Загрузка...

Parbhani News: परभणीत शेतकरी कायदा विरोधात जिल्ह्यात कडकडीत बंद.

परभणीत शेतकरी कायदा विरोधात जिल्ह्यात कडकडीत बंद.

परभणी शहरात सकाळपासूनच बंदचा परिणाम दिसून आला . भाजीपाला , दूध विक्रेत्यांनी शहराकडे पाठ फिरवली . वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गेटसमोर बसणाऱ्या शेतकऱ्यांनीही मंगळवारी बंदच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला विक्री बंद होती . मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदमुळे एकही शेतकरी इकडे फिरकला नाही . त्यामुळे येथे मोठा शुकशुकाट दिसून आला . गांधीपार्क , क्रांतीचौक व जिंतूर रस्त्यावर ही भाजी व फळ विक्रेते आढळले नाहीत . सकाळी ११ वाजता वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रमुख डॉ.धर्मराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उड्डाण पुलावर रस्तारोको करण्यात आला .
यावेळी तब्बल अर्धा ते पाऊन तास हा रस्ता रोको चालला . यावेळी उड्डाण पुलावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . शिवाजी चौक परिसरात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड राजन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे प्रताप देशमुख , विजय वाकोडे, स्वराजसिंह परिहार ,काँग्रेसचे नदीम इनामदार , गणेश घाडगे, भाई कीर्ती कुमार बोरंडे, गुलमीर खान कृष्णा कटारे, बाळासाहेब देशमुख , अॅड . माधुरी क्षीरसागर , इंसाफ युथ फौंडेशन चे सय्यद अझहर , अब्दुल शेख,यांचा सहभाग होता . छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणा देत मुंडण आंदोलन केले .या वेळी शेतकरी विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते.

#Bharat #Band #Parbhani #Band

Видео Parbhani News: परभणीत शेतकरी कायदा विरोधात जिल्ह्यात कडकडीत बंद. канала Azad Bhoomi News Parbhani
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки