Загрузка страницы

पाणी कुठ आहे जमीनीतील पाणी कसे पहावे ? कवठाचं झाड आणि वारूळ यांच्या वरून जमिनीतील पाण्याचा शोध

पाणी कुठ आहे जमीनीतील पाणी कसे पहावे? कवठाचं झाड आणि वारूळ यांच्या वरून जमिनीतील पाण्याचा शोध वृक्षांवरून भूजल शोधणे आजूबाजूचा भाग निर्जल व शुष्क, एखाद्या ठिकाणी जर वेताचे झाड अगर बेट असेल, तर वेताच्या पश्‍चिमेला तीन हातांवर व साधारण चार पुरुष खोलीवरून जलशिरा वाहते. खोदत असताना साधारण सात-आठ हातांवर पांढरा बेडूक, पिवळी माती व कठीण दगडाचा पातळ थर लागतो, त्याखाली पाणी असते.
- निर्जल प्रदेशात जांभळाचे झाड. त्यापासून उत्तरेला नऊ-दहा हातांवर सहा पुरुष खोलीवर एक पूर्वाभिमुख जलशिरा मिळेल. खोदताना लोखंडासारखा वास येणारी माती, त्याखाली पांढुरक्‍या रंगाची निस्तेज माती व एक बेडूक सापडेल. त्या जांभळाच्या पूर्वेला एखादे मोठे वारूळ असेल तर झाडाच्या दक्षिणेला नऊ हात अंगावर सात हात खोदल्यावर एखादा मासा, बदकाच्या आकाराचा दगड व निळसर माती मिळेल, ही लक्षणे असली तर त्याला पाच पुरुष खणल्यावर गोड्या पाण्याचा अखंड झरा सापडतो.
- मऊ व चमकदार पाने असलेल्या वृक्षांच्या दक्षिणेला पाच पुरुष खोलीवर पाणी मिळते.
- जर वड, पळस व औदुंबर किंवा वड व पिंपळ यांची झाडे एकत्र आढळतील, तर त्यांच्या खाली तीन हातावर उत्तरवाहिनी जलशिरा आढळते.
- एखाद्या भूप्रदेशातील झाडांची पाने जर मऊ व चमकदार असतील किंवा तेथे वेलींच्या जाळी असतील किंवा कमळ, गोक्षुरा (गोखूर), उशीर (वाळा), गुंड्र (गुळवेस), काश, नलिका (दालचिनी) किंवा नल (देवनळ) नावाचे गवत भरपूर प्रमाणात उगवले असेल तर पंधरा हात खोलीवर तेथे पाणी मिळते.
- खजूर, जांभूळ, अर्जुन, वेत, हस्तीकर्ण (शिंदणी), नागकेसर, शतपत्र (गजकर्णी), कदंब, करंज, सिंदुवार (निर्गुंडी), बिभीतक (बेहडा) किंवा मदयंतिका (मेहंदी) यांचे वृक्ष एखाद्या प्रदेशात असतील तर पंधरा हात खोलीवर पाणी मिळते.
- वृक्षांच्या किंवा वेलींच्या पानाला छिद्रे असतील तर त्यापासून दूर अंतरावर पाणी असते.
- करीर वृक्षातून दूध येत असून, त्याला तांबडे कोंब येत असतील तर त्याच्या खाली पाणी असते.
- एखाद्या निर्जल किंवा निष्कंटक प्रदेशात गवताळ पट्टा किंवा कंटकमय विभाग किंवा याउलट तृणमय व कंटकमय प्रदेश निस्तृण किंवा निष्कंटक विभाग आढळला तर त्याखाली साडेचार हातावर किंवा पश्‍चिम दिशेला तीन हातावर व तीन पुरुष खोलीवर पाणी किंवा धन सापडते.
- एखाद्या वृक्षाची फांदी निस्तेज किंवा खाली लोंबणारी असेल तर त्या वृक्षाखाली पंधरा हातांवर पाणी मिळते.
- एखाद्या वृक्षाची फळे, फुले व पाने वाजवीपेक्षा जास्त तेजस्वी दिसत असतील, तर त्याच्या पूर्वेला तीन हातांवर व वीस हात खोलीवर पाणी मिळेल. खोदताना प्रथम एक दगड व पिवळी माती मिळते.
- जर कंटकारी झाडाला काटे नसतील व पांढरी फुले आली असतील तर भूमीखाली साडेतीन पुरुष खोलीवर पाणी मिळते.
- जर निर्जल प्रदेशातील खजुराच्या झाडाला दोन शेंडे आले असतील तर त्याच्या पश्‍चिमेला दोन हातावर तीन पुरुष खोलीवर पाणी सापडते.
- कर्णिकार किंवा/आणि पळस वृक्षांना लाल रंगाऐवजी पांढऱ्या रंगाची फुले आली, तर दहा हात खोलीवर पाण्याचा प्रचंड साठा असतो. पृथ्वीच्या पोटात शिरून जलशिरा व त्यांची वाहण्याची दिशा शोधून काढणे खूपच कठीण काम आहे. परंतु भूगर्भांतर्गत शिरांमुळे भूपृष्ठावरील वनस्पती, माती इत्यादी गोष्टींच्या रंग, रूप आदी लक्षणांवरून अंतर्गत शिरा शोधून काढता येऊ शकतात. खाली पाणी असल्यास व नसल्यास भूपृष्ठावरील वनस्पतींमध्ये खालील काही वैशिष्ट्ये दिसतात ः
- काही झाडांची मुळे भूगर्भात असलेल्या पाण्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत असतात, अशी झाडे शोधून काढणे.
- भिन्न जातीची व प्रकारची काही झाडे व वेली एकमेकांत गुंतून वाढतात.
- निष्कंटक प्रदेशात काही वेळा एखादाच तृणमय किंवा निष्कंटक पट्टा सापडतो.
- एखाद्या शेतात एखाद्या भागात बी जगत नाही किंवा जगले तर वाढत नाही. त्याच पट्ट्यात दुसऱ्या भागात पीक येते.
- बी अंकुरित होऊन पिके येतात, पण ती जळून जातात.
- एखाद्या प्रदेशात वनस्पतींची पाने पांढुरक्‍या रंगाची असतात.
- काही वनस्पती व झाडांची वाढ काही प्रदेशात पूर्ण होत नाही. ती खुरटतात.
- झाडांची पाने, बुंधे व फांद्या पांढुरक्‍या रंगाच्या दिसतात.
- एखाद्या प्रदेशातील वनस्पतींमधून दुधासारखा पांढरा रस बाहेर येतो.
- एखाद्या प्रदेशात झाडांना खूप पाने येतात.
- झाडांच्या फांद्या लांब वाढून खाली वाकत जातात.
- काही प्रदेशात झाडांना गाठी येतात.

वनस्पतीच्या वैशिष्ट्याप्रमाणे जमिनीची काही वैशिष्ट्ये आढळतात. वालुकामय, तांबडी, तपकिरी, पांढरी असे मातीचे प्रकार असतात. काही ठिकाणी माती व वाळू नसून नुसतेच खडक असतात. काही ठिकाणी नुसताच मुरूम किंवा चुनखडी असते. या प्रत्येक भू-भागाचे पाणी शोधून काढण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण करावे लागते.

काही प्रदेशात खूप वारुळे असतात. वारुळांमधून खूप आर्द्रता असते, त्या ठिकाणी वाळवीची वसाहत असते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे वारूळ तयार करता करता त्या थेट भूगर्भातील पाण्यापर्यंत जातात. त्यामुळे वारूळ असणे हे त्याखाली निश्‍चित पाणी असल्याचे निदर्शक लक्षण मानले गेले आहे.
खोदताना वाळवी जी माती वर फेकतात ती टेकडीच्या रूपाने पृष्ठावर दिसते. या मातीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, म्हणून या मातीला "आस्राव भेषज' (म्हणजेच स्रवलेले औषध) असे अथर्ववेदात म्हटले आहे.

निरनिराळ्या प्रदेशांत जशी वनस्पतींची व मातीची लक्षणे वेगवेगळी आढळतात, तशीच त्या त्या प्रदेशात सापडणाऱ्या प्राण्यांची वैशिष्ट्येसुद्धा भिन्न-भिन्न असतात. #agrowon,#agrowonmarathi,#agrowonsuccessstory #Agrowon #Agrowon

Видео पाणी कुठ आहे जमीनीतील पाणी कसे पहावे ? कवठाचं झाड आणि वारूळ यांच्या वरून जमिनीतील पाण्याचा शोध канала Agrowon Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 апреля 2019 г. 6:38:48
00:09:15
Другие видео канала
ground water testing || #water finding || finding groundwater using l rod || borwell || dowsingground water testing || #water finding || finding groundwater using l rod || borwell || dowsingस्व.दत्तू शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ४०+ धमाका खुटारी - (२०२० )स्व.दत्तू शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ४०+ धमाका खुटारी - (२०२० )जमिनीमध्ये पाणी आहे हे बघायचेजमिनीमध्ये पाणी आहे हे बघायचेइस जडी-बूटी को सिर पर रखते ही आपको दिखेगा जमीन में कहा है पानी | Jamin me pani dekhne ka tarikaइस जडी-बूटी को सिर पर रखते ही आपको दिखेगा जमीन में कहा है पानी | Jamin me pani dekhne ka tarikaBorewell DrillingBorewell Drillingमूळव्याध समूळ संपवा या 1 उपायाने | piles gharguti upchar, mulvyadh bhagndar fistula gharguti upayमूळव्याध समूळ संपवा या 1 उपायाने | piles gharguti upchar, mulvyadh bhagndar fistula gharguti upayकडक उन्हाळ्यातही झटपट पैसे कमवून देणार पिककडक उन्हाळ्यातही झटपट पैसे कमवून देणार पिकआपल्या शेताची फवारणी स्वयंभु कशी करावी  फवारणी तंत्रज्ञान आणि कीटकनाशकेआपल्या शेताची फवारणी स्वयंभु कशी करावी फवारणी तंत्रज्ञान आणि कीटकनाशकेजीए व्यवस्थापन आणि महत्व / Management OF Gibberellic Acid (GA) डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूटजीए व्यवस्थापन आणि महत्व / Management OF Gibberellic Acid (GA) डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट६० वर्षाचा माणूस २० वर्षाचा दिसू लागेल | सांधेदुखी ते पोटविकार | धष्टपुष्ठ  होण्यासाठी  मुळव्याध६० वर्षाचा माणूस २० वर्षाचा दिसू लागेल | सांधेदुखी ते पोटविकार | धष्टपुष्ठ होण्यासाठी मुळव्याधBore hole inspection.Bore hole inspection.वेन्चुरी विना ड्रीप द्वारे खत देणे शक्य ठिबक सिंचनातील नवे तंत्रज्ञान ड्रीप द्वारे  खतांचा वापरवेन्चुरी विना ड्रीप द्वारे खत देणे शक्य ठिबक सिंचनातील नवे तंत्रज्ञान ड्रीप द्वारे खतांचा वापरऊसात कोणती आंतरपिके घ्यावीत व त्यावर कोणत्या तणनाशकाचा वापर करावाऊसात कोणती आंतरपिके घ्यावीत व त्यावर कोणत्या तणनाशकाचा वापर करावागाजर मुळा कढीपत्ता यांचे औषधी गुणधर्मगाजर मुळा कढीपत्ता यांचे औषधी गुणधर्मI How to find water in ground? part 2 ! जामिनिमद्ये पाणीसाठा कसा शोधायचा? पार्ट 2I How to find water in ground? part 2 ! जामिनिमद्ये पाणीसाठा कसा शोधायचा? पार्ट 2Borewell drilling in india 30 फीट मे देखो पानी का खतरनाक source amazing camera video full HD MEBorewell drilling in india 30 फीट मे देखो पानी का खतरनाक source amazing camera video full HD MEट्यूबवेल कराने से पहले जानिए की जमीन के अंदर कहाँ और कितना पानी है [Check Underground Water Level]ट्यूबवेल कराने से पहले जानिए की जमीन के अंदर कहाँ और कितना पानी है [Check Underground Water Level]जमीनीतील पाणी  नारळाच्या मदतीने कसे पाहावे जमीनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ?जमीनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पाहावे जमीनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ?Finding Ground Water  Using Coconut || Borewell DrillingFinding Ground Water Using Coconut || Borewell Drillingकुक्कुट पालन ब्रॉयलर व लेयर व गावरान  कुक्कुट पालन माहिती कुक्कुट पालन व्यवसाय माहितीकुक्कुट पालन ब्रॉयलर व लेयर व गावरान कुक्कुट पालन माहिती कुक्कुट पालन व्यवसाय माहिती
Яндекс.Метрика