Загрузка...

The Spirit of DMH | ...तू एकटी नाहीस!

“... तू एकटी नाहीस!”

रिसेप्शनच्या कोपऱ्यात ‘ती’ मुलगी उभी होती.
हॉस्पिटलचे हिरवे जॅकेट अंगावर, डोळ्यांत अश्रूंचा पूर आणि मन पूर्णपणे सुन्न. कोविडच्या दुसऱ्या लाटेत अवघ्या सात दिवसांत तिच्या आई-वडिलांचे आणि सख्या भावाचे निधन झाले होते. त्या क्षणापर्यंत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तिच्यासाठी केवळ कामाची जागा होती; पण या आघातानंतर तेच तिचं एकमेव आश्रयस्थान होतं.

फ्रंट डेस्ककडून एक आवाज तिच्यापर्यंत पोहोचला.
“इथे बस… तू एकटी नाहीस.”

तो आवाज होता — केतकी कुलकर्णी यांचा.

केतकी तिच्या जवळ गेल्या. शेजारी बसल्या. त्या क्षणी केतकी ‘त्या’ मुलीसाठी ‘फ्रंट डेस्क को-ऑर्डिनेटर’ नव्हत्या. त्या तिच्या आयुष्यातील पहिला आधार होत्या. त्याच्या जोरावर ‘ती’ पुन्हा उभी राहू शकली.

जिथे प्रत्येक चेहरा वेगळा असतो…

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा फ्रंट डेस्क म्हणजे केवळ माहिती देण्याचे ठिकाण नाही.
तो रुग्णालयाचा पहिला टप्पा आहे, जिथून प्रत्येक रुग्ण आणि नातेवाईकाचा प्रवास सुरू होतो.

दररोज तीन ते चार हजार लोक येथे येतात...
कुणी घाबरलेले,
कुणी गोंधळलेले,
कुणी आशेने आलेले,
या सगळ्यांचा पहिला संवाद केतकी आणि त्यांच्या टीमशी होतो.

रजिस्ट्रेशन, पास काउंटर आणि रिसेप्शन —
या तीन आघाड्यांवर २७ जणांचा स्टाफ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो.

प्रत्येक दिवस म्हणजे नवा असतो.
प्रत्येक चेहरा म्हणजे एक नवी कथा.

“पास का हवाय?,” या एका प्रश्नामागे अनेक भावना असतात.

हा प्रश्न रागात, भीतीत आणि असहायतेतून विचारला जातो.

केतकी मात्र शांतपणे उत्तर देतात —

“तुमच्या पेशंटच्या सुरक्षिततेसाठीच हा पास आहे.
खूप लोकांची गर्दी झाली, तर पेशंटला त्रास होतो.
वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले लोक नकळत जंतूसंसर्ग घेऊन येतात.
म्हणून पेशंटभोवती कमीत कमी गर्दी असणं गरजेचं आहे.”

२०१३ पासून आजपर्यंत…

केतकी कुलकर्णी यांनी २०१३ मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून ‘दीनानाथ’मध्ये पाऊल ठेवले.

काम करत असतानाच त्यांनी
Hospital Administration चा अभ्यासक्रम पूर्ण केला.

त्यातून त्यांना समजलं,
फ्रंट डेस्क म्हणजे केवळ माहिती देणं नाही,
तो रुग्ण व्यवस्थापनातील महत्त्वाचा भाग आहे.

आज त्या Front Desk Co-ordinator आहेत —
पण त्या पदामागे उभी आहे
एक शिस्तबद्ध, संवेदनशील आणि प्रशिक्षित नेतृत्वशैली.

The Spirit of DMH म्हणजे —
ड्युटीपेक्षा माणुसकी मोठी असणं.
रजिस्टरपेक्षा भावनांचं महत्त्व आणणं.
केतकी कुलकर्णी या त्याच Spirit चे जिवंत उदाहरण आहेत.

Видео The Spirit of DMH | ...तू एकटी नाहीस! канала Deenanath Mangeshkar Hospital And Research Center
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять