Загрузка страницы

Talathi office Agriculture land record I तलाठ्याकडील शेतजमिनीचे रेकॉर्ड त्याविषयी माहिती

#AgricultureLandRecord #Talathioffice #TehsilOffice

१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!

*ग्रामपंचायत*
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
* *गाव नमुना नंबर - 1* - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
* *गाव नमुना नंबर - 1अ* - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
* *गाव नमुना नंबर - 1ब* - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 1क* - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
* *गाव नमुना नंबर - 1ड* - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 1इ* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 2* - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 3* - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
* *गाव नमुना नंबर - 4* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 5* - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 6* - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 6अ* - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 6क* - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 6ड* - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 7* - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 7अ* - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 8अ* - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 8ब, क व ड* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 9अ* - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 10* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 11* - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 12 व 15* - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 13* - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 14* - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 16* - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 17* - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 18* - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
* *गाव नमुना नंबर - 19* - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 20* - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 21* - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.
#Agriculture #Land #talathi #village #गाव #gram_sevak #gav_kamgar_talathi #tehsildar #circle_+officer #Land_Record #jilha_parishad #government

Видео Talathi office Agriculture land record I तलाठ्याकडील शेतजमिनीचे रेकॉर्ड त्याविषयी माहिती канала Umesh Mahadik
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 марта 2018 г. 21:26:55
00:07:35
Другие видео канала
OPPO F7 Unboxing & ReviewOPPO F7 Unboxing & ReviewMy youtube channel journey | माझा आत्तापर्यंतचा युट्यूबचा प्रवासMy youtube channel journey | माझा आत्तापर्यंतचा युट्यूबचा प्रवासमल्हारगड | Malhargad l मराठा साम्राज्यातील शेवटचा किल्ला 🚩 | व्हिलॉग भाग २मल्हारगड | Malhargad l मराठा साम्राज्यातील शेवटचा किल्ला 🚩 | व्हिलॉग भाग २Get together of Mahadik families @Lonavla | vlogGet together of Mahadik families @Lonavla | vlogक्रिशा सोबत केला भरपूर व्यायाम 💪 | Weekend vlog Part 1 | वीकएंड व्हिलॉग भाग - १क्रिशा सोबत केला भरपूर व्यायाम 💪 | Weekend vlog Part 1 | वीकएंड व्हिलॉग भाग - १27 January 202327 January 2023Vrundavan farms panshet trip 2021 🚣Vrundavan farms panshet trip 2021 🚣Mangueshi Temple Goa | श्री मंगुएश मंदिर गोवा | Vlog 7Mangueshi Temple Goa | श्री मंगुएश मंदिर गोवा | Vlog 7Maruti suzuki wagon r I लॉंचिंगनंतर २० लाख लोकांनी घेतली ही कारMaruti suzuki wagon r I लॉंचिंगनंतर २० लाख लोकांनी घेतली ही कारThanks for 1K Subscribers & youtube's first paymentThanks for 1K Subscribers & youtube's first paymentFYA Cordless Vacuum Cleaner for Home | Pet / Hair / Car Cleaning 🚗🧹FYA Cordless Vacuum Cleaner for Home | Pet / Hair / Car Cleaning 🚗🧹Jimmy JV35 Mattress Vacuum CleanerJimmy JV35 Mattress Vacuum Cleanerमुलांनी मस्त बोटिंगचा आनंद लुटला | Kasarsai Dam | Weekend farmhouse Vlogमुलांनी मस्त बोटिंगचा आनंद लुटला | Kasarsai Dam | Weekend farmhouse Vlogकायुच्या लहानपणाच्या आठवणीकायुच्या लहानपणाच्या आठवणीदापोली ट्रिपमधली मजा मस्ती  | Dapoli murud beach vlog 2 🏖️दापोली ट्रिपमधली मजा मस्ती | Dapoli murud beach vlog 2 🏖️फार्म हाऊस पार्टी  | फुल टू धमाल | चुलीवरचं मस्त जेवण | एकदम ओकेफार्म हाऊस पार्टी | फुल टू धमाल | चुलीवरचं मस्त जेवण | एकदम ओकेAll time favorite breakfast | Anna idli restaurant pune 🍽️All time favorite breakfast | Anna idli restaurant pune 🍽️कायराला पहिल्यांदाच फॅमिली फंगशनला घेऊन गेलो 👨‍👨‍👧‍👧कायराला पहिल्यांदाच फॅमिली फंगशनला घेऊन गेलो 👨‍👨‍👧‍👧Krisha Mahadik Vlogs | light camera actionKrisha Mahadik Vlogs | light camera actionक्रिशाने बनवला वडापाव | Krisha Mahadik Vlogsक्रिशाने बनवला वडापाव | Krisha Mahadik Vlogsरिसॉर्ट जवळील बीच । इथे सुद्धा मुलांनी मस्त मजा केली | Kashid beach Vlogरिसॉर्ट जवळील बीच । इथे सुद्धा मुलांनी मस्त मजा केली | Kashid beach Vlog
Яндекс.Метрика