Загрузка страницы

पालघर : शिक्षकाची बदली झाली गावकऱ्यांनी कादली मिरवणूक, गुरुजींनाही अश्रू अनावर

Subscribe YouTube channel For latest breaking news :
https://www.youtube.com/c/hanifmirrorhplive

पालघर: विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील अनोख्या नात्याची प्रचिती अनेकदा येत असते. शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकाचा विद्यार्थ्यांशी जिव्हाळा निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांचा निरोप घेण्याची वेळ आली, की सर्वांनाच जड जातं. पालघर जिल्ह्यातील कासपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अजित गोणते यांची बदली झाली. त्यामुळे विद्यार्थीच नाही, तर त्यांचे पालक आणि ग्रामस्थ यांनीही आदरातिथ्य करत त्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला. शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांसह संपूर्ण गाव भावुक झाले. शिक्षक अजित गोणते यांना देखील यावेळी अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा कासपाडा येथे शिक्षक अजित गोणते १४ वर्षांपूर्वी रुजू झाले. या काळात शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता, क्रीडास्पर्धा व वकृत्व स्पर्धेत तालुका-जिल्हा पातळीवरील विद्यार्थ्यांचे यश, शाळेच्या भौतिक सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल असे विविध उपक्रम राबवून त्यांनी प्रत्येक पालक व ग्रामस्थांच्या मनात घर केले. विद्यार्थी, पालक त्याचप्रमाणे ग्रामस्थ यांचे व शिक्षक अजित गोणते यांचे एक आपुलकीचे नाते तयार झाले.
कासपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत १४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अजित गोणते यांची बदली झाली. त्यांच्या निरोप समारंभा वेळी गावात एक अविस्मरणीय क्षण पाहावयास मिळाला. 'आमचे आदर्श शिक्षक आमचा अभिमान' असे बॅनर गावात लावण्यात आले. आपल्या लाडक्या गोणते सरांची गावातील माताभगिनींनी आरती ओवाळत औक्षण व आदर सत्कार केला.
रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी पुष्पवृष्टी करत, आदिवासी पारंपरिक "तारपा" वाद्याच्या गजरात कासपाड्यातून सरांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्व पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आपल्या लाडक्या सरांना निरोप देताना शिक्षक, पालक, ग्रामस्थ भावूक झाल्याचे पहावयास मिळाले. आपल्याला मिळालेला सन्मान ,आपुलकी यामुळे निरोप देताना शिक्षक अजित गोणते यांना देखील आपले अश्रू अनावर झाले. आवंढा गिळत, रडत-रडत निरोप देतो तसा सन्मानपूर्वक निरोप कासपाड्यातील ग्रामस्थांनी अजित गोणते सरांना दिला.याचसाठी केला होता अट्टहास | शेवटचा दिस गोड व्हावा||' संत तुकोबांच्या या अर्थपूर्ण ओळी अक्षरशः जगण्याचा सुंदर अनुभव माझ्या कासपाड्यातील गावकऱ्यांमुळे माझ्या नशिबात आला. त्यांच्या ऋणाभिव्यक्तीने भारावून गेलो असून आयुष्यातील सर्वोत्तम समाधानाचा, मायेच्या आपुलकीचा अन् १४ वर्षांच्या मेहनतीच्या कृतज्ञतेचा हा 'परमोच्च क्षण' आहे. बदली हा नोकरीचा अविभाज्य भाग आहे. पण आपल्या सेवेचा असा आदर करणारे, आपल्याला पोटच्या पोराप्रमाणे माया करणारे अन शिक्षकाला आपल्या गावचा अभिमान मानणारे पालक भेटण्यासाठीसुद्धा खूप मोठं नाशिब लागतं. शिक्षक म्हणून दिलेले प्रेम अन् माया हीच माझी आजवरची खरी कमाई अन् पुढील कामाची प्रेरणासुद्धा अशी प्रतिक्रिया याबाबत अजित गोणते सरांनी दिली आहे.
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com

Social Media Handles:

Facebook : https://www.facebook.com/groups/612887222801833/?ref=share

Facebook : https://www.facebook.com/hpvasaivirar/

You Tube : https://youtube.com/@hplivenews

Twitter : https://twitter.com/home

Instagram : https://instagram.com/hp_live_news?igshid=YmMyMTA2M2Y=

पालघर : शिक्षकाची बदली झाली गावकऱ्यांनी कादली मिरवणूक, गुरुजींनाही अश्रू अनावर

#teachertransfer #villagecrying #teacherfarewell #zpteachercrying #teacherfarewellreally #Palgharteacherfarewell #PalgharNews #uniquefarewell #latestnews #hplivenews #breakingnews #news #vasaivirar #parentscryingforteacher #loveyouteacher #parents #studentcryingforteacher #student #crying

Видео पालघर : शिक्षकाची बदली झाली गावकऱ्यांनी कादली मिरवणूक, गुरुजींनाही अश्रू अनावर канала HP Live News
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
23 мая 2023 г. 20:33:06
00:03:20
Другие видео канала
वसई : चित्रा वाघ यांची राहूल गांधीवर टिका ; राजनीतीसाठी नाही तर राष्ट्रनीतीसाठी आम्ही काम करतो !वसई : चित्रा वाघ यांची राहूल गांधीवर टिका ; राजनीतीसाठी नाही तर राष्ट्रनीतीसाठी आम्ही काम करतो !विरारमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यु !विरारमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यु !वसई: दोन दिवसाच्या पावसात मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या रस्त्याची चाळण ; प्रचंड वाहतूक कोंडीवसई: दोन दिवसाच्या पावसात मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या रस्त्याची चाळण ; प्रचंड वाहतूक कोंडीकर्ज फेडण्यासाठी डोंबिवलीत तरुणाकडून वृद्ध महिलेचा खूनकर्ज फेडण्यासाठी डोंबिवलीत तरुणाकडून वृद्ध महिलेचा खूनVote Greed - Candidates wash Baby's Bum during Vote AppealVote Greed - Candidates wash Baby's Bum during Vote Appealपालघरमध्ये भाजपच कमळ६ लाख मतांनी फुललं !पालघरमध्ये भाजपच कमळ६ लाख मतांनी फुललं !नालासोपारा : चार करोड़ची खंडणी मागणारे तीन सख्खे भाऊ अटक !नालासोपारा : चार करोड़ची खंडणी मागणारे तीन सख्खे भाऊ अटक !MLA Rajesh Patil will hold Janata Darbar in Vasai!MLA Rajesh Patil will hold Janata Darbar in Vasai!ठाणे : सिमेंट मिक्सर वाहन पलटी होऊन अपघात; एक ठार, सहा जखमीठाणे : सिमेंट मिक्सर वाहन पलटी होऊन अपघात; एक ठार, सहा जखमीवसई गोळीबार अपडेट: मावस भावानेच केले मावस भावावर वार !वसई गोळीबार अपडेट: मावस भावानेच केले मावस भावावर वार !अर्नाळा बोगस कॉल सेंटर प्रकरणी ४९ जणांवर गुन्हा दाखल; १६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल हस्तगतअर्नाळा बोगस कॉल सेंटर प्रकरणी ४९ जणांवर गुन्हा दाखल; १६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल हस्तगतवसईत २१ वर्षीय तरुणाची हत्या ; बापलेक अटक !वसईत २१ वर्षीय तरुणाची हत्या ; बापलेक अटक !वसईत १ वाजेपर्यंत ३०% मतदान; सर्वाधिक कमी २०% नालासोपाऱ्यात तर एका मतदाराला आली चक्कर !वसईत १ वाजेपर्यंत ३०% मतदान; सर्वाधिक कमी २०% नालासोपाऱ्यात तर एका मतदाराला आली चक्कर !नायगाव मध्ये लोकल ट्रेनला क्रेनची धडक ; मोटरमन जखमी !नायगाव मध्ये लोकल ट्रेनला क्रेनची धडक ; मोटरमन जखमी !VVCMC marathon 42 kms startVVCMC marathon 42 kms startवसईत उद्यापासून पासपोर्ट सेवेचा शुभारंभ | Passport office in Vasaiवसईत उद्यापासून पासपोर्ट सेवेचा शुभारंभ | Passport office in VasaiVasai Highway traffic jamVasai Highway traffic jamनालासोपाऱ्यात चाकूचे वार ; मस्जिदच्या वादातून केला हल्ला ! Nalasopara Crimeनालासोपाऱ्यात चाकूचे वार ; मस्जिदच्या वादातून केला हल्ला ! Nalasopara Crimeवसईत तलाठयाने महिलेशी केले गैरवर्तन ; तलाठी अटक !वसईत तलाठयाने महिलेशी केले गैरवर्तन ; तलाठी अटक !वसईत पाण्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू तर तीघे बेपत्ता  !वसईत पाण्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू तर तीघे बेपत्ता !
Яндекс.Метрика