Загрузка страницы

आदर्शगाव भागडी यशोगाथा || BHAGADI VILLAGE DOCUMENTORY

नैसर्गिक रित्या प्राप्त भौगोलिक परिस्थिती मुळे गेले अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणारे दुष्काळग्रस्त गाव...आंबेगाव तालुक्यातील भागडी गाव
तीव्र पाणी टंचाई, ओसाड पडलेले माळरान, पारंपारिक अवजारे वापरून शेती, आणि पाण्याअभावी जळलेली पिके आणि ओसाड पडलेली शेती त्यामुळे अक्षरश: गुरांची भूक भागविण्यासाठी उंबराचा वापर करावा लागत असे आणि या परीस्तीतीमुळे गावातील लोक पोटापाण्यासाठी बाहेरगावी कामाला जावू लागले.मीना व घोडनदीपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर भागडी असल्याने पाण्यासाठी कसलीही व्यवस्था करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. हिवरेबाजार (ता.पारनेर) गावाविषयी गावकऱ्यांना कुतूहल होते. त्या गावानेही दुष्काळ हद्दपार करून शेती हिरवीगार केली होती. गावातील हरहुन्नरी ग्रामस्थ आणि ज्ञानशक्ती विकास वाहिनी स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने पोपटराव पवार यांची भेट घेतली. तेथील परिस्थितीची पाहणी केली. आणि आमच्याही भागडी गावात असा कायापालट व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. आदर्शगाव योजनेच्या माध्यमातून स्वत: आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच मा. पोपटराव पवार या भागडी गावाची पाहणी करण्यास आले. आणि या गावाच्या सर्वागीण विकासा संबंधी येथील तमाम ग्रामस्थांशी चर्चा केली. आणि एक अद्भुत प्रेरणा दिली. गावाचा एक भौगोलिक, सामाजिक नकाशा तयार केला, त्यावेळेसच्या तत्कालीन कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्या मदतीने नाला/ओढा आणि तमाम गावाच्य भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली. आणि गावामध्ये कोणकोणती प्रस्तावित कामे करता येईल याची एक भरभक्कम यादी केली गेली आणि कामाला सुरुवात झाली. विविध पाणलोट क्षेत्राच्या तथा जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सलग समपातळी चर, अनगड दगडी बांधाची,कंपार्टमेंट बंडिंग,बंधाऱ्यांची कामे, नाला खोलीकरण अशी विविध मृदसंधारणाची कामे करत पाणी अडवा आणि जिरवा हा मूलमंत्र जपत या गावामध्ये वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले, मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, महिलाभगिनी, अबाल्वृन्द्धांच्या मदतीने वृक्ष लागवड करण्यात आली.याकामी अगदी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी धावून आले. आणि त्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला, ग्रामस्वच्छता जनजागृती करत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडहि केली. गावाच्या ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड जाणीव आणि जागृतीतून विवाहनोंदणीपूर्वी, दुचाकी, चारचाकी खरेदीनंतर वृक्षांची लागवड करण्याचा ठराव एकमताने ग्रामसभेमध्ये घेण्यात आला. यात ज्ञानशक्ती विकास वाहिनीचा पुढाकार विशेषत्वाने नमूद करावासा वाटतो. या संस्थेने गावाच्या पाणीटंचाईच्या प्रश्नाबरोबरच महिला मेळाव्याचे आयोजन करून शिवार फेरी, प्रभात फेरीच्या माध्यमातून विविध ग्रामीण प्रश्नावर प्रकाशझोत टाकीत त्याबत जनजागृती करण्याचे काम केले. जसे कि स्त्रीभ्रूणहत्या, ग्रामस्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, परिसराची निगा, आरोग्यविषयक, शैक्षणिक प्रश्नावर तंत्रकुशल मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. यात ज्ञानशक्ती संस्थेबरोबरच, गावाची एकी आणि अतिशय तळमळीने गावाविकासामध्ये गावाची असणारी धडपड महत्वाची, विधानसभेची माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष देवदत्त निकम यांनी पोकलन यंत्र उपलब्ध करून दिल्यामुळे ओढ्यांचे खोलीकरण करण्यात आले, कृषी खात्याच्या माध्यमातून झालेले अद्भुत काम आणि अनेक व्यायाक्तिक प्रकारची विविध संस्था, मान्यवरांची मदत महत्वाची आहे.
गावाच्या या परिश्रमांना फळ प्राप्त झाले आणि वरुणराजाच्या आशीर्वादाने वनराई बंधारा भरला गेला,सिमेंट बंधारे ओसांडून वाहू लागले, नाला बंधारा काठोकाठ भरला गेला आणि एकंदरीत पर्क्युलेषण मुळे गावातील तमाम विहिरी पाण्याने काठोकाठ भरल्या गेल्या...कुपनलिका हातपंप पुन्हा पाण्याने ओसंडून वाहू लागले. गावाच्या आनंदाला पारावर उरला नाही. अनेक वर्षाने शेतकरी खऱ्या अर्थाने सुखावला. पण उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार आणि मल्चिंग पेपरचा वापर करून पिके घेण्यावर भर दिला आहे. ठिकठीकाणी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर शेततळी निर्माण केली.अत्यधुनिक पद्धतीने शेतकरी शेती करू लागले. प्रामुख्याने टोमॅटो, वांगी, गवार, मेथी कोथिंबीर, मिरची, कोबी, फ्लावर, झेंडू, कलिंगड, उन्हाळी भुईमुग आदी पिके शेतकरी घेऊन लागले आहेत.गावातील मुख्य चौकाचे व रस्त्यांचे कॉक्रीटीकरण केले आहे. गायरान जमिनीतील शेकडो वृक्षांची जोमदार वाढ झाली आहे. तसेच शेतकऱ्यांनीही बांधावर व घराच्या परिसरात वृक्षलागवड व संवर्धनावर भर दिला आहे.पूर्वी गावात फक्त ५१० लिटर दुधाचे संकलन होते. संकरीत गाईसाठी मुबलक प्रमाणात मका, गवत आदि हिरवा चारा उपलब्ध झाल्याने दुध व्यवसाय भरभराटीस आला. आणि तब्बल ३ ते ४ हजार लिटरच्या आसपास दुधाचे संकलन होऊ लागले आहे. शेतीविकासाबारोबारच गावाचा शैक्षणिक विकास सुद्धा सक्षमपणे होऊ लागला. शाळेमध्ये विद्यार्थ्यासाठी तमाम सोई सुविधा निर्माण झाल्या. आणि मराठी बरोबरच इंग्रजी भाषेचे सुद्धा शास्त्रशुद्ध विक्षण विद्यार्थ्यांना मिळू लागले आणि एकूणच शाळेमध्ये विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढली. तमाम ग्रामस्थांच्या लोकसहभागातून, चिकाटीतून आणि विशेष म्हणजे ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या विशेष सहकार्यातून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करणारे हे "आदर्शगाव भागडी"
आदर्शगाव योजनेतील सप्तसूत्री कार्यक्रम म्हणजे ग्रामस्वच्छता, परिवार नियोजन, कामाबद्दल आपलेपणाची भावना ठेवणे, वृक्षवल्लीचे संरक्षण, जलबचत व गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संरक्षणासाठी सदैव दक्ष राहणे. याचा काटेकोरपालन करणाऱ्या या आदर्शगाव भागडीला अनेक मान्यवरांच्या, अधिकाऱ्यांच्या, राज्यातील विविध शेतकरी गटांच्या अनेक भेटी झाल्या... अनेक ठिकाणी गावाला गौरविण्यात आले.
नक्कीच आदर्शगाव भागडीचा हा अद्भुत कायापालट हा अनेक तहानलेल्या गावांना एक मार्गदर्शक ठरेल यात काही शंका नाही.

Видео आदर्शगाव भागडी यशोगाथा || BHAGADI VILLAGE DOCUMENTORY канала FULL 2 KALLAKAR
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 сентября 2019 г. 15:25:01
00:11:55
Другие видео канала
TI   CHYA KAVITA BY TANHAJI || ‘ती...’ च्या कविता || कवी प्रा. तान्हाजी बोऱ्हाडे (सर)TI CHYA KAVITA BY TANHAJI || ‘ती...’ च्या कविता || कवी प्रा. तान्हाजी बोऱ्हाडे (सर)न ऐकलेले कर्मवीर | कशी निर्माण झाली रयत शिक्षण संस्था | UNCUT SPEECH | डॉ. काशिनाथ सोलनकर सरन ऐकलेले कर्मवीर | कशी निर्माण झाली रयत शिक्षण संस्था | UNCUT SPEECH | डॉ. काशिनाथ सोलनकर सरगायन : जिसकी लागी रे लगण भगवान में || गणेश महाराज घोडेकरगायन : जिसकी लागी रे लगण भगवान में || गणेश महाराज घोडेकर🔴HIGHLIGHT : भव्य बैलगाडा शर्यत मु.सांडभोरवाडी ( तिन्हेवाडी) ता.खेड | सर्व ७५ गाडे एकाच वेळी पहा🔴HIGHLIGHT : भव्य बैलगाडा शर्यत मु.सांडभोरवाडी ( तिन्हेवाडी) ता.खेड | सर्व ७५ गाडे एकाच वेळी पहामंचर व्याख्यानमाला २०१९ || समाजसेवक डॉ राजेंद्र व सुचित्रा धामणे  व्याख्यानमंचर व्याख्यानमाला २०१९ || समाजसेवक डॉ राजेंद्र व सुचित्रा धामणे व्याख्यानSPEECH श्रमिक गोजमगुंडे : आक्रोश गडकोटांचा || सह्याद्री प्रतिष्ठान SAHYADRI PRATISHTHAN || SHRAMIKSPEECH श्रमिक गोजमगुंडे : आक्रोश गडकोटांचा || सह्याद्री प्रतिष्ठान SAHYADRI PRATISHTHAN || SHRAMIK#INDIAN JUGAD || FARMING TECHNIC || कैसे करते है हमारे भारतीय खेती || शेतीतील भन्नाट IDEA#INDIAN JUGAD || FARMING TECHNIC || कैसे करते है हमारे भारतीय खेती || शेतीतील भन्नाट IDEAकाय आहे सप्तपाताळ |  WHAT IS SAPTPATAL | श्री भैरवनाथ कथा | बाजीराव महाराज बांगरकाय आहे सप्तपाताळ | WHAT IS SAPTPATAL | श्री भैरवनाथ कथा | बाजीराव महाराज बांगरसांगून टाका आज... तू आहेस म्हणून..|| तीन मिनिट नक्की ऐका ||प्रा. गणेश शिंदे सरसांगून टाका आज... तू आहेस म्हणून..|| तीन मिनिट नक्की ऐका ||प्रा. गणेश शिंदे सरभव्य अमृतमहोत्सवी श्रीराम जन्मोत्सव सोहळा-19 || संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यातभव्य अमृतमहोत्सवी श्रीराम जन्मोत्सव सोहळा-19 || संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यातलक्ष्मीची प्राप्ती  कशी करावी अर्थात पैसा  कसा मिळवावा.? || ह.भ.प. बाजीराव महाराज बांगरलक्ष्मीची प्राप्ती कशी करावी अर्थात पैसा कसा मिळवावा.? || ह.भ.प. बाजीराव महाराज बांगरSPEECH BIG ACTOR RAVI KALE | प्रसिद्ध सिनेअभिनेते मा. रवी काळे | HARD WORK GET SUCCESS | व्याख्यानSPEECH BIG ACTOR RAVI KALE | प्रसिद्ध सिनेअभिनेते मा. रवी काळे | HARD WORK GET SUCCESS | व्याख्यानभीमाशंकर करंडक || स्वत:च परीक्षक व्हा... तुमच्यातील कलाकार ओळखा...भीमाशंकर करंडक || स्वत:च परीक्षक व्हा... तुमच्यातील कलाकार ओळखा...भव्य अमृतमहोत्सवी श्रीराम जन्मोत्सव सोहळा || रामजन्म उत्साहात साजराभव्य अमृतमहोत्सवी श्रीराम जन्मोत्सव सोहळा || रामजन्म उत्साहात साजराऔरंगजेब संभाजी महाराजांना का घाबरत होता | ह.भ.प. बाजीराव महाराज बांगरऔरंगजेब संभाजी महाराजांना का घाबरत होता | ह.भ.प. बाजीराव महाराज बांगरकर्मवीर जयंती व्याख्यान | प्रा.तान्हाजी बोऱ्हाडे प्र.व्याख्याते,कवी, प्रबोधनकार | SHRIRAM VIDYALAYकर्मवीर जयंती व्याख्यान | प्रा.तान्हाजी बोऱ्हाडे प्र.व्याख्याते,कवी, प्रबोधनकार | SHRIRAM VIDYALAYश्रीकृष्ण कृपामूर्ती ह.भ.प. डॉ. विकासनंद महाराज मिसाळ, अहमदनगरश्रीकृष्ण कृपामूर्ती ह.भ.प. डॉ. विकासनंद महाराज मिसाळ, अहमदनगर#कोरोनाला_आता_घाबरायचं_नाही || प्रचंड व्हायरल झालेला डॉ. अजय पांडे यांचा व्हिडीओ#कोरोनाला_आता_घाबरायचं_नाही || प्रचंड व्हायरल झालेला डॉ. अजय पांडे यांचा व्हिडीओऐसी भक्ताची माऊली | करी कृपेची साउली|| ह.भ.प. गणेश महाराज जगताप यांचे लेटेस्ट कीर्तन - २०१९ऐसी भक्ताची माऊली | करी कृपेची साउली|| ह.भ.प. गणेश महाराज जगताप यांचे लेटेस्ट कीर्तन - २०१९श्रीकृष्ण गोकुळ सोडून जाताना अश्रू आवरेना. श्रोतेही गहिवरले.|| भागवताचार्य विश्वनाथ महा.रिठेश्रीकृष्ण गोकुळ सोडून जाताना अश्रू आवरेना. श्रोतेही गहिवरले.|| भागवताचार्य विश्वनाथ महा.रिठे
Яндекс.Метрика