावनी ऐकल्याने सर्व संकट, दुःख व त्रास दूर होतात

Ttitle - Datta Bavani | दत्त बावनी
Singer - Shubhangi Joshi
Label - Ahuja Music

श्री दत्तबावनी मराठी
जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥

अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥

ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥

अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥

काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥

कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥

आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥

ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥

दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥

केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब । । १०॥

विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥

जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥

पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥

ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥

घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥

बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥

ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद ॥ १७॥

धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥

पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥

स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥

पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥

सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥

वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥ २३॥

वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥

निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥

दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥

घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥

ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥

पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥

अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥

तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥

एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥ ३२॥

तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥

हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥

राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥

शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥

अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥ ३७॥

आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥

मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥

डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥

पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥

करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥

साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥

राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥

नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥

यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥

अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥

सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥

वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥

थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥

अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥

तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

Видео Datta Guru Bavani | दत्त बावनी ऐकल्याने सर्व संकट, दुःख व त्रास दूर होतात канала Bhakti World
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
21 декабря 2018 г. 4:30:01
00:10:41
Другие видео канала
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा  - Digambara Digambara Shripad Vallabh Digambara- Sumeet Musicदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा - Digambara Digambara Shripad Vallabh Digambara- Sumeet Music52 Shloki Gurucharitra | बावन्न श्लोकी गुरुचरित्र | Guru Dattatreya Gurucharitra52 Shloki Gurucharitra | बावन्न श्लोकी गुरुचरित्र | Guru Dattatreya Gurucharitraसकाळी १५ मिनिटे करुणात्रिपदी ऐकल्याने सर्व अडथळे , संकट नष्ट होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतातसकाळी १५ मिनिटे करुणात्रिपदी ऐकल्याने सर्व अडथळे , संकट नष्ट होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतातRam Raksha Stotra Full Audio Song By Anuradha PaudwalRam Raksha Stotra Full Audio Song By Anuradha Paudwalगणपती अथर्वशीर्ष – रोज सकाळी अथर्वशीर्षाचे लक्षपूर्वक स्मरण कर | GEETA MALIगणपती अथर्वशीर्ष – रोज सकाळी अथर्वशीर्षाचे लक्षपूर्वक स्मरण कर | GEETA MALIमहामृत्युंजय मंत्र 108 times I Mahamrityunjay Mantra I SHANKAR SAHNEY l Full HD Video Songमहामृत्युंजय मंत्र 108 times I Mahamrityunjay Mantra I SHANKAR SAHNEY l Full HD Video SongSwami Samarth Tarak Mantra by Padmaja Phenany JoglekarSwami Samarth Tarak Mantra by Padmaja Phenany JoglekarDattatreya Karunatripadi | श्री दत्त करुणा त्रिपदी | Shanta Ho Shree Gurudatta | DattaguruDattatreya Karunatripadi | श्री दत्त करुणा त्रिपदी | Shanta Ho Shree Gurudatta | Dattaguruज्या घरात सकाळी महालक्ष्मी स्तोत्र ऐकले जाते तिथे सुख,समाधान ,धन ,संपत्ती, बँक बॅलन्स नेहमी राहणारज्या घरात सकाळी महालक्ष्मी स्तोत्र ऐकले जाते तिथे सुख,समाधान ,धन ,संपत्ती, बँक बॅलन्स नेहमी राहणारDattatreya KarunatripadiDattatreya Karunatripadiपहाटे स्वामी समर्थ तारकमंत्र  पठन केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात-निशंक होई रे मना |TARAKMANTRAपहाटे स्वामी समर्थ तारकमंत्र पठन केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात-निशंक होई रे मना |TARAKMANTRAGanpati Stotra, Atharvashirsh, Ganpati Gayatri Mantra, Aarti, Mantrapushpanjali, GajarGanpati Stotra, Atharvashirsh, Ganpati Gayatri Mantra, Aarti, Mantrapushpanjali, Gajar- खूप सुंदर काळजाला भिडणारी दत्तगुरूंचे  गाजलेली भक्तिगीते | Datta Bhaktigeete- खूप सुंदर काळजाला भिडणारी दत्तगुरूंचे गाजलेली भक्तिगीते | Datta BhaktigeeteNISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGSNISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGSश्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( गाणगापूर ) | Shree datta sthan mahatmya darshan ( Gangapur )श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( गाणगापूर ) | Shree datta sthan mahatmya darshan ( Gangapur )गजानन महाराज प्रकटदिन विशेष - Gajanan Maharaj Bavani | श्री गजानन महाराज बावन्नीगजानन महाराज प्रकटदिन विशेष - Gajanan Maharaj Bavani | श्री गजानन महाराज बावन्नीSwami Samarth Ashtak - इच्छापूर्ती भयमुक्त स्वामी समर्थांचे महामंत्र | स्वामी समर्थ अष्टकSwami Samarth Ashtak - इच्छापूर्ती भयमुक्त स्वामी समर्थांचे महामंत्र | स्वामी समर्थ अष्टकसकाळी ज्या घरात श्री दत्तगुरूंचे हे महामंत्र ऐकले जाते गुरु कृपेने तिथे कशाचीही कमी पडत नाहीसकाळी ज्या घरात श्री दत्तगुरूंचे हे महामंत्र ऐकले जाते गुरु कृपेने तिथे कशाचीही कमी पडत नाहीGujarati Dutt BavaniGujarati Dutt Bavani
Яндекс.Метрика