Загрузка страницы

Dnyaniyancha Raja by Pt. Upendra Bhat (Please check description for lyrics & meaning)

गीत प्रकार-संतवाणी
रचना-संत तुकाराम

ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ।
ह्मणती ज्ञानदेव तुह्मां ऐसें ॥१॥

मज पामरासीं काय थोरपण ।
पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥

ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे ।
इतर तुळणें काय पुढे ॥३॥

तुका ह्मणे नेणे युक्तीचिया खोलीं ।
ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥

भावार्थ :
तुम्ही ज्ञानी माणासांचे गुरू महाराज आहात म्हणून तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात.

मला गरिबाला मोठेपण कशास देता? पायांतली वहाण पायांतच बरी.

ब्रह्मादिक देव जेथे तुमच्या ज्ञानापुढे शरण जातात, कौतुक करतात, तेथे इतरांच्या तुलना काय पुर्‍या पडणार!

तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानाची किंवा वागणुकीची तशी खोली मला माहिती नाही आणि म्हणूनच मी तुमच्या पायावर डोके ठेवले आहे.

Видео Dnyaniyancha Raja by Pt. Upendra Bhat (Please check description for lyrics & meaning) канала _travelling_life__
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
9 июня 2017 г. 11:33:19
00:06:17
Яндекс.Метрика