Загрузка...

रेल्वे स्टेशनवरच 'थ्री इडियट्स'चा सीन, प्रवासीच ठरला खरा हिरो! | Vikas Bedre | Baby Birth

#mumbaiviralvideo #rammandirvideo #viral_karyakarta

चित्रपटासारखी घटना खऱ्या आयुष्यात घडली आणि एका अनोळखी प्रवाशाने दाखवलेल्या धाडसाने पुन्हा एकदा सिद्ध केले की “इन्सानियत अजून जिवंत आहे.” रात्री सुमारे १ वाजता राम मंदिर स्थानकाजवळ धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. बाळ अर्धवट जन्माला आलेले असतानाच परिस्थिती गंभीर बनली. त्या वेळी एका प्रवाशाने क्षणाचाही विलंब न करता ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढली आणि मदतीसाठी पुढे धाव घेतली.
डब्यात असलेल्या प्रवाशांनी गोंधळात उपाय शोधत असताना, त्या धाडसी प्रवाशाने आपल्या मोबाईलवरून एका डॉक्टर महिलेशी व्हिडिओ कॉल जोडला. डॉक्टरने कॉलवरून पायरीपायरीने मार्गदर्शन केले आणि त्याने तसंच केलं — अगदी ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील आमिर खानच्या दृश्यासारखं! काही मिनिटांतच बाळाचा जन्म झाला आणि ट्रेनमध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. विकास बेदरे असे या तरुणाचं नाव आहे ज्याने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून महिलेची प्रसूती केली. महिला आणि बाळाला नवा जन्म देणाऱ्या या तरुणाचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Видео रेल्वे स्टेशनवरच 'थ्री इडियट्स'चा सीन, प्रवासीच ठरला खरा हिरो! | Vikas Bedre | Baby Birth канала Viral Karyakarta - व्हायरल कार्यकर्ता
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять