Загрузка страницы

१०. आता एनए परवानगीची गरजच नाही | Now NA Permission not required | Pralhad Kachare

Legal Literacy | विधी साक्षरता | No NA Permission in Development Plan area |
अकृषिक परवानगीची गरज नाही

Legal Literacy
विधी साक्षरता

आता एनए परवानगीची गरज नाही
विकास आराखड्याप्रमाणे जमिनीचा वापर करण्यासाठी आता अकृषिक (एनए-नॉन अॅग्रीकल्चर) परवानगी घेण्याची गरज नाही. जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार, केवळ अकृषिकची आकारणी करून बांधकामाची परवानगी दिली जाणार आहे.
सदनिका बांधताना येणाऱ्या अडचणींमधून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी राज्य सरकारने सन २०१४ पासून चार वेळा दुरुस्ती करून महसूल महाराष्ट्र जमीन अधिनियम व त्याखालील नियमावलीत शिथिलता आणली आहे. मात्र, यासंदर्भातील अंमलबजावणीबाबत महसूल विभागाचे अधिकारी, नागरिकांमध्ये संभ्रम होता. बँकांकडूनही कर्ज देताना एनए परवानगीची विचारणा केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ तयार करण्यात अला आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४२अ नुसार विकास योजनेतील समाविष्ट क्षेत्रात स्थित असलेल्या जमिनीच्या वापरात बदल करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. कलम ४२ ब नुसार अंतिम विकास योजना क्षेत्रात समाविष्ट केलेल्या जमिनीसाठी तसे कलम ४२क अंतिम प्रादेशिक विकास योजना क्षेत्रात समाविष्ट केलेल्या जमिनीसाठी जमीन वापरातील तरतूद तपासली जाईल, तसेच त्या ठिकाणी नजराणा किंवा अधिमूल्य आणि इतर शासकीय देणी यांचा भरणा केला असल्यास अशा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीचा वापर हा विकास योजनेत दर्शविलेल्या वापरात रूपांतरित करण्यात आला आहे, असे गृहीत धरले जाईल. कलम ४२ड प्रमाणे परिघीय क्षेत्रातील जमिनीच्या बाबतीत प्रादेशिक विकास योजनेतील नमूद वापराप्रमाणे जमीन अकृषिक झाल्याचे मानण्यात येईल त्यासाठी जिल्हाधिकारी अथवा त्यांचे अधिकारी धरकाचे कागदपत्र त्यापासून अकृषिक आकारणी निश्चित करतील, त्यानुसार येणारा रूपांतरण कर निश्चित करतील, याशिवाय जमीन वर-२ ची असेल तर नजराणा अथवा अधिमुल्य ठरवून विनिश्चीती प्रमाणपत्र देईल. हे सर्व पूर्ण करून धारकाला कळविणे व या रकमा भरणा करण्याचे कळविणे व याशिवाय वेगळी अकृषिक परवानगी लागणार नाही हे सुध्दा धारकाला कळविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांचीच आहे. त्यामुळे आता धारकाने भरलेली अकृषिक कराची पावती, रुपांतरण कराची पावती म्हणजेच अकृषिक परवानगी असे कायदेशीररीत्या समजण्यात येईल. आवश्यकतेनुसार वर्ग-२ च्या जमिनीच्या बाबतीत नजराणा /अधिमुल्य भरल्याची पावती, विनिश्चीती प्रमाणपत्र ई. ही कागदपत्रे अधिकची लागतील.

Now Non-Agricultural Permission not required
Only Development Permission required
New Tenure NOC required
NA Assessment
Conversion Tax
Nazrana
Unearned value
No objection Certificate
अकृषिक परवानगी
Determination of record of rights
Sanad
सनद
आता एनए परवानगीची गरज नाही
अकृषिक परवानगीची गरज नाही
रूपांतरण कर
नजराणा व अधिभार
विनिश्चिती प्रमाणपत्र
ना हरकत पत्र

Видео १०. आता एनए परवानगीची गरजच नाही | Now NA Permission not required | Pralhad Kachare канала Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 сентября 2020 г. 22:05:23
00:54:27
Другие видео канала
ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकाम परवानगी नियम l Grampanchayt Building Permission Rules in Maharashtraग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकाम परवानगी नियम l Grampanchayt Building Permission Rules in Maharashtra४६. कुळाने खरेदी केलेल्या जमिनीवरील निर्बंध शिथिल - कुळकायदा कलम ४३ मधील सुधारणा४६. कुळाने खरेदी केलेल्या जमिनीवरील निर्बंध शिथिल - कुळकायदा कलम ४३ मधील सुधारणागुंठेवारी म्हणजे काय II गुंठेवारी प्लॉट आणि NA प्लॉट मध्ये फरक काय आहे II WHAT IS GUNTHEVARIगुंठेवारी म्हणजे काय II गुंठेवारी प्लॉट आणि NA प्लॉट मध्ये फरक काय आहे II WHAT IS GUNTHEVARI३६. एन.  ए.  परवानगीची खरच गरज नाही | मग अडचणी का ? |   प्रश्नोत्तरे३६. एन. ए. परवानगीची खरच गरज नाही | मग अडचणी का ? | प्रश्नोत्तरेHow to Buy Plot in India - Documents and ProcessHow to Buy Plot in India - Documents and ProcessWhat is NA Plot ? NA प्लॉट म्हणजे काय ?What is NA Plot ? NA प्लॉट म्हणजे काय ?Gunthewari will be regularized  गुंठेवारीचे नियमितीकरण होणार सामान्य जनांचे घराचे स्वप्न होणार साकारGunthewari will be regularized गुंठेवारीचे नियमितीकरण होणार सामान्य जनांचे घराचे स्वप्न होणार साकारगुंठेवारी प्लॉट्स आता होणार नियमित l महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय l Maharashtra Govt lगुंठेवारी प्लॉट्स आता होणार नियमित l महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय l Maharashtra Govt lघर दुकान बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे सर्व कायदेशीर माहिती | Bandkam parvangi, Futpate Rulesघर दुकान बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे सर्व कायदेशीर माहिती | Bandkam parvangi, Futpate Rules४९. राज्यातील  ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्यासाठी सुधारणा अधिनियम २०२१४९. राज्यातील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्यासाठी सुधारणा अधिनियम २०२१ग्रामीण भागात एन.ए. पासून सुट आहे का ? – अ‍ॅड. तन्मय केतकरग्रामीण भागात एन.ए. पासून सुट आहे का ? – अ‍ॅड. तन्मय केतकर1.5 ते 3 गुंठे (1500-3000 चौ.फु) बांधकाम परवाना ची गरज नाही | ग्रामपंचायत नगरपालिका हा कायदा लागु |1.5 ते 3 गुंठे (1500-3000 चौ.फु) बांधकाम परवाना ची गरज नाही | ग्रामपंचायत नगरपालिका हा कायदा लागु |८. Watan  Laws -1 |वतन जमिनीचे कायदे - १   #Watanlaws #Inamlaws #landlaws #pralhadkachare८. Watan Laws -1 |वतन जमिनीचे कायदे - १ #Watanlaws #Inamlaws #landlaws #pralhadkachare११. वडिलांच्या संपत्तीत  मुलींना समान हक्क | Equal Rights of Daughters in fathers property११. वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान हक्क | Equal Rights of Daughters in fathers propertyजमीन NA कशी करायची ? कागदपत्रे, अर्ज, संपूर्ण माहिती मराठी मध्ये |Non-Agricultural Land in Marathiजमीन NA कशी करायची ? कागदपत्रे, अर्ज, संपूर्ण माहिती मराठी मध्ये |Non-Agricultural Land in Marathiसावधान हे माहीत नसेल तर घर जमिन संपत्ती तुमची राहणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय Adverse Possessionसावधान हे माहीत नसेल तर घर जमिन संपत्ती तुमची राहणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय Adverse Possession३. हद्दीवरून रस्त्याचा हक्क | Boundary Disputes #Righttowayoverboundaries #BoundaryDisputes #MLRC३. हद्दीवरून रस्त्याचा हक्क | Boundary Disputes #Righttowayoverboundaries #BoundaryDisputes #MLRCPROCEDURE FOR NON AGRICULTURAL LANDPROCEDURE FOR NON AGRICULTURAL LANDसातबार्‍यावर लिहलेले भोगवाटदार १, भोगवाटदार २, भोगवाटदार ३ म्हणजे काय पूर्ण माहिती II Sathbaraसातबार्‍यावर लिहलेले भोगवाटदार १, भोगवाटदार २, भोगवाटदार ३ म्हणजे काय पूर्ण माहिती II Sathbara
Яндекс.Метрика