Загрузка...

कुंभमेळ्याचा हा इतिहास तुम्हाला माहीत आहे का ? #महाकुंभ2025 #prayagrajkumbh #अखंडभारत

#prayagraj #mahakumbh2025 #महाकुंभ

कुंभमेळ्याचा हा इतिहास तुम्हाला माहीत आहे का ? #महाकुंभ2025 #prayagrajkumbh #अखंडभारत

त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सध्या प्रचंड थंडीच्या लाटेतही भक्तांचा अलोट जनसागर उसळला आहे. सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. दूरच दूर मुंग्यांसारखी माणसं दिसत आहे. तरीसुद्धा मैलोमैल चालून गंगा तट गाठण्यासाठीची धडपड आणि त्यानंतर गंगा स्नानाच्या पावित्र्यातून त्यांच्या चेहऱ्यावर उसळलेलं ते तेज सगळ्या श्रमाचा परिहार ठरतं. हे सगळं विलोभनीय दृश्य सध्या प्रयागराजमध्ये अनुभवण्यास मिळत आहे. याचं कारण म्हणजे प्रयागराज त्रिवेणी संगम पर्वावर भरलेला महाकूंभमेळा. आपल्या भारतीय परंपरेत कुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. कुंभमेळ्याला ज्या प्रचंड संख्येनं भाविक गोळा होतात, तितक्या संख्येनं पृथ्वीवर क्वचितच दुसऱ्या कोणत्या धार्मिक बाबीसाठी माणसं गोळा होत असावीत, असं म्हटलं जातं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, असं आपल्या संस्कृतीत म्हंटलं जातं. हा कुंभमेळा म्हणजेच साधू संतांचा निवास. साधू संत कधीच एका जागी थांबत नाही ते सतत भ्रमण करत असतात. फक्त कुंभपर्वातच ते एका ठिकाणी वास्तव्यास असतात आणि हाच तो भाग्याचा क्षण यंदा उत्तरप्रदेशच्या पदरी पडला आहे. देशभरातून, जगभरातून नागरीक महाकुंभ पर्व अनुभवण्यास प्रयागराजच्या दिशेनं जात आहेत. त्यात 144 वर्षानंतर हा कुंभमेळा होत असल्याचं सांगितलं जातं. म्हणूनच या पावन पर्वावर कुंभमेळा म्हणजे नेमकं काय? कुंभमेळयाचा इतिहास काय? कुंभमेळा कधी सुरू झाला. हे सगळं आपण जाणून आणि समजून घेऊयात. कारण आपण जर गंगेचं स्नान करायला जात असू तर आपल्याला त्यामागं दडलेला अर्थ माहिती असावा. तेव्हाच कुंभमेळयात सामील होण्याचा आपला हेतु साध्य होईल, असं मला वाटतं. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पहात आहात त्याचं काय महाराष्ट्र! तर मंडळी, या वेळेस प्रयागराज महाकुंभ किंवा १२ वर्षांनी येणारं पूर्णकुंभाचे पर्व आहे. कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी होतो. याआधीचा कुंभमेळा 2013 मध्ये झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये अर्ध कुंभमेळा झाला होता. अर्ध कुंभमेळा दर सहा वर्षांनी होतो. यावेळेस कुंभमेळ्याची सुरुवात 13 जानेवारीपासून झाली आहे. कुंभमेळा एकूण 45 दिवस चालणार असून 26 फेब्रुवारी रोजी कुंभमेळयाची सांगता होणार आहे. आता येऊयात कुंभमेळयाच्या इतिहासाकडे. तर कुंभमेळ्याभोवती अनेक पुराणकथा व मिथकं प्रचलित आहेत. तसंच, त्याच्या नेमक्या उगमाबद्दल अनेक मतंमतांतरं आहेत. काहीजण मानतात की, या उत्सवाचा उल्लेख वेद आणि पुराणांमध्ये सापडतो. तर काहींच्या मते, हा सण केवळ दोन शतकांपूर्वीचा आहे. काहीही असलं तरी हा उत्सव पृथ्वीवरील भक्तांचा सर्वात मोठा मेळावा आहे, यात शंका नाही. किंबहुना हिंदू धर्मातील अनेक प्रश्नांप्रमाणं या प्रश्नांची उत्तरं पुराणकथा, इतिहास आणि प्राचीन लोकांच्या अविरत श्रद्धेच्या मिश्रणात सापडतात. पहिला प्रश्न येतो तो कुंभमेळयाची सुरुवात कधी झाली. तर हिंदू पौराणिक कथेनुसार, देवता आणि राक्षसांनी अमृत मिळविण्यासाठी दुधाच्या आदिम समुद्राचे, क्षीरसागराचे मंथन करण्यासाठी एकत्र काम करण्याचं ठरवलं. समुद्र मंथन म्हणून ओळखलं जाणारं हे मंथन एक गुंतागुंतीचं आणि ताकदीचं काम होतं. ज्यासाठी देवता आणि राक्षस दोघांचेही एकत्रित प्रयत्न आवश्यक होते. सर्व सहभागींमध्ये अमृत समान प्रमाणात वाटलं जाईल असं ठरलं. तथापि, अमृतानं भरलेला कुंभ दिसू लागताच, त्यांच्या अतृप्त लोभामुळे प्रेरित झालेल्या राक्षसांनी ते ताब्यात घेतले आणि पळून गेले. स्वतःसाठी आणि मानवतेसाठी अमरत्व मिळवण्याचा दृढनिश्चय करून, देवतांनी राक्षसांचा पाठलाग केला, ज्यामुळे आकाशात एक भयंकर युद्ध झाले. देव आणि दानवांमधील हे स्वर्गीय युद्ध सलग बारा दिवस आणि रात्री चाललं, जे मानवी दृष्टीनं बारा वर्षांच्या बरोबरीचं होतं. या महाकाव्यात्मक संघर्षादरम्यान, मौल्यवान अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले, ज्यामुळे चार विशिष्ट ठिकाणी आशीर्वाद मिळाला. त्यात प्रयाग म्हणजेच अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या तीन ठिकाणांचा सामावेश होता. तेव्हापासून ही स्थळं दर बारा वर्षांनी एकदा कुंभमेळा भरवण्याचे पूजनीय स्थान बनले आहेत. या तिन्ही स्थानांचे महत्व म्हणजे, गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर वसलेले प्रयाग हे कुंभमेळ्यातील सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. येथेच संगम किंवा या तीन नद्यांचे मिलन होते. उत्तराखंडमधील हरिद्वार हे शहर हिमालयातून गंगा जिथे उतरते ते ठिकाण दर्शवते. हरिद्वार कुंभमेळा विशेषतः महत्वाचा आहे. कारण येथे हर की पौडी आहे, जो भगवान विष्णूचा आशीर्वाद असलेला पवित्र घाट आहे. त्यानंतर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं नाशिक हे कुंभमेळ्याचं आणखी एक महत्त्वाचं ठिकाण आहे. असं मानलं जातं की येथे अमृताचे काही थेंब पडले, ज्यामुळे ते भाविकांसाठी एक पवित्र स्थळ बनले. तर क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेलं उज्जैन हे त्याच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे

COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that

Видео कुंभमेळ्याचा हा इतिहास तुम्हाला माहीत आहे का ? #महाकुंभ2025 #prayagrajkumbh #अखंडभारत канала Linelight Creative Studio
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять