Загрузка...

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण:सासरा राजेंद्र आणि दीर सुशीलला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी

mymarathi.net
पुणे-वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे सात दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी आज सकाळी दोघांना स्वारगेट येथून ताब्यात घेतले. दुपारी त्यांना शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांनाही 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी पिता-पुत्राला न्यायालयात नेत असताना भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोपींच्या गाडीवर टोमॅटो फेकून संताप व्यक्त करण्यात आला.

वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यासाठी सासरच्यांकडून छळ होत होता. हा जाच असह्य झाल्याने वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वैष्णवीचा पती, नणंद आणि सासू यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 21 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार झाले होते. पोलिसांनी आज सकाळी सासरा आणि दीर यांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यातच आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. आरोपी पिता-पुत्राला न्यायालयात नेत असताना भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर टोमॅटो फेकले.तसेच आरोपींना भाषी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली होती.

दरम्यान, बावधन पोलिसांनी आज सकाळी यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या प्रकरणी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता होती. पण पोलिसांनी 2 मिनिटांतच आपली पीसी गुंडाळल्याने अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. बावधन पोलिस म्हणाले, बावधन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबातील 3 जण अटकेत होते. उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके तैनात करण्यात आली होती. या पथकाने राजेंद्र हगवणे (वैष्णवीचे सासरे) व सुशील हगवणे (वैष्णवीचा दीर) यांना आज पहाटे पुणे स्वारगेट येथून अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाच्या वेळी तिच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी दिली होती. मात्र जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये घेऊन ये या मागणीसाठी सासरचे लोकं तिचा छळ करत होते. तर शशांक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, या सर्व गोष्टीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समजते. याप्रकरणी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) मुळशी तालुक्यातील भुकूमची होती. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, वैष्णवीचा सासरच्या कुटुंबाने अमानुष छळ केला. तिच्यावर मानसिक अत्याचार करण्यात आला. ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर असलेल्या वैष्णवीने पती शशांकला या बाबत माहिती दिली असता, त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन 'हे बाळ माझे नाही, दुसऱ्या कोणाचे असावे' असे म्हटले. यावरून पती शशांक आणि सासरचे लोकांनी वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, शशांकने तिला मारहाण केली. शिवीगाळ करत घरातून हाकलून देईन असे धमकावत तिला घरातून बाहेर काढले.

या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, पोलिसांना निःपक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Видео वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण:सासरा राजेंद्र आणि दीर सुशीलला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी канала mymarathinews
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки