या जमिनीवर असेल तेंव्हा | कविवर्य कुसुमाग्रज | काव्यवाचन: हर्षद माने | #Kusumagraj #Marathi
या जमिनीवर असेल तेव्हा
प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे पडले पाऊल...
या भूमीच्या सुगंधसिंचित धूलिकणांना
या भिंतीवर रुळझुळणाऱ्या
गर्भरेशमी आवरणांना
या मंचातील रत्नमण्यांच्या
चंचल गर्वोद्धत किरणांना
सह्याद्रीवर अवतरलेल्या
ऊर्जस्वल स्वातंत्र्यउषेची
इथेच लागली पहिली चाहूल
याच ठिकाणी
मावळखोऱ्यामधले वादळ
इंद्रसभेवर या आदळले
कृष्णेचे जल खडकामधले
यमुनेच्या श्रीमंत तटावर
येथे वळले
इथे तमाच्या अधिराज्याला
तेजाचे बळ प्रथमच कळले
येथे रुजम्यावरी जरीच्या
असतील कुजबुजला तलवारी
थरथरले शिरताज हिऱ्याचे
असतील श्रवुनि ती ललकारी
संगमरवरी चिऱ्यात
झाले असेल स्पंदन
शिवनेरीच्या वनराजाचे
होता दर्शन
या स्तंभातून
असेल घुमली ती शिववाणी
या दगडांवर
असेल थिजले त्या शब्दातील
अभिमानाचे जळते पाणी
मखमाली गाद्यांवर सळसळ
संतापाची असेल उठली
माळ करतील त्या तख्तावर
असेल तुटली
काच बिलोरी ऐश्वर्याची
पोलादाच्या त्या तुकड्यावर
इथेच फुटली...
- कुसुमाग्रज
Видео या जमिनीवर असेल तेंव्हा | कविवर्य कुसुमाग्रज | काव्यवाचन: हर्षद माने | #Kusumagraj #Marathi канала Prabodhak प्रबोधक
प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे पडले पाऊल...
या भूमीच्या सुगंधसिंचित धूलिकणांना
या भिंतीवर रुळझुळणाऱ्या
गर्भरेशमी आवरणांना
या मंचातील रत्नमण्यांच्या
चंचल गर्वोद्धत किरणांना
सह्याद्रीवर अवतरलेल्या
ऊर्जस्वल स्वातंत्र्यउषेची
इथेच लागली पहिली चाहूल
याच ठिकाणी
मावळखोऱ्यामधले वादळ
इंद्रसभेवर या आदळले
कृष्णेचे जल खडकामधले
यमुनेच्या श्रीमंत तटावर
येथे वळले
इथे तमाच्या अधिराज्याला
तेजाचे बळ प्रथमच कळले
येथे रुजम्यावरी जरीच्या
असतील कुजबुजला तलवारी
थरथरले शिरताज हिऱ्याचे
असतील श्रवुनि ती ललकारी
संगमरवरी चिऱ्यात
झाले असेल स्पंदन
शिवनेरीच्या वनराजाचे
होता दर्शन
या स्तंभातून
असेल घुमली ती शिववाणी
या दगडांवर
असेल थिजले त्या शब्दातील
अभिमानाचे जळते पाणी
मखमाली गाद्यांवर सळसळ
संतापाची असेल उठली
माळ करतील त्या तख्तावर
असेल तुटली
काच बिलोरी ऐश्वर्याची
पोलादाच्या त्या तुकड्यावर
इथेच फुटली...
- कुसुमाग्रज
Видео या जमिनीवर असेल तेंव्हा | कविवर्य कुसुमाग्रज | काव्यवाचन: हर्षद माने | #Kusumagraj #Marathi канала Prabodhak प्रबोधक
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![विवेचन। स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग। हर्षद माने #swamivivekananda #karmayoga #Prabodhak](https://i.ytimg.com/vi/FolyvhotvmQ/default.jpg)
![महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व करावे.. गेम प्लॅन २ #मराठी तरुणांनी IAS, IPS, IFS व्हावे...](https://i.ytimg.com/vi/ZSJ8gvyq9vU/default.jpg)
![डॉ आनंदीबाई जोशी यांची अमेरिकेतील समाधी..](https://i.ytimg.com/vi/kz6ubYfxUIw/default.jpg)
![हनुमानजयंती: छ्त्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी. या दिवसाचे विविध साहित्यातील वर्णने](https://i.ytimg.com/vi/1A7ASL8Yvig/default.jpg)
![कोकणात भाजीपाला पिकांच्या लागवडी ची सुवर्णसंधी.....](https://i.ytimg.com/vi/cbgyS4xSRks/default.jpg)
![संवत्सर २०७९ l कोणते शेअर्स चांगले वाटत आहेत? #शेअरमार्केटमराठी #मराठी #मराठीगुंतवणूक](https://i.ytimg.com/vi/O91sSwQ_gBk/default.jpg)
![गुंतवणुकीचे बेसिक्स..](https://i.ytimg.com/vi/yP8wZwKXsxE/default.jpg)
![मुंबईत करता येण्यासारखे १०० उद्योग: भाग १ । प्रबोधक । #Prabodhak। #Mumbai | #MarathiBusinessman](https://i.ytimg.com/vi/vG6liMgPHZw/default.jpg)
!["Geet Shiv Vandana" - "गीत शिववंदना"](https://i.ytimg.com/vi/uwIr0mo4J4M/default.jpg)
![Video for UPSC Mains: :Story of Kashmir"- ABP Series Pradhanmantri (Episode 3)](https://i.ytimg.com/vi/5QdJMqIVm_Y/default.jpg)
![मराठी उद्योजकांना बळ देणार...मराठी उद्योजकांकडूनच वस्तू विकत घेणार...](https://i.ytimg.com/vi/_X8QYJZsM3Q/default.jpg)
![महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व करावे गेम प्लॅन ३ राष्ट्रीय शासकीय नोकऱ्या आणि सैन्य](https://i.ytimg.com/vi/5XsjMRpRcZk/default.jpg)
![मराठी घरांमध्ये 'आर्थिक लीगसी' तयार झाली पाहिजे....](https://i.ytimg.com/vi/ExUMrEUDfhA/default.jpg)
![जातिव्यवस्थेचे निर्मूलन: निवडक परिच्छेद वाचन](https://i.ytimg.com/vi/cYkwhQU7J_E/default.jpg)
![रायगड ३६० अंश कोनातून l Raigad Fort 360 degree lTushar Mane l Harshad Mane l #Raigad #raigad360view](https://i.ytimg.com/vi/SU-4vFCutKs/default.jpg)
![प्रबोधक महाराष्ट्र व्यापी विकास यंत्रणा: संकल्पना](https://i.ytimg.com/vi/rXpzdBWtubo/default.jpg)
![कोकणातील उद्योग: फळ लागवड आणि फ्रूट प्रोसेसिंग](https://i.ytimg.com/vi/Eso5l3aKomg/default.jpg)
![संयुक्त महाराष्ट्र चळवळ अजून पूर्ण झालेली नाही..](https://i.ytimg.com/vi/_vOReJxfxVk/default.jpg)
![कमी भांडवलातील व्यवसाय २: न्युट्रीशनल फूड सप्लाय...](https://i.ytimg.com/vi/UDgkdan9gfg/default.jpg)
![असं पहावं जगून भाग २: अथर्वशीर्ष आणि मंत्रपुष्पांजलीमधून जगण्याचे ट्रेनिंग](https://i.ytimg.com/vi/vGLKnhMHsKY/default.jpg)