Загрузка...

भव्य क्रीडा संकुल.......

जुन्नर तालुक्यात विविध क्रिडा प्रकारात खेळाडू तयार होत आहे. मी अनेक गावांमध्ये जाताना त्यांची भेट होते. स्पर्धांच्या निमित्ताने त्यांना प्रोत्साहन म्हणून मी नेहमी मदतीचा हात देतो. तालुक्यात सद्यस्थितीत अद्याप ही सोई सुविधा युक्त क्रिडा संकुल उपलब्ध नसल्याने गैरसोय होत असून सुविधा मिळत नाहीत. त्या दृष्टीने माझा प्रयत्न असून ओतूर येथे क्रिडा संकुल आम्ही उभे केले आहे. येडगाव येथे देखील परिपूर्ण क्रिडा संकुल करण्याचा माझा मानस आहे. त्या दृष्टीने आम्ही काम सुरू केले असून शासनाच्या माध्यमातून ५ कोटी रु.उपलब्ध केले आहेत. १५ कोटींच्या प्रस्तावित आराखड्यात अनेक मैदाने आतील व बाहेरील खेळांसाठी सोई सुविधायुक्त गोष्टींचा त्यात समावेश आहे. सुसज्ज गार्डन,हॉटेल्स सहित चांगले मार्गदर्शक व जलतरण तलाव त्यात समाविष्ट असून त्याचा नक्कीच युवक युवतींना फायदा होईल. भविष्यात त्या ठिकाणी तालुकास्तरीय स्पर्धा होतील अशा दृष्टीने ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन मी देतो.

#shivjanmbhumi #junnarkar #atulbenke #vallabhbenke #MLA #AjitPawar #NCP #vision #development

Видео भव्य क्रीडा संकुल....... канала MLA Atul Benke
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки