# korigad
नमस्कार मित्रांनो आज पूर्ण नियोजित कामानिमित्त मी डॉक्टर दीपक निकम आणि श्री गणेश शिंदे (दुर्गनाथ ट्रेकर्स ॲण्ड एडव्हेंचर्स चा सर्वेसर्वा ) आम्ही दोघे दुर्गनाद ट्रेकर्स मावळे काही पूर्ण नियोजित कामानिमित्त लोणावळा येथे दोन दिवसाच्या मुक्कामासाठी गेलो. तेथील वातावरण अतिशय आल्हादायक होते शिवाय मुसळधार पाऊस होता. आमचा मुक्काम "हॉटेल बॅसीलीका" या ठिकाणी होता. शनिवारचा पूर्ण नियोजित कार्यक्रम झाल्या नंतर रात्री श्री गणेश शिंदे यांच्या डोक्यामध्ये रवीवार म्हणले की ट्रेकींग आणि छत्रपतींचा नवीन किल्ला सर करायचा हे पक्के ठरविलेले असते. गणेशच्या डोक्यात "२०१ " वा किल्ला करण्याचे आयडिया आली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच रविवारी पहाटे पाच वाजता आम्ही हॉटेल सोडले आणि गाडीतून तडक लोणावळ्यापासून जवळच असलेला २४ किलोमीटर अंतरावरील "कोरीगड" या गडकिल्ल्यांचे ट्रेकिंग करण्यासाठी निघालो रात्रीच्या अंधारात मुसळधार पावसात आणि गर्द धुक्यामध्ये रस्ता दिसणे अतिशय अवघड होते. शिवाय रस्ता चुकला तर मदतीला किंवा माहिती सांगण्यास गुगल शिवाय पर्याय नव्हता. परंतु नेहमीच्या अनुभवानुसार श्री गणेशाला गुगल वरील बाई नेहमी चकरा मारायला लावते आणि तसेच झाले फक्त वीस च्या स्पीडने रस्ता डोळे फाडून बघत आम्ही ५.४५ वाजता कोरिगेड किल्ल्याच्या ठिकाणी पायथ्याशी पोहोचलो. पाऊस मुसळधार पडत होता. गाडीतून बाहेर पडणे शक्य नव्हते, दाट धुक्यामुळे सभोवतालचे काही एक दिसत नव्हते अशा परिस्थितीत आम्हाला मदतीसाठी किंवा माहिती सांगणारे किंवा गडावर जाणारा रस्ता सांगणारे कोणीच त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. अशातच थोड्याशा प्रयत्नाने आम्ही किल्ल्याच्या डोंगर वाटेचा रस्ता शोधण्यात यशस्वी झालो. आणि प्रचंड पावसात रेनकोट आणि छत्री या दोन्हीच्या आधार घेऊन हळूहळू दऱ्याखोऱ्याच्या रस्त्यातून कोरीगडाच्या प्रवेशद्वाराकडे निघालो. सुरुवात केली जवळपास एक किलोमीटर अंतर गेल्यानंतर थोडेसे अंधुक से दिसायला लागले अर्ध्या तासानंतर उजेड बऱ्यापैकी आला आणि या प्रचंड पावसात आम्हाला कोरीगड ट्रेकिंगचा अतिशय थरारक तसेच आनंददायी अनुभव आला. कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कोरीगडचा रस्त्यावरती अर्ध्या फुटावर जास्त पाणी वाहत होते तर कोरीगडाच्या किल्ल्याच्या पूर्ण पायऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याने भरून खळखळून वाहत होत्या जणू काही जवळपास एक किलोमीटरचा धबधबा गडाच्या शिखरावरून कोसळत आहे असं वाटत होते. अशाही परिस्थितीत मी आणि श्री गणेश, आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पोहोचलो आणि आम्ही २०१वा किल्ला सर केल्याचा आनंद साजरा केला. ट्रेकिंगच्या रस्त्यामध्ये व्हिडिओ फोटो तसेच कोरीगडावरील शिव मंदिर तटबंदी तलाव तसेच बुरुज आणि त्यावर असणाऱ्या तोफा यांचे निरीक्षण करून दोघे पावसामध्ये आणि दाट धुक्यामध्ये आम्ही परतीचा प्रवास चालू केला. त्याचवेळी बुर्जावरून चालत असता वाऱ्याच्या झोकाने श्री गणेश शिंदे यांची सर्वात आवडती टोपी हिला कडेलोट मिळाला. आणि ही कायमची आठवण *कोरीगडाची* गणेशला राहील अशी छोटीशी घटना घडली अशाप्रकारे श्रावण महिन्यातील चौथ्या रविवारी आम्ही २०१ कोरीगड किल्ला सर केला आणि त्याचा आम्हाला अत्यंत आनंद झाला.
*जय भवानी*
*जय शिवाजी*
Видео # korigad канала Durgnaad trekrs Satara vlog Ganesh shinde.
*जय भवानी*
*जय शिवाजी*
Видео # korigad канала Durgnaad trekrs Satara vlog Ganesh shinde.
Комментарии отсутствуют
Информация о видео
28 августа 2024 г. 18:44:01
00:10:23
Другие видео канала