Загрузка страницы

मुंबई : राज ठाकरे यांचं मुलुंडमधील UNCUT भाषण

मुंबई : नाणारचा प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितलं आहे. रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच नाणारवासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

मुंबईतील मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने 100 महिलांना रोजगाराचं साधन म्हणून रिक्षांचं वाटप करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधील आसिफा बलात्कार प्रकरणावरुनही त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला.

''नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही''

''नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातला जाईल,'' अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतात. मात्र, गुजरातच का, असा सवाल करत प्रकल्प कुठेही न्या, पण तो कोकणात होणार नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं जाहीर आव्हान राज ठाकरेंनी दिलं.

''मुख्यमंत्री खोटं कुणासाठी आणि का बोलतात?''

''मुख्यमंत्री म्हणाले राज्यात एक लाख 20 हजार विहिरी बांधल्या आहेत. इथे राज्यात पाणी नाही आणि विहिरी कुठे बांधल्या? महाराष्ट्रातील 44.9 जमिनीचं वाळवंटीकरण होणार आहे, असा ‘इस्रो’चा रिपोर्ट आहे. मराठवाड्यात तर 1200 फूट खोल गेलं तरी पाणी मिळत नाही आणि तरी मुख्यमंत्री सांगतात की एक लाख 20 हजार विहिरी बांधल्यात. का आणि कशासाठी खोटं बोलताय?'' असा सवाल राज ठाकरेंनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांची मिमिक्रीही राज ठाकरेंनी करुन दाखवली. यामुळे जोरदार हशा पिकला.

''भाजप बलात्काऱ्यांना पाठीशी घालतोय''

जम्मू-काश्मीरमधील आसिफा बलात्कार प्रकरणावरुन राज ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला. शिवाय भाजप बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपी कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याला तिथल्या तिथे ठेचून मारायला हवं, असंही राज ठाकरे म्हणाले.

''उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना शिवसेना नगरसेवकाने हाकललं''

''उस्मानाबादचे मराठी शेतकरी मुंबईत भाजीपाला विकायला आले होते. शिवसेनेच्या नगरसेवकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली आणि त्यांना हाकलून दिलं, हीच तत्परता परप्रांतियांविरोधात का दाखवली जात नाही,'' असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवरही निशाणा साधला.

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Видео मुंबई : राज ठाकरे यांचं मुलुंडमधील UNCUT भाषण канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
15 апреля 2018 г. 21:36:50
00:32:19
Другие видео канала
Watch GhoshanaPatra with MNS chief Raj ThackerayWatch GhoshanaPatra with MNS chief Raj ThackerayUNCUT | नाशिकमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 'राज'बाण, पाहा संपूर्ण भाषण | एबीपी माझाUNCUT | नाशिकमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 'राज'बाण, पाहा संपूर्ण भाषण | एबीपी माझाMade a mistake by supporting Modi? l Raj Thackeray answers in GhoshanapatraMade a mistake by supporting Modi? l Raj Thackeray answers in GhoshanapatraUNCUT: उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण, युती तुटलीUNCUT: उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण, युती तुटलीमाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पामाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पाRaj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVवसई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं UNCUT भाषणवसई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं UNCUT भाषणRaj Thackeray Interview UNCUT | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रगट मुलाखत अनकटRaj Thackeray Interview UNCUT | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रगट मुलाखत अनकटनाना पाटेकर यांचे उत्कृष्ट भाषण | Nana Patekar Speech | Chandrakant Dalvi | SB Production Pvt. Ltd.नाना पाटेकर यांचे उत्कृष्ट भाषण | Nana Patekar Speech | Chandrakant Dalvi | SB Production Pvt. Ltd.Raj Thackeray Rally Lalbaug mumbai kalachowki 12 October 2014 Maharashtra Vidhansabha electionsRaj Thackeray Rally Lalbaug mumbai kalachowki 12 October 2014 Maharashtra Vidhansabha electionsUNCUT : मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषणUNCUT : मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषणपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंMr Raj Thackeray on Shivaji Park (3 May 2008)Mr Raj Thackeray on Shivaji Park (3 May 2008)Balasaheb Thackeray Speech | Dasara Melawa - 1998 | दसरा मेळावा - १९९८Balasaheb Thackeray Speech | Dasara Melawa - 1998 | दसरा मेळावा - १९९८UNCUT:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पुण्यातील भाषणUNCUT: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पुण्यातील भाषणRaj Thackeray in Aap Ki Adalat  (Part 1) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat (Part 1) - India TVEXCLUSIVE : मराठी जैन वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक्स्क्लुझिव्हEXCLUSIVE : मराठी जैन वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक्स्क्लुझिव्हबाळासाहेब ठाकरे यांचे जबरदस्त भाषण ! नारायण राणेंवर केला जोरदार प्रहार । Balasaheb Thackeray Speechबाळासाहेब ठाकरे यांचे जबरदस्त भाषण ! नारायण राणेंवर केला जोरदार प्रहार । Balasaheb Thackeray Speechराजगर्जना : भिवंडी सभा | मुस्लिम बहुल भागात काय बोलले बघाचराजगर्जना : भिवंडी सभा | मुस्लिम बहुल भागात काय बोलले बघाचUNCUT : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पदाधिकारी मेळाव्यातील संपूर्ण भाषणUNCUT : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पदाधिकारी मेळाव्यातील संपूर्ण भाषण
Яндекс.Метрика