Загрузка страницы

काळू-बाळू लोकनाट्य तमाशा कवलापूर : 'जहरी प्याला' (वगनाट्य) { भाग २ } - खळखळून हसा

सांगली जवळच्या कवलापूरकरांची १६१ वर्षाची तमाशा परंपरा
आणि
'जहरी प्याला' वगनाट्याचे वास्तव..
सांगली जिल्ह्यात सन १८५० च्या दरम्यान सावळज - पेडच्या उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे यांच्या रूपाने 'लोकनाट्य तमाशा' ची सुरुवात झाली त्या परिसरातच सन १८६० च्या दरम्यान सातू-हिरू कवलापूरकर हे तमाशा कलावंत अल्पावधीतच मान्यता पावलेले होते.
सांगली-मिरज संस्थानात कवलापूरला सिध्देश्वर मंदिराच्या ग्रामदैवताची प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. या निमित्ताने परिसरातील लोकांच्या मनोरंजनासाठी ग्रामस्थांचा आग्रह म्हणून सातू- हिरू यांनी तमाशा फडाची निर्मिती केली. हे सातू देवजी खाडे आणि हिरू आवजी कांबळे हे एकाच गावातील नातेवाईक असल्याने हा तमाशा फड लगेच उभा राहिला. सातू हलगीवाला तर हिरू ढोलकीवाला म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या तमाशा फडात स्त्री पात्र करणारा नाच्या, विनोदी सोंगाड्या, तुणतणे व झांज वाजवणारे सुरते आणि एक अडसोड्या असे सात कलावंत होते. तुरेवाले शाहीर म्हणून तेव्हा ते प्रसिद्ध होते. लावणी, छक्कड, झगडा या कवितांच्या रचना करून भेदीक परंपरेपासून अलिप्त होऊन त्यांनी रंगीत तमाशा केला होता.
सातू खाडे यांच्या शिवा - संभा या दोन मुलांनी २० व्या शतकाच्या अगदी सुरूवातीला सन १९०२ च्या
दरम्यान तमाशा फडाची जबाबदारी घेऊन तो १९३७ सालापर्यंत चालविला. त्यावेळी भाऊ फक्कड हा काव्यरचना करणारा शाहीर कलावंत त्यांच्या बरोबर होता. शिवा-संभा यांचा हा तमाशा पठ्ठे बापूराव समकालीन होता. त्यामुळे दोघांच्यात सवाल-जबाबाचे सामने वारंवार होत. पश्चिम महाराष्ट्रातला ढोलकी फडाचा तमाशा म्हणून शिवा- संभा यांच्या तमाशाचा नावलौकिक होता.
शिवा- संभा यांच्या तमाशा कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे १९२० च्या दरम्यान राजर्षि शाहू महाराज यांनी शिवा-संभा यांना दरबारात बोलावून त्यांचा तमाशा स्वतः पाहिला आणि त्यांच्या वग सादरीकरणावर खुश होऊन त्यांना जरीचा फेटा आणि सोन्याचे चार तोळ्याचे मेडल देऊन त्यांचा गौरव केला होता. हे मेडल बरीच वर्षे शिवा- संभा आपल्या कोटावर लावून तमाशात वावरत असत. त्याची छायाचित्रे आजही उपलब्ध आहे. सन १९३७ साली संभाजी खाडे यांचे निधन झाल्यानंतर हा तमाशा बंद पडला. नंतर शिवा यांनी गावाच्या अग्रहास्तव संभाचा मुलगा रामचंद्र व स्वतःचा मुलगा भीमराव यांच्या पाठिशी उभा राहून दोनच वर्षात पुन्हा तमाशा फड उभा केला. त्यावेळी रामचंद्र याला सरदार आणि भीमराव ढोलकीवादक बनवून तमाशाची नवी नांदी सुरू झाली. काही दिवसात संभाचा दुसरा मुलगा शामराव तमाशात सहभागी झाला. त्यावेळी 'रामू-शामू- भिमू यांचा तमाशा' १९३९ साली सुरू झाला.
'जहरी प्याला' चे वास्तव :-- सन १९६४ साली या कवलापूरकरांच्या लोकनाट्य तमाशाचे 'काळू- बाळू कवलापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ' असे नामकरण झाले, त्याचे कारणही तसेच होते. बाबुराव पुणेकर या तमाशा फड मालकाने आपला 'जहरी नागिण' हा वग एक दिवस कवलापूरकर यांना करावयास दिला. त्यावेळी रामचंद्र खाडे यांनी आपल्या लव-अंकुश या तरूण जुळ्या भावांना त्यात सोंगाड्यांच्या भूमिका देऊन त्यांच्या जन्माची कथा त्यात घातली आणि त्याचे 'जहरी प्याला' अर्थात 'जुळ्या भावांची सत्यकथा' असे वगाचे नाव जाहीर केले. त्या दिवशी पुण्याच्या आर्यभूषण थिएटरला हा वग रसिकांनी डोक्यावर घेतला. तेंव्हा बाबुराव पुणेकर म्हणाले," कवलापूरकर तुम्ही आमच्यावर कडी केली, पण काही हरकत नाही इथून पुढे हा वग तुम्हीच करा." पुढे या वगामुळे कवलापूरकरांच्या तमाशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. लव-अंकुश यांच्या काळू-बाळू या सोंगाड्यांच्या भूमिकेने उच्यांक मोडला. तर चुलत बंधू भीमराव खाडे यांची करड्या आवाजातील सेनापतीची भूमिका खूप गाजली. या वगामुळे कवलापूरकरांच्या तमाशाला काळू- बाळू लोकनाट्य तमाशा म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
कवलापूरकरांच्या चौथ्या पिढीत १९६५ नंतर रामचंद्र यांचे चिरंजीव घनश्याम व गौतम. १९८० नंतर लहू खाडे यांचे चिरंजीव अरूण, अनिल आणि सुनिल. अंकुश खाडे यांचे चिरंजीव कुंदन व शैलेश. शामराव यांचे चिरंजीव संपत आणि संभाजी. भिमराव यांचे चिरंजीव विजय आणि जयकुमार हे तमाशात सक्रिय राहिले.
आता पाचव्या पिढीत लहू (काळू) यांचे चिरंजीव अरूण यांचा मुलगा सुरज आणि शामराव खाडे यांचे चिरंजीव संभाजी यांचा मुलगा निलेश हे तमाशात कलाकार म्हणून आपले भविष्य अजमावत असलेले दिसतात.
तमाशापासून स्वतः फारकत घेतल्यानंतर आपला तमाशा आणि ' जहरी प्याला' वगनाट्याचे वास्तव सन २००७ साली सांगताना अंकुश खाडे (बाळू) म्हणतात की, " या वर्गाचे आतापर्यंत पंचवीस हजाराहून अधिक प्रयोग झाले आहेत, पण त्याची रीतसर नोंद ठेवली असती तर गिनीज बुकमध्ये ही नोंद झाली असती इतके या वगाचे यश मोठे आहे. प्रयोग म्हणून पुढे १९९० नंतर या वगाला आणखी प्रचंड गर्दी खेचण्यासाठी आणि पांढरपेशा लोकांना या वगाचे महत्त्व पटावे म्हणून 'राम नाही राज्यात' असे या वर्गाचे नामकरण करण्यात आले.
[ कवलापूरकरांच्या 'जहरी प्याला' या वगाचे १९९५ साली चित्रिकरण केलेली सी.डी.कवलापूरच्या वसंत पाटील व सुरेश पाटील यांच्याकडून आता उपलब्ध झाली असून हा वग 'लोकरंजन' या यूट्यूब चँनेलवर पहावयास मिळेल. तेंव्हा हा वग डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये. तसे केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व हक्क 'लोकरंजन' चँनेलशी अबाधित आहेत. तमाशा कलावंतांचा अवमान होणार नाही याची जाणीव ठेवून फक्त रसिकतेने आनंद घ्यावा. ]
प्रा.डॉ. संपतराव रा.पार्लेकर/ पलूस (सांगली)
भ्रमणध्वनी : ९६२३२४१९२३

Видео काळू-बाळू लोकनाट्य तमाशा कवलापूर : 'जहरी प्याला' (वगनाट्य) { भाग २ } - खळखळून हसा канала लोकरंजन / Lokranjan
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
2 июля 2021 г. 17:39:13
00:23:18
Другие видео канала
गावाकडची माणसं : ज्ञानेश्वर मंदिरात ज्येष्ठांशी संवादगावाकडची माणसं : ज्ञानेश्वर मंदिरात ज्येष्ठांशी संवादगावशिवारातील आठवणी : गुऱ्हाळावरील आनंद  - सुधाकर कुलकर्णी तथा कवी स्नेहसुधा, पलूसगावशिवारातील आठवणी : गुऱ्हाळावरील आनंद - सुधाकर कुलकर्णी तथा कवी स्नेहसुधा, पलूससाध्या सोप्या भाषेतील कीर्तन : ह.भ.प. लहू इंदलकरसाध्या सोप्या भाषेतील कीर्तन : ह.भ.प. लहू इंदलकरहरिभक्तिपरायण लहू महाराज इंदलकर यांचे कीर्तन...हरिभक्तिपरायण लहू महाराज इंदलकर यांचे कीर्तन...गावातील माणसांचा सहवास..गावातील माणसांचा सहवास..भेदिक शाहीर जयवंत रणदिवे, दिघंचीभेदिक शाहीर जयवंत रणदिवे, दिघंचीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील व्यसनमुक्ती : खूप चांगला उपक्रम (भाग ३)संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील व्यसनमुक्ती : खूप चांगला उपक्रम (भाग ३)ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२३ - माळशिरस (भाग २)ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२३ - माळशिरस (भाग २)ज्ञानेश्वर माऊली पाखली सोहळा - दि. २३ जून २०१३ ( नातेपुते, ता माळसिरस ) भाग १ज्ञानेश्वर माऊली पाखली सोहळा - दि. २३ जून २०१३ ( नातेपुते, ता माळसिरस ) भाग १उपेक्षित तमाशा कलावंत चंद्राबाई शिरवळकर : खडतर जीवन (भाग ३)उपेक्षित तमाशा कलावंत चंद्राबाई शिरवळकर : खडतर जीवन (भाग ३)भेदिक शाहीर हिंदूराव पाटील ( भेदिक गायन )भेदिक शाहीर हिंदूराव पाटील ( भेदिक गायन )भेदिक शाहीर बाळासो चौगुले यांनी गायलेल्या रचना : संभूराजू भिलवडीकर पुण्यतिथी, भिलवडीभेदिक शाहीर बाळासो चौगुले यांनी गायलेल्या रचना : संभूराजू भिलवडीकर पुण्यतिथी, भिलवडीतुरा पक्षाचे गाणे - विविध रचना (भेदिक शाहीर संभूराजू भिलवडीकर पुण्यतिथी ) दि.२९ एप्रिल २०२३तुरा पक्षाचे गाणे - विविध रचना (भेदिक शाहीर संभूराजू भिलवडीकर पुण्यतिथी ) दि.२९ एप्रिल २०२३'रनिंग' : एक आगळावेगळा छंद जपला वयाच्या ७५ व्या वर्षी : तुकाराम अनुगडे, रामानंदनगर (भाग ४)'रनिंग' : एक आगळावेगळा छंद जपला वयाच्या ७५ व्या वर्षी : तुकाराम अनुगडे, रामानंदनगर (भाग ४)'रनिंग'च्या स्पर्धेत भाग घेतल्याने जीवन सार्थकी लागले : तुकाराम अनुगडे सर/ रामानंदनगर {भाग ३}'रनिंग'च्या स्पर्धेत भाग घेतल्याने जीवन सार्थकी लागले : तुकाराम अनुगडे सर/ रामानंदनगर {भाग ३}सत्तर धावण्याच्या शर्यतीत सहभागी  : तुकाराम अनुगडे सर (रामानंदनगर- किर्लोस्करवाडी) भाग २सत्तर धावण्याच्या शर्यतीत सहभागी : तुकाराम अनुगडे सर (रामानंदनगर- किर्लोस्करवाडी) भाग २'रनिंग'च्या सत्तर मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग: तुकाराम अनुगडे सर, किर्लोस्करवाडी (भाग १)'रनिंग'च्या सत्तर मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग: तुकाराम अनुगडे सर, किर्लोस्करवाडी (भाग १)शिवजयंतीच्या चित्ररथावर तुकोबांच्या वेशात लोकशाहीर राजा पाटील : प्रा.बाबासाहेब बेंडे पाटील ( भाग ८ )शिवजयंतीच्या चित्ररथावर तुकोबांच्या वेशात लोकशाहीर राजा पाटील : प्रा.बाबासाहेब बेंडे पाटील ( भाग ८ )शाहीर राजा पाटील कवठेमहांकाळकर यांचे संघर्षमय जीवन :- प्रा.बाबासाहेब बेंडे पाटील (भाग ७)शाहीर राजा पाटील कवठेमहांकाळकर यांचे संघर्षमय जीवन :- प्रा.बाबासाहेब बेंडे पाटील (भाग ७)शाहीर राजा पाटील (बापू ) मोठेपण : प्रा. बाबासाहेब बेंडे पाटील यांची मुलाखत (भाग ६)शाहीर राजा पाटील (बापू ) मोठेपण : प्रा. बाबासाहेब बेंडे पाटील यांची मुलाखत (भाग ६)बंधू शाहीर राजा पाटील यांनी माणसे मिळविली : नंदकुमार पाटील म्हणतात.  (भाग ५)बंधू शाहीर राजा पाटील यांनी माणसे मिळविली : नंदकुमार पाटील म्हणतात. (भाग ५)
Яндекс.Метрика