Загрузка страницы

कमी खर्चात भरघोस उत्पादनासाठी माती परीक्षण , निमाटोड परीक्षण प्रगतशील शेतकरी का करतात. soil testing

श्री धनंजय शिवाजी गवळी B.A
प्रगतिशील शेतकरी

श्री करण काशिनाथ थोरात B.A
प्रगतिशील शेतकरी

मु.पो.पिंप्री गवळी
ता.पारनेर जि.अहमदनगर

विभागीय कृषी अधिकारी मा श्री रामदास दरेकर साहेब यांच्या मार्गदर्शनातून गट शेती.गट शेतीच्या माध्यमातून सात एकर शेडनेट मध्ये काकडीची लागवड.१४ शेतकऱ्यांची एकत्रित मिळून सात एकर शेडनेट गृहामध्ये काकडीची लागवड.सात एकर शेडनेट मध्ये शिमला मिरची आणि काकडीची लागवड केली जाते.२०१५ पासून गट शेतीची सात एकर मध्ये सुरुवात.
माती समृद्ध झाली तरच शेतकरी समृद्ध होईल.

शेतकरी मित्रांनो माती परीक्षणासोबतच मातीमध्ये असणाऱ्या निमाटोडचे सुद्धा परीक्षण करावे, निमॅटोडमुळे पिकाचे शंभर टक्के पर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकते, हातात आलेले पीक निमाटोड मुळे खराब होते,

माती परिक्षण महत्व व त्याची थोडक्यात माहिती
आपण सर्वांना माहित आहेच कि माती परीक्षण हि काळाची गरज झाली आहे. जवळ जवळ ६०% उत्पन्न हे मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असते. कोणत्याही ऋतू मधली पिकं ही मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असतात. तुम्ही मातीची काळजी न घेता फक्त खतांवर अमाप खर्च केलात तरी शेतीचे उत्पन्न वाढवणे खूप कठीण आहे. शेतामध्ये चांगले पीक आणण्यासाठी सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते. हे आपण एका लेखात पहिले आहे. शेतीतील एक नियम असा सागतो कि तुम्ही तुमच्या पिकाला सगळे सूक्ष्म पोषक घटक दिले आणि त्यातील एक घटक जरी थोडा कमी झाला तरी देखील एकूण उत्पन्नात खूप घट होत असते.
एकाच पिकासाठी आवश्यक असलेली खताची मात्रा आणि प्रकार हे शेत व एकाच शेतातील माती ह्या नुसार बदलू शकते. शेताची सुपीकता वाढविण्यासाठी योग्य खताचा प्रकार व त्याची मात्रा निश्चित करणे गरजेचे असते. माती परीक्षण विना अयोग्य प्रकारची व अयोग्य प्रमाणात खत दिल्यास पिकांचे फार मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. त्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. मृदा तपासणी कृषि प्रयोगशाळे- द्वारे केली जाते.
प्रयोगशाळेतील चाचण्या ही तीन प्रकारांमध्ये वनस्पतींच्या पोषक तत्वांचे परीक्षण करतात.

महत्वाचे पोषक: नायट्रोजन(N), फॉस्फोरस(P), पोटॅशियम(K)

माध्यमिक पोषक: कॅल्शियम,
मॅग्नेशियम,
सल्फर

सूक्ष्म अन्नद्रव्ये:
बोरॉन , कॅल्शियम, तांबे, लोहा, मॅगनीज, मोलिबडेनम,जस्त

ह्या खेरीज मातीची pH पातळी पण तपासली जाते त्यावरून मातीची आम्लता (अम्लीय किंवा अल्कधर्मी) कळून येते.
माती तपासणीचा उद्देश:

१. पोषक घटकांच्या पातळीनुसार मातीची विभागणी करणे

२. त्यानुसार खत शिफारस करणे. खत निवडीला अचूक मार्गदर्शन करणे.

माती परिक्षणाची जागा कशी निवडावी :

• मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी म्हणजे सेंद्रीय, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा.

• शेतातील वेगवेगळ्या ठिकाणाची माती गोळा करावी. नमुने घेण्याची जागा हि मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत किंवा जिरायत स्थिती ह्या वर ठरते. त्याचप्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत. फार लहान भाग पाडू नयेत.

• जुने बंधारे(पाटाखालील बांधा जवळची), दलदली ची जागा, नुकतेच खत दिलेले व खते आणि कचरा टाकण्याची जागा, गुरे बसण्याची व झाडाखालची माती असणारी जागा मातीचे नमुने घेण्यासाठी निवडु नये.

• सर्वात अगोदर वरील माहिती ध्यानात धरून नमुने घेण्याची जागा निश्चित कराव्यात.

• सदरच्या ठिकाणी इंग्रजीच्या व्ही अक्षराच्या आकृति प्रमाणे 30 सेंटीमीटर खोल खड्डा घ्यावा व त्या खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. माती नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या कडेची माती काढावी.

• अशा प्रकारे सर्व खड्डातून माती जमाकरून गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे 4 समान भाग करावे. समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी व उर्वरीत मातीचा पुन्हा ढीग करावा व त्याचे पुन्हा 4 समान भाग करून समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असेपर्यंत करावी.
सरासरी प्रत्येक एक एकर साठी एक नमुना तयार करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवा.

• वरील माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. ही अर्धा किलो माती प्लास्टिक पिशवीत भरावी आणि माती परीक्षण केंद्र मध्ये जमा करावी.

#Maharashtra #इंडिया #soiltesting #soilanalysis #soilsamples #soiltestinglab #soiltest #parikshan #lab #testing #माती #मातीपरीक्षण #माती_परीक्षण_प्रयोगशाळा
#निमाटोड #Nimatod #Niwyatod #सूक्ष्मअन्नद्रव्यतपासणी
#Farming
#Agriculture
#organic
#baliraja_special
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja

🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा

YouTube
http://youtube.com/@balirajaspecial

https://youtube.com/@technicalbaliraja

Facebook page
https://www.facebook.com/balirajaspecial/

Instagram
https://www.instagram.com/baliraja_special?r=nametag

Twitter
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Видео कमी खर्चात भरघोस उत्पादनासाठी माती परीक्षण , निमाटोड परीक्षण प्रगतशील शेतकरी का करतात. soil testing канала baliraja special
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 ноября 2023 г. 11:23:54
00:04:41
Другие видео канала
केमिकल विरहित गुळ निर्मिती प्रकल्प भाग 3 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #organic #shortsकेमिकल विरहित गुळ निर्मिती प्रकल्प भाग 3 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #organic #shortsइस्राईल तंत्रज्ञान काकडी लागवड | कमी जागेत भरघोस उत्पादन #shorts #balirajaspecial #बळीराजास्पेशलइस्राईल तंत्रज्ञान काकडी लागवड | कमी जागेत भरघोस उत्पादन #shorts #balirajaspecial #बळीराजास्पेशलचुहा कारले लागवड #कृषिक 2024 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #ENZA_ZADEN #shortsचुहा कारले लागवड #कृषिक 2024 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #ENZA_ZADEN #shortsआता किटकनाशके फवारणी खर्च १०० % टक्के वाचणार, ग्लोबल कृषी महोत्सव, #IPM_WORLD  #KVK_NARAYANGAWONआता किटकनाशके फवारणी खर्च १०० % टक्के वाचणार, ग्लोबल कृषी महोत्सव, #IPM_WORLD #KVK_NARAYANGAWONगांडूळ खत निर्मिती प्रकल्प #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #varmicompostगांडूळ खत निर्मिती प्रकल्प #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #varmicompostकसा होता ? राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव २०२३ . संशोधन प्रात्यक्षिके परिसंवाद तंत्रज्ञान यशोगाथाकसा होता ? राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव २०२३ . संशोधन प्रात्यक्षिके परिसंवाद तंत्रज्ञान यशोगाथाआता प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपये वाचणार आणि पिकाचे भरघोस उत्पादन मिळणार . कृषी हेच जीवन.आता प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपये वाचणार आणि पिकाचे भरघोस उत्पादन मिळणार . कृषी हेच जीवन.महेंद्रसिगं धोनी, माझी माती माझा विश्वास,#inera  #baliraja_special  #बळीराजा_स्पेशल  #shortsमहेंद्रसिगं धोनी, माझी माती माझा विश्वास,#inera #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #shorts✅उसापासून गूळ कसा तयार होतो | कशी असते प्रक्रिया एकदा पहाच ✅ organic jaggery plant✅उसापासून गूळ कसा तयार होतो | कशी असते प्रक्रिया एकदा पहाच ✅ organic jaggery plantकमी खर्चात उन्हाळी गावरान कांद्याचे विक्रमी उत्पादन,✅ #onion_farming #कांदा_लागवड  #ऑरगॅनिक_खतेकमी खर्चात उन्हाळी गावरान कांद्याचे विक्रमी उत्पादन,✅ #onion_farming #कांदा_लागवड #ऑरगॅनिक_खतेहमखास फायदा देशी विदेशी भाजीपाला लागवड 100% ओरिजनल रोपे | लागवड ते विक्री मार्गदर्शनहमखास फायदा देशी विदेशी भाजीपाला लागवड 100% ओरिजनल रोपे | लागवड ते विक्री मार्गदर्शनशेती करावी तर अशी दहावी नापास शेतकऱ्याची ऑरगॅनिक फार्मिंग | रासायनिक खते वापरामध्ये 70 टक्के बचतशेती करावी तर अशी दहावी नापास शेतकऱ्याची ऑरगॅनिक फार्मिंग | रासायनिक खते वापरामध्ये 70 टक्के बचतकारले लागवड आधुनिक तंत्रज्ञान | Bitter gourd farming #balirajaspecial #बळीराजास्पेशल  #shortsकारले लागवड आधुनिक तंत्रज्ञान | Bitter gourd farming #balirajaspecial #बळीराजास्पेशल #shortsपरदेशात विक्रमी मागणी, सेंद्रिय शेती शाश्वत विकासाचे भविष्य . organic farming in Indiaपरदेशात विक्रमी मागणी, सेंद्रिय शेती शाश्वत विकासाचे भविष्य . organic farming in Indiaमशरूम शेती, शेती पूरक व्यवसाय, कृषिभूषण पुरस्कार विजेते ! #shorts #balirajaspecial #बळीराजास्पेशलमशरूम शेती, शेती पूरक व्यवसाय, कृषिभूषण पुरस्कार विजेते ! #shorts #balirajaspecial #बळीराजास्पेशलभेंडी लागवड #राधिका #कृषिक 2024 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #shortsभेंडी लागवड #राधिका #कृषिक 2024 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #shortsअशी करा सोयाबीन लागवड, पेरणी,200 ते 250 शेंगा प्रत्येक झाडाला | आधुनिक तंत्रज्ञान | भरघोस उत्पादन |अशी करा सोयाबीन लागवड, पेरणी,200 ते 250 शेंगा प्रत्येक झाडाला | आधुनिक तंत्रज्ञान | भरघोस उत्पादन |पपई लागवड 15 नंबर #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #shorts #papayaपपई लागवड 15 नंबर #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #shorts #papaya√ कमी खर्चात नर्सरी बनवा. उत्पन्न वाढवा . Rainwater drip irrigation√ कमी खर्चात नर्सरी बनवा. उत्पन्न वाढवा . Rainwater drip irrigationपपई लागवड १५ नंबर,विक्रमी उत्पादन, लागवड ते विक्री व्यवस्थापन कसे करावे |Papaya farming in Marathiपपई लागवड १५ नंबर,विक्रमी उत्पादन, लागवड ते विक्री व्यवस्थापन कसे करावे |Papaya farming in Marathiकृषी आयडॉल, शेतकरी ते उद्योजक, शून्यातून सुरुवात 25 कोटींचा प्रवास पूर्ण. ध्येय 100 कोटी | यशोगाथाकृषी आयडॉल, शेतकरी ते उद्योजक, शून्यातून सुरुवात 25 कोटींचा प्रवास पूर्ण. ध्येय 100 कोटी | यशोगाथा
Яндекс.Метрика