Загрузка страницы

Nascent Information Technology Employees Senate NITES letter to CM to stop illegal layoffs

Nascent Information Technology Employees Senate - NITES #ShameOnNasscom
आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ आणि त्याच्या संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कल्याण, फायदे आणि हक्कांसाठी काम करणाºया राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सिनेटने ६८,००० हून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी याबाबत कामगार विभागाला निवेदन दिले आहे. कर्मचारी कपात, वेतन कमी करणे, सक्तीने राजीनामा, इतर विविध समस्या याविरोधात कामगार विभाग आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केल्या आहेत.
दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात कर्मचारी कपात किंवा कर्मचाऱ्यांची पगार कपात होत आहेत. अगदी मोठमोठ्या कंपन्यासुद्धा नाईलाजाने कर्मचारी कपातीचा निर्णय घेत आहेत. आता आयटी कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडून तब्बल ६८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे तसेच पगारकपातीच्या नोटीस पाठवल्या गेल्या आहेत. तसेच राज्य सरकारने आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू नये असे आदेश असताना त्यांना विविध कारणे दाखवून घरी जाण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे आता आयटी कर्मचारी धास्तावले आहेत.त्यामुळं आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर एक प्रकारची टांगती तलवार आली आहे. नोकरी टिकणार की जाणार, ही एक चिंता अनेक आयटी कर्मचाऱ्यांना आहे. त्यातच पुण्यात आयटीतील अनेकांना कंपन्यांनी घरचा रस्ता दाखवायला सुरुवात केलीय. एखादा प्रोजेक्ट येण्याची शक्यता गृहित धरून करण्यात आलेल्या नेमणुका कंपन्यांनी रद्द केल्या आहेत. या कंपन्या बेंच रिसोर्स म्हणून, काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करतात, अशा कर्मचाऱ्यांनी घरचा रस्ता दाखवण्यात येत आहे.
कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. पुणे आयटी क्षेत्रात येणारे सर्व प्रोजेक्ट हे विदेशातून येत असतात. प्रामुख्याने अमेरिका आणि ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्राला कामे मिळत असतात, परंतु तिथलीच अर्थव्यवस्था ढासळलेली असल्याने नवे येणारे सर्व प्रोजेक्ट बंद झाल्याची माहिती आयटी क्षेत्रातील तरुणांनी दिली आहे.
तसेच काही कंपन्यांनी 25 टक्के पगार कपात केल्याची माहिती मिळत आहेत. उर्वरित कंपन्या ह्या जमत असेल तर ह्या पगारात करा अन्यथा तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा आहे अशी भूमिका घेत आहेत.

#NITES #JusticeforEmployees #ITEmployees #StrongerTogether #UnitedWeWin #StandAsOne #JoinNITES #NITESimpact #TV9

Видео Nascent Information Technology Employees Senate NITES letter to CM to stop illegal layoffs канала Nascent IT Employees Senate NITES
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
4 июня 2020 г. 11:14:20
00:02:59
Яндекс.Метрика