Chunaav | Short Film | CEO maharashtra | Avinash Shembatwad
चुनाव ची सगळी टीम ' यथावकाश ' च्या स्क्रिनिंग साठी चंद्रपूर ला आली होती. चुनाव च शूट संपल्यावर मला एका आजी ने विचारलं होत की हे आम्ही कुठ बघायचं आमच्या गावात तर रेंज नसते, त्या वेळी सहज बोलतांना आम्ही म्हणालो की आपण गावात मोठ्या पडद्यावही ही फिल्म दाखवू. पुढे फिल्म तयार होऊन release झाली, एक महिना उलटून गेला पण त्यांनी अजून पण फिल्म बघितली नव्हती. रात्री सगळी टीम गप्पा मारत असताना अचानक हे सगळ आठवल. मग कामाला लागली सगळी आणि दोन तासात प्रोजेक्टर, स्क्रीन आणि बाकी सगळ्या गोष्टींचा जुगाड केला, आर्ध्या रात्री गावात पोचलो, जाऊन आधी सरपंचानां उठवलं. ते म्हणाले २० मिनित द्या सगळं जमवतो. गावातली सगळी पोरं सोबतीला आली. Sound Box नव्हता,कुणीतरी दोन मोठे sound box आणून दिले. एका घरातून लाईट च कनेक्शन आणि extension मिळाले, बाया बापड्यांनी, रस्ता झाडून बसायला जागा केली, बघता बघता सगळा गावं जमला. ज्यांना बसायला जागा नाही मिळाली त्यांनी घराच्या पत्रावर बैठक जमवली. फिल्म सुरू झाली , बघणाऱ्या प्रत्येक डोळ्यात अभिमान होता की हे आम्ही केलंय. वर्षानुवर्षे आलीप्त आणि दुर्लक्षित जीवन जगणाऱ्या ह्या लोकांना आज स्वतःला limelight मध्ये पाहताना भरून आलं. त्यातल्या कित्येकांना त्या रात्री झोप नसेल आली कदाचित... सगळं संपवून समान गाडीत भरत होतो तेवढ्या एक बाबा म्हणले " पुढची शूटिंग कवा हाय बापू ? " . रस्ताभर मी आणि अज्या पुढच्या प्रोजेक्ट ची खलबत करत बसलो...... ❤️
*Written & Directed by @avinash_shembatwad
DOP @dopajayghadge
Ass Dop @apparture_stories
Ass Director @suraj_waman_official_
Production manager @being_human_vj
Music @tanmay_sancheti
Editor @the_atharvamule
Sound @ajinkyajumale
.
.
@cmomaharashtra_ @pm._.modi @ecisveep @mieknathshinde @devendra_fadnavis @collector.chanda @chandrapur @ceo_maharashtra @ceo_maharashtra
Видео Chunaav | Short Film | CEO maharashtra | Avinash Shembatwad канала CEO Maharashtra
*Written & Directed by @avinash_shembatwad
DOP @dopajayghadge
Ass Dop @apparture_stories
Ass Director @suraj_waman_official_
Production manager @being_human_vj
Music @tanmay_sancheti
Editor @the_atharvamule
Sound @ajinkyajumale
.
.
@cmomaharashtra_ @pm._.modi @ecisveep @mieknathshinde @devendra_fadnavis @collector.chanda @chandrapur @ceo_maharashtra @ceo_maharashtra
Видео Chunaav | Short Film | CEO maharashtra | Avinash Shembatwad канала CEO Maharashtra
Комментарии отсутствуют
Информация о видео
26 сентября 2023 г. 16:39:34
00:01:29
Другие видео канала




















