Загрузка...

Stuffed Pomfret- भरलेलं पापलेट

भरलेलं पापलेट - stuffed pomfret
साहित्य
४ पापलेट
भरायचा हिरवा मसाला साहित्य
ओल्या नारळाचा कीस १ ते दीड वाटी
कोथिंबीर १ वाटी
आलं
लसूण ८ ते १० पाकळ्या
पुदीन्याची पाने ४ ते ५
हिरव्या मिरच्या ५(चवीनुसार कमी जास्त घ्याव्यात)

पापलेट मॅरीनेशनच् साहित्य
आलं लसूण मिरची पेस्ट ३ ते ४ टेबलस्पून
हळद १ टीस्पून
लाल तिखट १ टेबलस्पून
मालवणी मसाला १ टेबलस्पून

पापलेट तळण्यासाठीचे साहित्य
तेल
रवा ५ ते ६ टेबलस्पून
तांदळाचे पीठ ४ ते ५ टेबलस्पून
मीठ
हळद , लाल तिखट, मालवणी मसाला प्रत्येकी १ टीस्पून

कृती
प्रथम हिरव्या मसाल्याचे साहित्य वाटून घ्यावे व ते वाटण ३ ते ४ मिनिटे शिजवुन घ्यावे.
वरील वाटण थंडहोईपर्यंत पापलेट मॅरनेट करून घ्यावे. त्यासाठी प्रथम पापलेटवर लिंबू पिळून घ्यावे नंतर त्यावर आलं लसूण मिरचीची पेस्ट लावून घ्यावी व हळद, लाल तिखट आणि मालवणी मसाला असे सुके मसाले टाकून छान सर्व बाजूने चोळून घ्यावे. आता हिरवा मसाला पापलेट मध्ये भरून घ्यावा.
पापलेट तळण्यसाठी रवा, तांदळाच पीठ मीठ ,हळद, लाल तिखट, मसाला घालून मिक्स करून घ्यावे. पापलेट यात घोळवून तव्यावर गरम तेलात ठेवावे. दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यावे. भरलेलं पापलेट तयार आहे.

Видео Stuffed Pomfret- भरलेलं पापलेट канала Gauri’s kitchen
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки