Datta Bavani- सकाळी ज्या घरात दत्त बावनी ऐकली जाते तिथे सुख समृद्धी सह सर्व मनोकामना पूर्ण होतात
श्री दत्तबावनी
जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥
अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥
ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥
अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥
काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥
कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥
आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥
ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥
दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥
केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब । । १०॥
विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥
जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥
पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥
ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥
घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥
बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥
ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद ॥ १७॥
धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥
पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥
स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥
पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥
सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥
वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥ २३॥
वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥
निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥
दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥
घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥
ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥
पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥
अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥
तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥
एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥ ३२॥
तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥
हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥
राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥
शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥
अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥ ३७॥
आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥
मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥
डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥
पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥
करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥
साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥
राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥
नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥
यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥
अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥
सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥
वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥
थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥
अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥
तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥
👏🏻॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🙏🏻🙏🏻🙏🏻
सुपरहिट मराठी गाणी , धम्माल कोळीगीते आणि लोकगीतांचा नजराणा घेऊन येत आहे आपले चॅनेल "मराठी तडका"
त्याचबरोबर मराठी नाटके , विनोदी कलाकृती आणि अनेक मराठी कथांचा संग्रह आपल्या समोर सादर करत आहे ...
आमच्याशी जुळून राहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओस पाहण्यासाठी लाईक करा , शेअर करा आणि SUBSCRIBE करा मराठी तडकाला ...
Subscribe Now : - https://goo.gl/NFkwWg
Видео Datta Bavani- सकाळी ज्या घरात दत्त बावनी ऐकली जाते तिथे सुख समृद्धी सह सर्व मनोकामना पूर्ण होतात канала Marathi Music Tadka

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
सकाळी १५ मिनिटे करुणात्रिपदी ऐकल्याने सर्व अडथळे , संकट नष्ट होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतातNISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGSVishnu SahasranamamDatta Bavani | दत्त बावनी | Shri Datta Guru Bavani with Lyrics |सकाळी ज्या घरात श्री दत्तगुरूंचे हे महामंत्र ऐकले जाते गुरु कृपेने तिथे कशाचीही कमी पडत नाहीश्री #गुरुचरित्र आध्याय १४ #Shri #Gurucharitra #Chapter 14 अपार संकट हरण करणारा परम पवित्र आध्यायदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा - Digambara Digambara Shripad Vallabh Digambara- Sumeet Musicहनुमान चालीसा Hanuman Chalisa I GULSHAN KUMAR I HARIHARAN, Full HD Video I Shree Hanuman ChalisaRam Raksha Stotra (श्री राम रक्षा स्तोत्र) with lyrics by Rajendra Vaishampayan | Ram Raksha FullGujarati Dutt Bavani52 Shloki Gurucharitra | बावन्न श्लोकी गुरुचरित्र | Guru Dattatreya GurucharitraDattatreya Karunatripadi | श्री दत्त करुणा त्रिपदी | Shanta Ho Shree Gurudatta | Dattaguruनिघालो घेऊन दत्ताची पालखी || NIGHALO GHEOON DATTACHI PALAKHI || Marathi Devotional Songगजानन महाराज प्रकटदिन विशेष - Gajanan Maharaj Bavani | श्री गजानन महाराज बावन्नीDutt Bavani | Popular Dutt Bavani | santramduttbavaniनादातून या नाद निर्मितो .... श्रीराम जय राम जय जय रामजगातील सर्वात शक्तिशाली दत्त मंत्र - DATTA MOST POWERFUL MANTRA FOR POSITIVE ENERGYसकाळी दत्ताचे हे नामस्मरण ऐकल्याने मानसिक शांती व असाध्य रोगांपासून मुक्तता मिळते | दिगंबरा दिगंबराShri Dattatreya Stotram | श्री दत्तात्रेय स्तोत्रम | Dattatreya Namostute