Загрузка страницы

Gokarn Mahabaleshwar | श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर संपूर्ण माहिती महाबळेश्वर गोकर्णची कथा

Gokarn Mahabaleshwar | श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर संपूर्ण माहिती महाबळेश्वर गोकर्णची कथा

मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,श्रीगणेश एका ब्राह्मण बालकाचे रुप धारण करुन रावणाकडे निघाले. रावण समुद्रकिनाऱ्याजवळ येताना दिसताच, श्रीहरी विष्णूने आपल्या सुदर्शनचक्राने सूर्यास झाकून टाकले. सूर्यास्त झाला असे समजून रावण चिंतेत पडला. रावण एक अतिशय विद्वान पंडित होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. तो दररोज नित्यनेमाने संध्या करायचा. आपल्या रोजच्या संध्येची वेळ झाली. भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार आत्मलिंग खाली ठेवायचे नाही मग आता संध्या कशी करायची? असा विचार करीत असतानाच, रावणाचे लक्ष जवळच गुरे राखीत असणाऱ्या बालकाकडे गेले. रावणाने बालगुराख्यारुपी गणेशास मदत मागितली. रावण गणेशास म्हणाला, “मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे. मला एक मदत कर. मी समुद्रात जाऊन संध्या करुन येईपर्यंत तू हे आत्मलिंग सांभाळ, मी लगेचच येतो. पण मी येईपर्यंत हे हातातून खाली ठेवू नकोस.” बालगुराखीरुपी गणेशाने रावणाची विनंती मान्य केली व त्यास सांगितले, “महाराज, मी आपणांस मदत करण्यास तयार आहे. परंतु हे शिवलिंग खूप जड असून ते जास्त वेळ हातात धरुन राहणे मला शक्य होणार नाही. मी आपणांस तीनदा हाक मारेन तेव्हा तुम्ही या व हे शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या अन्यथा मी हे खाली ठेवीन” बालगुराखीरुपी गणेशाचे म्हणने मान्य करुन रावण संध्येस निघून जातो.

रावणाने संध्या सुरु करताच गणेश आपल्या लीलेस सुरुवात करतो. तो घाईघाईने रावणास तीनदा हाक मारतो व हातातील आत्मलिंग जमीनीवर ठेवू लागतो. ते जमिनीवर ठेऊ नकोस अशा इशारा रावण लांबून करुनही तिकडे लक्ष न देता गणेश आपल्या हातातील आत्मलिंग जमीनीवर ठेऊन देतो. श्रीगणेशाने देवतांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने सर्व देवदेवता आनंदाने श्रीगणेशावर फूलांची वृष्टी करतात. हे पाहून रावणास कळून चुकते की, हे काम देवदेवतांचेच आहे. क्रोधीत रावण आत्मलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु आत्मलिंग तसूभरही हलत नाही. मग आत्मलिंग उचलत नाही म्हणून रावण सर्वशक्तीनीशी आत्मलिंग जोरजोरात हलवितो आणि त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा होतो. अनेक प्रयासानंतरही आत्मलिंग जागचे न हलल्याने शेवटी रावण निराश होऊन लंकेस परततो.

गाईच्या कानासारखे म्हणून गोकर्ण तर महाबलशाली रावणाने अनेक प्रयत्न करुनही आत्मलिंग हलले नाही म्हणून महाबळेश्वर (महा+बळ+ईश्वर). अशा प्रकारे महादेवांच्या या आत्मलिंगास ‘गोकर्ण महाबळेश्वर’ असे नाव पडले व कर्नाटकच्या कुमठा तालुक्यातील हे ठिकाण ‘गोकर्ण महाबळेश्वर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे ठिकाण मोक्षाचे द्वार समजले जाते त्यामुळे या ठिकाणास दक्षिण काशी असेदेखील संबोधले जाते.

आत्मलिंगाची स्थापना झालेली पाहून रावणाने संतापून आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली (उदा. आत्मलिंग आणलेला डब्बा, डब्ब्याचे झाकण, आत्मलिंगावर टाकलेले कापड, धागा इ.) या चारही वस्तू वेगवेगळया ठिकाणी जाऊन पडल्या. गोकर्ण महाबळेश्वरबरोबरच या चारही ठिकाणांस धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. भगवान शंकर व पार्वती यांनी खालीप्रमाणे या ठिकाणांस पंचक्षेत्र असे नाव दिले:

१) गोकर्ण महाबळेश्वर- महादेवांचे मुख्य आत्मलिंग
२) सज्जेश्वर- आत्मलिंग आणलेला डबा पडला ते ठिकाण (३५ कि. मी. अंतरावर)
३) धारेश्वर- आत्मलिंगास बांधून ठेवलेला धागा पडला ते ठिकाण (४५ कि.मी. अंतरावर)
४) गुनावंतेश्वर- जेथे आत्मलिंगाचे झाकण पडले ते ठिकाण (६० कि. मी. अंतरावर)
५) मुरुडेश्वर- आत्मलिंगास झाकलेले कापड ज्या ठिकाण पडले ते ठिकाण (७० कि. मी. अंतरावअशा प्रकारे भगवान शंकरांच्या आत्मलिंगाची श्रीगणेशामुळे 'गोकर्ण महाबळेश्वर' या ठिकाणी स्थापना झाली.

या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद

My ather videos
You Tube Guide
1)https://youtube.com/playlist?list=PLRbx8BRU1dFg2Y-yvbAI4C7NYze4gAirA
2)https://youtube.com/playlist?list=PLRbx8BRU1dFjhdB-Q7CkMsD76zMNFRMrY
3)https://youtube.com/playlist?list=PLRbx8BRU1dFhkYrk9RpivHCUCuop3QI3U
4)https://youtube.com/playlist?list=PLRbx8BRU1dFgFoObug4tlGsKlTqwPGqHQ
5)https://youtube.com/playlist?list=PLRbx8BRU1dFiSc64o4MfwyTFovoKn1bBR
मनापासून धन्यवाद

life kokanatli
kokan
marathi
Life Malvani
Malvani

FOLLOW ME +. Facebook
https://www.facebook.com/profile.php?id=100076463103785&..
FOLLOW ME +. Instagram
https://www.instagram.com/life_kokanatli/
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.Gmail-
ganesh.acharekar33@gmail.com
पत्ता :
विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612

lifekokanatli kokan marathi LifeMalvani malvanigajali malvnilaif goshtakokanatli sforsatish calasofkokan calasofkokan KokankarAvinash कोकणसंस्कृती hRishabhtodankar

Видео Gokarn Mahabaleshwar | श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर संपूर्ण माहिती महाबळेश्वर गोकर्णची कथा канала Life Kokanatli
lifekokanatli, kokan, Fishing and crab catching, Kokan festival and culture, Travelling Tour, Ruchakar majvani, Konkan information, People & Blogs, Travel & Events, marathi, festival, travelling vlog, travel vlog, event
Показать
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки